मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्विस प्रोवायडर कोणता चांगला? मला आयडिया बदलायचा आहे. व्होडा फोन चांगला आहे काय सर्विसच्या बाबतीत? एअर टेल वर विश्वास नाही. एकदा त्यांनी ओवर बिलिन्ग केले होते. एस एम एस सर्विस कोणाची चांगली असते?

सर्विस प्रोवायडर कोणता चांगला?
BSNL Proud
सगळ्यात स्वस्त... उगाच फोन करुन भलत्यासलत्या ऑफर गळ्यात मारत नाहीत.... कॉल अधुन्मधुन ड्रॉप होतात... पण कानाकोपर्‍यात पण कव्हरेज मिळतं!
त्यात जोडी पॅक वगैरे घेतला तर अजुनच भारी... शिवाय एखाददुसरा लॅन्डलाईन नंबरही फ्री मिळतो Happy

कधी कधी कव्हरेज असुनही फोन लागत नाही पण ते सहन करायची तयारी असेल तर बेस्ट ऑप्शन Happy

सगळ्यात महत्वाचे म्हणजे फसवाफसवी अजिबात नाही!

रंगासेठ-
नोकिया ई-५ बघा... किंवा सॅमसंग गॅलॅक्सी स्पेसिया (अँड्रॉईड २.१)...

मामी-
सर्कल प्रमाणे सर्व्हिस प्रोव्हायडरचा परफॉर्मन्स बदलतो..
कर्नाटक मधे एअरटेल ला तोड नाही... आयडिया (स्पाईस चं नाव बदलून) इथे रद्दी नेटवर्क आहे... पण महाराष्ट्र-गोवा सर्कलला परिस्थिती टोटली उलटी आहे...

त्यामुळे तुमच्या सर्कलमधे असणार्‍या कुणाचातरी ओपिनियन मागवा / विचारा...
जनरल ओपिनियन या बाबतीत शून्य उपयोगी...

रंगासेठ : Samsung Galaxy चा पर्याय चांगला आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत अंदाजे २५००० पर्यंत आहे.

मायक्रोमॅक्स स्वस्त आहेच पण मस्त / टिकाऊ आहे काय? ह्याआधी मोटो/ सोनी चे स्वस्त (बेसिक) हॅ न्ड से ट्स घेऊन पस्तावलोय म्हणून विचारतोय

पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत अंदाजे २५००० पर्यंत आहे.
>>
अ.आ.
तो गॅलॅक्सी एस...
गॅलॅक्सी स्पेसिया १२.५ ला आहे...
(पूर्वी याला अँड्रॉईड १.६ यायची... आता २.१ येते)

नवीन गॅलॅक्सी ५ पण येऊ घातला आहे / आला आहे... तो @ १७ पर्यंत असणारे...

sorry for typing in english, that is faster

if you are okay with single sim I will suggest you two options

1) Nokia 5230
2) Nokia c5

both approx 7.5K

i have one mmax q3 and i am not satisfied with it, still using. now I feel I should have bough two separate handsets, one for 1K and another really good handset.

if you have higher buget go for HTC wildfire approx 15K

finally, I suggest to go for one of only these brands, priority wise

htc, nokia, samsung.

imp sites to compare technical feature in detail along with user reviews and comments from worldwide - www.gsmarena.com

good luck and have grt time shopping!!!

मी परवाच samsung wave 525 घेतला. अजुन त्याच्याशी ओळख करुन घेतेय. पण एक त्रास म्हणजे देवनागरीत लिहिलेले दिसते पण अक्षर आधी आणि वेलांट्या नंतर असे होतेय.. Sad आता हे कसे काय सुधारुन घेऊ ते सांगा राव.. मी युनिकोड कुठे दिसतो का ते पाहात होते पण दिसला नाही. कृपया मदत करा. मला मायबोली नीट दिसत नाहीये त्यामुळे.

मी हल्लीच Samsung GC3200 हा मोबाईल घेतला. माझे Tata Indicom CDMA चे Network आहे. पण मला मोबाईल PC ला connect करता येत नाहिय. Samsung PC Suite लोड केलाय पण PC वर Net Connectivity मिळत नाहिय. Samsung आणि TATA Indicom दोघांशीहि बोलले पण दोघ एकमेकाकडे बोट दाखवताहेत. कोणी सांगु शकेल का की काय केल्यावत मला Net Connectivity PC वर मिळेल ते?
फोनवर Net Connectivity नीट मिळते.

सखी बै,

माय कॉम्प्युटर - (राइट क्लीक) - प्रॉपर्टीज - हार्डवेअर - डिव्हाईस मॅनेजर ला जा.

