"मनमोर" : माझा पहीला कविता संग्रह प्रकाशन : ई-टीव्ही चित्रफीत

Submitted by Girish Kulkarni on 2 December, 2010 - 16:46

मित्रांनो : शुभप्रभात !

माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!

प्रकाशन स्थळ :

साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अ‍ॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!

सस्नेह

गिरीश कुलकर्णी

दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :

प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई

P1070943.JPGसन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे

All-A.jpg प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :

Audience-2.jpgAidience-3.jpg"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर

Prakashan-4.jpgLaunch-All-1.jpg

धन्यवाद !

सस्नेह

गिरीश

दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !

http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw

चिअर्स !!!

गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून अभिनंदन गिरीशराव,

आपला काव्यप्रवास उज्वल असो अशी प्रार्थना!

-'बेफिकीर'!

अभिनंदन गिरीश!!

काव्यक्षेत्रात उज्ज्वल भवितव्याकरीता हार्दिक शुभेच्छा.

गिरीश तुमचा मोर साहित्याच्या वृंदावनाला सौंदर्याची नवी ओळख देवो ही सदिच्छा!!! अभिनंदन!!! संग्रह पुण्यात मिळण्याचे ठिकाण कळवा.

अभिनंदन गिरिश......... Happy
आपल्या अश्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींनी आपण आम्हास नेहमी रिझवत रहावे.......व्ही सदिच्छा, Happy

गिरीशजी खुप खुप शुभेच्छा Happy बाकी संध्याकाळी बोलूच !
अज्ञातजी, जुनी आठवण जागी झाली हे चित्र पाहून. मी जपुन ठेवलय अजुन माझ्याकडे Happy

गिरीश...... तुझं खूप खूप अभिनंदन Happy
कार्यक्रमाला यायला नक्की आवडलं असतं रे........!!
वृत्तांत आणि फोटो मात्र लवकर येऊ दे.
तुझ्या हातून उत्तमोत्तम काव्यनिर्मिती होऊ दे Happy

अभिनंदन गिरीश भाउ !
अनेक शुभेच्छा !

अवांतरः हा धागा, खरेतर चालू घडामोडीमध्ये योग्य राहील.

Pages