रक्तकांचन

Submitted by जिप्सी on 30 November, 2010 - 23:51

प्रचलित नावः कंचन
हिंदी नावः कचनार, सोना
बोटॅनिकल नावः Bauhinia purpurea
English Name: Geranium tree

Therapeutic use:
• The bark is used for tumour in stomach.
• The flower powder is used as laxative.
• Animal studies have shown that when combined with Ashwagandha root extract, it supports the healthy regulation of the thyroid hormone.
(आंतरजालावरून साभार - इथे पहा)


आपट्याच्या पानासारखी दिसणार्‍या या झाडाची पाने दसर्‍याच्या दिवशी सर्रास "सोन्याची पाने" म्हणुन विकली जातात. Happy
================================================
================================================
कच्ची कली कचनारकी Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता याचा तूला झब्बू देतोच रात्री.
इथे तो भरभरुन फूलतो. पांढराही आहे. शिवाय यात जांभळा आणि दुर्मिळ पिवळा रंग पण असतो.

जिप्सी,

निसर्गाची सृजन प्रक्रिया टिपलीत अक्षरशः!

'लव्हली' हे एकच विशेषण सुयोग्य ठरावे.

-'बेफिकीर'!

प्रकाशचित्र कशी अपलोड करायची असतात हे कुणी सांगेल का? मलाही एक प्रयत्न करावासा वाटत आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मस्त! ओह ..........कचनार म्हणजे हे फूल! कच्ची कली कचनारकी हे गाणं ऐकताना नेहेमी कचनार म्हणजे काय? हा प्रश्न पडायचा.
जसं मुलतानीतला ख्याल शिकताना..." गोकुल गाव... गावका छोरा रे....बरसानेकी नार रे! " म्हणताना बरसाना म्हणजे काय असाही प्रश्न पडायचा. बरसात माहिती होतं पण... त्याचा काहीच संबंध नव्हता. पण तेव्हाच सरांनी सांगितलं होतं की राधा बरसाना गावची होती.

मानुषी, बरसाना माहितीबद्दल धन्स (मला हि हे माहित नव्हते ) >>> सेम हीअर.

कचनार हे पण आजच कळले.

योग्या, जरा या कचनारच्या पानांचा पन फोटु टाक ना एखादा असेल तर. बघु तरी दे आपट्याच्या पानांसारखी खरच दिसतात का ते!

निंबुडा आणि जिप्सी...परवाच्या कौ.ब. करोडपतीमधे यावर प्रश्न होता. की राधा कोणत्या गावची? ऑप्शन्स होते, मथुरा, वाराणसी .....अजून एक गाव आणि बरसानाही होते.

कचनार, रक्तकांचन.... नावाप्रमाणेच डौलदार आकार आणि रूप! मस्त प्रचि. मला त्या पानांचा बदामाकार फार आवडतो.

मस्तच.
दिनेशदा.. झब्बू पण मस्त.

>> दिनेशदा: चल हा घे झब्बू. ( माझ्या आगामी फ्लॉवर्स ऑफ नैरोबी, या संग्रहातून...)
मस्तच दिनेशदा. आता वाट पहात आहोत त्या पुस्तकाची.