पोर्टस् चेक करा.
मोबाईल कनेक्ट केल्यावर मॉडेम पोर्ट ईन्स्टॉल होतय का ? नाहितर सीडीमधून ड्रायव्हर्स टाकायला लागतील.
संपर्कातून नंबर द्या.

हेलो
इकडे कोणी Motorola Backflip बद्द्ल review देऊ शकता का.
Does Motorola Backflip Support Video Calling & What is the cost.

सखी, ह्यासाठी तुला तुझ्या सिम प्रोव्हायडरशीच बोलावं लागेल. मलाही डोकोमो नेट चालु करताना असाच प्रॉब्लेम आला होता. त्यांची प्रोसिजर आहे एक. त्याने गेलीस तर नेट व्यवस्थित पीसीला कनेक्ट होतो.

अ‍ॅप्पल आयफोन ४ जी ३२ जिबि अमेरिकेतुन घेतला तर केवढ्याला पडेल??मी मुंबईत रहाते, इथे सर्विस कशी आहे??त्याची वॉरंटि वगैरे मिळेल की नाही?? बाकी फॅसिलीटि कशा मिळतील?? मुळात असा फोन घ्यावा की नाही? त्याचे फायदे तोटे कोणी नीट समजाऊ शकेल का??

योडि अरे गेले होते पण त्यांना नाहि काहि करता येत आहे. ते म्हणतात Samsung चा problem आहे.

असुदे,

तु सांगितल्याप्रमाणे ID आणि Password म्हणुन माझा नंबर टाकला आणि कनेक्ट केले. पण तरिसुध्दा खालील error येतेय.

sorry मी तुला खुपच त्रास देतेय..... Happy

a.JPG

नेटवर्क इश्यू आहे हा.

दुसरीकडे जाउन ट्राय कर.

अजून एक काम कर. डायल अप मध्ये #७७७ आहे तीथे. एखादा फोन नंबर टाक आणि डायल होउन रींग येत्येय का ते बघ. येत असेल तर १००% सर्व्हीस प्रोव्हायडरचाच प्रॉब्लेम आहे.

सखी, अमित म्हणतोय त्याप्रमाणे हा सर्विस्ट प्रोव्हायडचाच प्रॉब्लेम आहे. त्यांना कॉल करून ते सांगितील त्याप्रमाणे मोबाईल अन पीसी अश्या दोन्ही सेटींग रिसेट करून घ्याव्या लागतील.

अन हो मोबाईल मधे व्यवस्थीत चालतं का? सेम प्रॉब्लेम मोबाईल अ‍ॅक्सेसवर सुद्धा येतो ?

दुसरीकडे जाउन ट्राय कर.
>>
अमित सांगतोय त्याप्रमाणे एकदा करुन बघ. आणि तुझ्या सर्विस प्रोवायडर एन्डला कुणातरी टेक्निकल माणसासोबत बोलुन बघ. किंवा शक्य असल्यास नोकियाच्या सेलमध्ये कार्ड टाकुन चेक कर पीसीला कनेक्टीव्हीटी मिळतेय का ते. असं केल्याने तुझ्या लक्षात येईल प्रॉब्लेम सेलमध्ये आहे कि सिममध्ये ते.

सुकी, मोबाईल मधे नेट व्य्वस्थीत चालत. काहि प्रॉब्लेम येत नाहि. फक्त पीसीवर कनेक्ट होत नाहि.

योडि, तु म्हणतोस तस करुन बघितल पाहिजे (इतके दिवस कस सुचल नाहि Uhoh ) आता करुन बघते.

Dell Streak कसा आहे लोकहो ?

आज मोठ्ठा मोबाईल नेटत होतो तेव्हा झळकला. भारी वाटतोय एकदम

रोचीनने जो प्रश्न विचारलाय तोच मला पण विचारायचा होता.
अ‍ॅप्पल आयफोन ४ जी /३जी, ३२ जिबि अमेरिकेतुन घेतला तर केवढ्याला पडेल??मी पुण्यात राहतोय, इथे सर्विस कशी आहे??त्याची वॉरंटि वगैरे मिळेल की नाही?? बाकी फॅसिलीटि कशा मिळतील??तो अनलॉक करुन मिळेल काय?

Nokia C5 बद्द्ल काय मत आहे? नोकिया C5 आणि C6 मध्ये कुठला चांगला आहे? टच स्क्रीन आणि key pad फोन मध्ये कुठला घ्यावा? टच स्क्रीन वापरला नाही आहे, पण battery life बद्दल शंका वाटते.

