मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदि खरं मनिषा.. अमेरीकेवर आतंकवादि हल्ला होउन ७ वर्ष झाली पण त्यानंतर कुठल्याहि हल्ल्याची बातमी आपण ऐकली का? पण भारतात आता तर साखळीच चालु झाली आहे हल्ल्यांची काय होत आहे यावर? आपले राजकरणी दुश्मन देशाबरोबर समझोता करुन अजुन समझौते एक्सप्रेस चालु करताहेत.. देशात अराजकता माजवण हाच उद्देश आहे या हल्लेखोरांचा.

साउथ मुंबईतील सगळी ऑफिसेस सोडुन दिली. ट्रेनला भयंकर गर्दी आहे.

ताज आणी ओबेरॉय दोन्ही क्लियर!! आय बी एन सांगतय.. डी जी नी सांगितलय..
पबलीक डी जी बोलतयत आय बी एन वर बघा!

ओबेरॉयमधील करवाई संपल्याच सांगतायत.

केवळ पोलिसांना दोष देण्यात काय अर्थ आहे. जोपर्यंत राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबत नाही तोपर्यंत त्यांचाही निरुपाय असतो. नाहीतर हे सगळं एका दिवसात मोडुन काढायची क्षमता आहे मुंबई पोलिसांची.
आता तर अशा अफवा ऐकायला मिळताहेत की या सगळ्यात आय. बी. चे काही ऑफिशिअल्स इन्वॉल्व्ह आहेत म्हणुन.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

अमेरिकेच्या इंटेलिजंस चीफने आपल्या माननीय गृहमंत्र्यांची लायकी काढली आहे.. इतके बॉबस्फोट आधी होऊनदेखील आणि सावधानतेचे इतके इशारे मिळुनदेखील पुन्हा मुंबईत दहशतवादी हल्ला होतो यावरून भारताचे गृहमंत्री किती नालायक आहेत हे कळुन येतं.. आणि एवढ्या घटनांची जबाबदारी डोक्यावर असतानादेखील ते यापदी अजुन कसे काय आहेत हे आश्चर्य आहे असं तो म्हणालाय तो.

वॉल स्ट्रीट जर्नलनेसुद्धा आपल्या राजकारण्यांची अक्कल काढली आहे.

भारतीय राष्ट्रध्वज कायमस्वरुपी अर्ध्यावर उतरुन ठेवला पाहीजे. जोवर प्रत्युत्तर दिले जात नाही तोवर....... कायमचा दुखवटा.

दर आठवड्याला एक या प्रमाणे हल्ले होतायत. जे युद्ध सीमेवर लढले जायला पाहीजे ते घराच्या दारात लढले जातेय. अन सामान्य जनता शहीद होतेय.

५० पोलीस शहीद झाले. कसं भरुन काढणार हे नुकसान!

हो मयुरेश. मी ही वाचलं रेडीफ वर.. ह्या सगळ्यालाच जबाबदार राजकारणी आहेत - सत्ताधारी, विरोधी सगळेच.. आपली पोळी भाजण्यासाठी साले अजुन असे किती निरपराध मारणार आहेत?? खरंच रक्त तापतंय आता.

आयला ताज मध्ये आजुन आवाज येतायत..! Sad

आपल्या ग्रुहमंत्रयांची अक्कल काढणे अशक्य आहे,कार्ण ती अस्तित्वातच नाही,काल हा माणुस नॅशनल टेलिविजनवर सांगतोय-आमचे कमांडो आत्ता दिल्लीतुन निघालेत,पहाटेपर्यंत पोचतिल मुंबईत.
अरे हे काय व्हराड आहे का इतक्या डिटेलमधे सांगायला?

*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

भारतानी काय करायवं हवं या विषयावर IBNLive ने मतं मागितली आहेत. तेंव्हा मतं वाचा आणि लिहा. काहींची मतं खरचं खूप छान आहेत -

http://ibnlive.in.com/conversations/thread/79961-10-2-1.html

पोलीस सांगताहेत की, ताजमध्ये अजूनही एक अतिरेकी आहे. फक्त ओबेरॉयमध्ये अतिरेकी नाहीत. मात्र ओबेरॉयमध्ये काही नागरिक अजून आहेत.

02:25 PM: NSG Commandos make progress in flushing out terrorists at Nariman House. They have cleared 4th and 5th floors of the building. They are scaling down the outside wall to reach to terrorists holed up in the 3rd floor.

मुळात हे किती लाजिरवाणं आहे की इतर देशाची गुप्तचर यंत्रणा इथे मदतीला धावते. इतर देशांचे नेते आपल्या नेत्यांची अक्कल काढतात. वास्तविक दहशतवाद हा मुळात याच देशाच्या नेत्यांनी जन्माला घातलेला राक्षस असतो...

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ताजमध्ये अजूनही अतिरेकी व नागरिक आहेत.

