कार्ले फ्राय

Submitted by वर्षू. on 25 November, 2010 - 03:48

कार्ल्याची भाजी ऐकून घाबरू नका बरं.. ही अजिबात कडू लागत नाय Happy

कार्ली सोलून बारिक चकत्या कराव्या. मिठाच्या पाण्यात २ तास भिजत घालाव्या. मग घट्ट पिळून घ्याव्या.
(दोन कारल्याच्या चकत्यांसाठी) दीड टेबल स्पून तेल कढईत तापत ठेवावे. त्यात जिरे आणी हिन्गाची फोडई करा. मग हळद,धन्याची पूड, शोपेची पूड अ‍ॅड करा,जरा परतल्यावर कार्ल्याच्या चकत्या ,,हिरव्या मिर्चीचे तुकडे घाला. छान परतून मंद आचेवर परतून झाकण घालून शिजवा. शिजत आली कि झाकण काढून टाकून लाल रंग येईस्तोवर परता. वरून अमचूर्,मीठ, किचन किन्ग मसाला किन्वा तवा सब्जी मसाला आणी चिमुटभर गरम मसाला टाका.
अमचूर ने चव खूप छान येते. Happy

ही भाजी पराठा किन्वा पुरी बरोबर खूप छान लागते.

rawa dosa.jpg

गुलमोहर: 

वर्षू, कार्ल्याची हि अन आणखी एक रेसिपी म्हणजे गूळ-चिंच घालून केलेली कार्ल्याची हिरव्या रस्स्याची भाजी.

अन ह्या रेसिपीला, आमच्या कडे "कडव्या" म्हणतात.

वर्षू, एकदम काय्काय करुन खायला लागलीस ! ही भाजी माझी पण आवडती. मी यात बटाटापण टाकतो. तेवढाच कडवटपणा विभागला जातो.

वर्षू आजच कारली आणलीयत. करून पहाते. मस्त वेगळा प्रकार आहे. दिसतंय पण मस्त!
अगं नवरोबा कुठून तरी काजू करेला फ्राय खाऊन आलेत. ते करण्यासाठी म्हणून कारली आणली होती. पण माहिती नाही गं हा प्रकार. कुणाला माहिती आहे का काजू करेला फ्राय ची रेसिपी?

कार्ल्याचा फोटो पहायला आलो नि....।

निल ताई....तुम्ही तर प्रचि विभागा चा आपा विभागच बनवुन टाकला, पण तुमचा प्रचि शोभतोय....असो

चकत्या मस्त खर्पूस दिसत आहेत.

धन्स सर्वांना@ सुकि- माझ्याकडे कोणत्याच भाजीत चिन्च गूळ वापरला जात नाही रे.. पण हिरव्या रस्स्याची रेसिपी टाक ना..

@ दिनेश दा- इकडली कार्ली फार कडू नसतात.. त्यामुळे आयत्या वेळी केली तरी कडू लागत नाहीत..
'काय्काय करुन खायला लागली''... खायला लागलीस नाही नुस्ती बनवायला.. गिनी पिग भी तो चाहिये.. पण कोणी दुसरा ..मी नाय काय Lol
पण नवर्‍याला ही भाजी खूप आवडली..

@ दक्षे- तू नक्कीच ही भाजी चिंच गूळ टाकून कर्णार्... नै???

@ मानुषी- शोपेच्या पावडरीचा वास फार पुढे येऊ देऊ नकोस..

@ आर्या-- लसलशीत म्हंजे काय ग?? Happy

धन्स भ्रमर ,स्निग्धा,हिम्सकूल

चातक.. मलाही असच वाटतय रे.. आता रेसिपीज, पाककृती विभागातच टाकत जाईन..लाजो नी सांगितल्याप्रमाणे Happy

वर्षू नील

तुमच्या पाककृती, तुम्ही पाककृती विभागात टाकून कृपया सहकार्य करा.

मदत_समिती.