परसबागेतून नवी भेट!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

खास आपल्यासाठी.
aaginphula [parasbag].jpgambadi [parasbag].jpgpapai2 [parasbag].jpgpapai [parasbag].jpgrui [parasbag].jpg

मिरचीच फुल खूपच छान वाटतंय ...
पपईच पण सुरेखच .... रुईच्या कळ्याही सुंदर ...
मात्र दोन क्रमांकच फुल कशाच आहे ? भेंडीच्या फुलासारखं वाटतय पण ते तर पिवळ असत ना !

छान.... ते दुसरं फूल कशाचं आहे?
दिनेशदा, मंदाराचं झाड म्हणजे कोणतं आणि ते बागेत का लावतात?

रूईसारखी पांढरी फूले येणारे झाड म्हणजे मंदार. पांढरी सोडून निळी आणि राणी कलरची अशी दोन रंगाची फूले येणारी रुईची झाडे असतात. पण रुईचे झाड सहसा लावत नाही. ते आपोआपच उगवते. त्याला करंजीच्या आकाराचे फळ लागते, ते फूटले कि सावरीच्या कापसासारख्या म्हातार्‍या उडतात. त्या रुजतात.
पांढरा मंदार गणपतीला प्रिय तर बाकीची मारुतीला (रुईला सूर्याची कन्या मानतात.)

सर्वांचे मनापासून आभार.
मात्र दोन क्रमांकच फुल कशाच आहे ?>>>> ते अंबाडीचे. मायबोलिकर सीमाने सुचवल्याप्रमाणे मी बाजारातून आणलेल्या भाजीचे देठ लावले होते. हो, छान रुजले ते.
त्या कळ्या रूईच्या नाहीत, मंदाराच्या आहेत.>>> मी आजवर त्याला पांढरी रुई म्हणायचे.

नाही रे, हाच मंदार. अष्टविनायकाच्या एका देवळाजवळ याची बरीच झाडे आहेत. हा जास्त करुन देशावरच दिसतो (कोकणात फारच क्वचित ) शास्त्रीय नाव Calotropis procera
काही ठिकाणी पांगार्‍याचा, मंदार म्हणून उल्लेख मी वाचला, पण तो चुकिचा असावा.
पांगार्‍याला बंगालीत "पलिता मंदार", असा एक शब्द आहे, असे वाचले होते. Erythrina stricta

धन्स, दिनेशदा Happy

काही ठिकाणी पांगार्‍याचा, मंदार म्हणून उल्लेख मी वाचला, पण तो चुकिचा असावा.>>>>> हो मीसुद्धा एका ठिकाणी वाचले होते. Happy

मला नेपतीच्या फूलांचा पण हवाय फोटो. मी काढलेला तेवढा स्पष्ट नाही, (घराच्या उजव्या बाजूच्या दुकानाच्या जवळ आहे, लांब जायला नको )