आणि एवढ्या घटनांची जबाबदारी डोक्यावर असतानादेखील ते यापदी अजुन कसे काय आहेत हे आश्चर्य आहे असं तो म्हणालाय तो.>>>>
अरे म्याडम्ची क्रुपा हाय त्यांच्यावर बाकी काहीच नाही.हा माणूस इलेक्शन देखिल जिंकलेला नाही,राज्यसभेतुन मागच्या दर्वजाने आला आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

काल पंतप्रधान आणी अडवानी एकत्र येउन 'एकी'चा संदेश देणार होते म्हणे पण ऐनवेळी काय झाले माहित नाही,अडवानी एकटेच आले-धन्य झाली यांची आणी यांच्या नाटकांचीे
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

अज्जुका, ह्या देशातील नेतेच दहशवादाला कदाचित जन्म देत असतील.. पण म्हणून आपल्या राजकारण्यांनी शेपूट का घालावे..
==================

ibn वर बातमी - ताजमध्ये अजूनही नागरिक आणि अतिरेकी आहेत. २-३ अतिरेकी फिरत असावेत. गेल्या १५ मिनिटांत ५ स्फोट झाले आहेत. जोरदार गोळीबार सुरू आहे.

आजच लोकसत्तामध्ये म्हंटलं आहे की गृहमंत्री कपडे ठेवणीतले घालतात तसे प्रतिक्रियाही ठेवणीतल्याच देतात.. अगदी खरं आहे. षंढ माणुस आहे अगदी...

03:05 PM: Prime Minister Manmohan Singh [Images] asks his Pakistani counterpart Yousuf Raza Gilani [Images] to send ISI chief to Delhi [Images] to share information on Mumbai terror attacks, says Gilani's spokesman.

03:04 PM: Huge explosion rocks Taj Hotel. Prior to this, constant exchange of fire was going on. Unconfirmed reports said a person was rescued and taken in an ambulance from the hotel lobby.

ओबेरॉयमधील कारवाई संपली.... सर्वजण सुरक्षित....

-----------------------------------
ये धुआँ कम हो तो पहचान हो मुमकीन शायद
युं तो वो जलता हुआ अपना ही घर लगता है.

सी एस टी वर नव्याने गोळीबार झालेला नाही... एका पोलिसाच्या हातून ( चुकुन) गोळी सुटली.... त्यामुळे घबराट पसरली....

बिच्चारा... बहुतेक बंदुकीतून गोळी उडते काय हे तपासत असणार !

सगळ कल्पनेपलिकडचं आहे. राजकारण्यांच्या मते मुंबई ही सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. सगळे राजकीय पुढारी त्या सहज मिळणार्‍या सोन्याला चटावलेत... पण मुंबईची काळजी घ्यायला जशी हवी त्याचा साधा विचारही कोणी करत नाही. बांग्लादेशींचे अनधिक्रुत लोंढे, बकाल वस्त्या, नागरीकरणाची बोंब, वेशीला टांगलेला कायदा आणि सुव्यवस्था, अपुरी पोलीसयंत्रणा, त्यात मोठ्याप्रमाणावर होणारी राजकिय ढवळा-ढवळ, वाढता दहशतवाद, पोटार्थींची वाढती संख्या, मुर्दाड राजकारणी या सगळ्यातुन मुंबईला वाली राहिलेला नाही असे निराशाजनक चित्र निर्माण झालेय. दहशतवाद्यांची मजल पाहुन जीवाची नुसती आग्-आग होतेय... मुळात विचार असा येतो कि, माझ्या देशाकडे वाकडी नजर करुन पहायची हिंमत येवढी कशी वाढली? कोणीपण यावे आणि वेठीला धरावे, अत्याचार करावे .. कुठपर्यंत चालणार आहे हे सगळे? पक्षाच्या राजकारणापेक्षा देश मोठा आहे हे सांगायची वेळ आली आहे. सिमेपलीकडुन पुरुस्क्रुत दहशतवादाला असे चोख प्रत्युत्तर द्यायला हवे कि परत अशी कागाळी करण्याआधी १०० वेळा विचार करतील.
सहिष्णुता ही कणखर आणि सबळता या गुणांबरोबर शोभते... याशिवाय असते तेव्हा तो भ्याडपणा ठरतो.

पल्लवी

आत्ता इंदिरा गांधी हव्या होत्या.

आणि सोनिया गांधी नको होत्या .........

मला तर नेहमी वाटते की, सद्दाम हुसेनना उगीच फाशी दिली, त्यांना भारतात राज्य करण्याची शिक्षा द्यायला हवी होती, त्यांनाही शिक्षा झाली असती आणि आपल्या राजकारण्यांना सद्दामनी सरळ केले असते.
सगळेच एका माळेचे मणी. ईतका राग येतो की सगळ्यांना धरुन गोळ्या घालायला पहिजेत.

अश्विनी तुला अनुमोदन, त्यांनी ही परिस्थिती चांगली हँडल केली असती.

देशभरातील तुरुन्गात असणार्‍या सगळ्या अतिरेक्याना एकत्र जमा करून त्याना जिवन्त जाळायला हवे... आणि त्याची जगभर पब्लिसिटी करायला हवी.... सगळ्या जनतेने अशी मागणी करायला हवी..... पब्लिक प्लेसवर दहशत माजवणारा सापडला की लगेच जाळून मारून टाकायचा , तेही लोकांच्याचकडून...

ताजमध्ये ३० मिनिटात ९ स्फोट.... - आज तक

Pages