देवबाग....देवांची बाग !

Submitted by विशाल कुलकर्णी on 19 November, 2010 - 09:18

सिंधुदुर्ग येथील इतर ठिकाणांबरोबर श्री. जयंत साळगावकर (कालनिर्णयवाले) यांनी उभारलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. हे पांढरे शुभ्र मंदीर खुप सुंदर आहे, अगदी एखाद्या सुंदर चित्रासारखे. इथली श्री गणेशाची मुर्ती निखळ सोन्याची आहे. आम्ही दर्शन घेतले आणि लगेचच नैवेद्यासाठी म्हणुन गाभारा बंद करण्यात आला त्यामुळे श्रीमुर्तीचा फोटो नाही घेता आला, मग मी मंदीराच्या बाह्य रुपावरच समाधान मानले.

१.

२.

मंदीराच्या अंगणातल्या छोट्याशा जलकुंडात फुललेले हे कमळ टिपायला मी विसरलो नाही.

3.

तिथुन निघालो ते थेट देवांच्या बागेत, देवबागमध्ये जाऊन धडकलो. या जागेला देवबाग हे नाव का दिलं असेल माहीत नाही, पण मला विचाराल तर पुराण काळी ती खरोखर देवांचीच बाग असावी. (नाही म्हणायला आता मानवाच्या व्यवहारी वृत्तीचे ग्रहण लागलेय तिलाही, पण ते चालायचेच) सर्वप्रथम नजरेत भरतो तो दुरपर्यंत पसरलेला पांढर्‍या शुभ्र रेतीचा स्वच्छ समुद्र किनारा...

४.

अनिलने (आमचा स्थानिक गाईड कम ड्रायव्हर कम मित्र) आम्हाला एक बोट स्वस्तात ठरवून दिली. मजा वाटत होती, बाकी बोटीतून किमान १०-१५ माणसे आणि आमच्या बोटीत फक्त आम्ही दोघेच.....

आजुबाजुला जिकडे नजर टाकाल तिकडे नारळीची झाडे, निळे आकाश आणि समुद्र....

५.

६.

७.

८.

बोट खाडीच्या पाण्यात मध्यावर गेली, आता तिथुन दिसणारा किनारा वेड लावत होता.

९.

१०.

११.

१२.

कशाचे फोटो घेवु, किती घेवु आणि कशाचे नको घेऊ असे झाले होते अगदी...

१३.

१४.

१५.

या देखण्या पाहुण्यांनाही सोडलं नाही. पण यांचा फोटो लांबुनच घ्यावा लागला, जरा जवळ गेलं की भुर्र उडुन जायचे. मग लांबुनच शक्य होइल तेवढा झुम करुन हा फोटो काढला, पण मुळातच कॅमेरा अगदीच साधा असल्याने तेवढासा नाही नीट आला.

१६.

१७.

जाता जाता शेवटी स्वतःचाच हा असा फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही...

१८.

सद्ध्या इथेच एक अर्धविराम घेवु, बाकीची सफर नंतर..... Happy

विशाल

गुलमोहर: 

किती सुंदर ठिकाण आहे हे. आणि फोटोही किती स्वच्छ आलेत. त्या हिरव्या झाडांतून हिरव्या पाण्यात उतरणार्‍या पांढर्‍या पायर्‍या किती मनमोहक आहेत! कुठे कुठे भटकत असता तुम्ही .....

छान आहेत फोटो !! पाण्याचे आणि मधला हिरवा खूप आवडले.
कोकणात खूप वेळा जाऊन झालय पण ते रत्नागिरी आणि आसपासच... सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत कधी पोचलो नाही..
जायला हवं नक्की.. तिथले आत्तापर्यंत पाहिलेले सगळेच फोटो फार सुरेख होते.. !

छान समुद्र किनारा आहे. स्वच्छ वाटतोय... छान फोटोज्
फोटोंना क्रमांक दे म्हणजे प्रतिक्रिया देणे सोपे जाईल.

त्या देवळापासून दोन मिनिटावर आमचे घर होते. म्हणजे घर आहे अजून पण त्याचे आता हॉटेल झालेय. बर्‍याच वर्षात तिथे गेलो नाही, हे देऊळ बांधल्यापासून तर नाहीच. आता इथेच बघतोय, हे सगळे.

अरे वा विशाल मालवणातहि गेलास? साळगावकरांनी बांधलेल हे मंदिर खुपच छान आहे. मी मालवणात गेल्यावर जातेच किती शांत वाटत ना? बाजुलाच समुद्र किनारा. देवबागलाहि गेलास.. वा छान कोकण दौरा चालु आहे Happy तिकडेचे सगळे किनारे अशेच वेड लावणारे आहेत.

लहान असताना भोगव्याहुन देवबागेला तरीतुन गेलो होतो, आणि देवबाग-मालवण चालत चालत!!
अजुनही ते लक्षात आहे. आता वेळ नाही, खंत वाटते. Sad

विशालजी,
तुम्ही तर आतां काळजालाच हात घातला ! आम्ही भावंडं लहानपणी सुट्टीच्या दिवसात अख्खा दिवस होडी घेऊन देवबागच्या खाडीतच हुंदडत असायचो [आमचं घर भोगव्याच्या बाजूला व नारळीची बाग देवबागेत होती]. तुमच्या अप्रतिम फोटोनी त्या जुन्या स्वर्गीय सुखाच्या आठवणी उजळून निघाल्या. मनःपूर्वक धन्यवाद.

मस्त!

मस्त फोटो... मंदिर काय सुंदर आहे. जायलाच पाहिजे एकदा. विशाल तुझ्या फोटोनंतरचा फोटो पण आवडला. हिरवे कोकण.. Happy

विशाल मस्तच ........ कोकण सहिच आहे, आमच्या गावाला जाउन आलात...... मालवण... जयंत साळ्गावकरांच मंदिर, सगळे समुद्र किनारे खुप छान आहे. फोटो पाहुन परत जावेसे वाटते.
पराग रत्नागिरी सोडल्यानंतर कोकण अजून हिरवा होत जातो................

सगळ्यांचे खुप खुप आभार Happy
परदेसाई, मी प्रचि आधी पिकासावर टाकून तिथुन दुवा देतो, तिथे साईझ निवडताना ८०० पिक्सेल (किंवा जी कमाल असेल ती) निवडतो त्यामुळे मोठे प्रचि टाकता येते.
चंदन आभार, तुमच्या सुचनेप्रमाणे प्रचिंना क्रमांक दिले आहेत. Happy

विशाल, सगळेच फोटो एकदम क्लास Happy (कसे काय बघायचे राहुन गेले :().

मला माझी कोकण भटकंती आठवली.
मालवणवरून तारकर्ली, देवबाग करत समुद्रीमार्गाने (मालवण-वेंगुर्ला रस्त्याचे नाव :)) कोळंब, पाट परूळे, म्हापण करत मित्राच्या "निवती" या गावी गेलो होतो.

विशल्या, माझ्या गावात जाऊन आलास आणि बोलला नाहीस? Happy
जिप्स्या, परूळे माझं आजोळ रे.. Happy
भोगवे ते दुतोंड.. किनार्‍यावरून भर दुपारी चालत गेलो होतो त्याची आठवण झाली.