Dell Streak कसा आहे लोकहो ?
>>
अँड्रॉईड २.२ आहे त्याला...
बाकी डेल चे फोन्स नवीन आहेत त्यामुळे बॅटरी लाईफ संबंधी जास्ती सांगता येणाअर नाही...

जर अँड्रॉईड घेऊन ऑनलाईन अ‍ॅप्स वापरायचा असेल तर दिवसातून दोनदाही चार्ज करायला लागतो (एचटीसी टॅटू, मॅजिक, मोटो माईलस्टोन, सोनी एक्सपीरिया एक्स-१०, सॅमसंग गॅलेक्सी-एस यांच्या अनुभवावरून)
जर अ‍ॅक्टिव्ह डेटा कनेक्शनशिवाय अँड्रॉईड वापरायचा असेल तर साधा फोन घे आणि वाचलेल्या पैशातून मला पार्टी दे...

२.२ ला अँड्रॉईडनी फ्लॅश १०.१ चा सपोर्ट दिलाय... आणि मुख्य म्हणजे इंटरनेट टीदरिंग सुरू केलंय...
(बाकी तो २.१ पेक्षा २ ते ५ पट फास्ट आहे म्हणे...)

रंगासेठ : आजकाल अ‍ॅपल च्या शोरूम मध्ये अनलॉक्ड आयफोन्स मिळतात. त्याला १ वर्षाची ईंटरनॅशनल वॉरंटी असते. मी नुकताच iphone 4 घेतला. युके वरून आणला माझ्या मेव्हण्याने. ६०० पाऊंड्स ला मिळाला ३२ GB. इथे आणल्यावर फक्त सिम कार्ड कट करून घ्यायला लागलं. बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे..... Happy

अ‍ॅक्चुअली जेंव्हा मी आयफोन ४ घ्यायचा विचार करत होतो, तेंव्हा व्होडाफोन च्या ऑफीसमध्ये चौकशी केली होती मायक्रो सिम कार्ड बद्दल. तेंव्हा त्यांनी मला सांगितलं की आत्ताचं सिम कार्ड तुम्ही घरी सुद्धा कट करू शकता आणि आयफोन ४ मध्ये वापरू शकता. हे सिम कार्ड कसं कट करायचं with proper measurements याची सचित्र मेल मला व्होडाफोन ने पाठवली. त्यानुसार घरी कात्री ने सिम कार्ड कापल्यावर फोन चालू झाला नाही. पुन्हा व्होडाफोन च्या ऑफीसमध्ये सुद्धा त्यांच्या लोकांनी प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी एका मोबाईल रिपेअरवाल्याकडे मशिन च्या सहाय्याने सिम कार्ड कट केलं आणि फोन चालू झाला.

मशिन म्हणजे जे फोटो कट करायला वापर्तो ते?? >>>>>> मला माहित नाही, कुठलं मशिन वापरलं ते. त्या सगळ्या पडद्यामागच्या करामती होत्या.

यात वोडाफोनची स्किम चालते का? कितीची ? कोणती? >>>>>>>>>> याची व्होडाफोन मध्ये चौकशी करा. डिटेल मध्ये माहिती मिळेल. माझ्याकडे व्होडाफोनचं कॉरपोरेट अकाऊंट आहे, त्यामुळे या डिटेल्स मला माहित नाहीत ................ Happy

मी परवाच samsung wave 525 घेतला. अजुन त्याच्याशी ओळख करुन घेतेय. पण एक त्रास म्हणजे देवनागरीत लिहिलेले दिसते पण अक्षर आधी आणि वेलांट्या नंतर असे होतेय.. आता हे कसे काय सुधारुन घेऊ ते सांगा राव.. मी युनिकोड कुठे दिसतो का ते पाहात होते पण दिसला नाही. कृपया मदत करा. मला मायबोली नीट दिसत नाहीये त्यामुळे.

कोणीतरी हेही वाचा रे... आणि मला मदत करा.......

@साधना, ईंटरनेट सर्फ करायला फोनमधे ओपेरा मिनी ब्राउजर इन्स्टॉल करून ट्राय कर, मला वाटते त्यावर 'मायबोली' नीट दिसेल. फोनमधे मराठी फॉन्ट साठी कुठेतरी 'सरल फॉन्ट' बद्दल ऐकले होते, सापडल्यावर त्याची लिंक देईन.

साधना, ईंटरनेट सर्फ करायला फोनमधे ओपेरा मिनी ब्राउजर इन्स्टॉल करून ट्राय कर

स्.स. चा स्वतःचा आहे बाउजर इंस्टाल केलेला. उगाच बदलायचा प्रयत्न करुन आहे तेही गमवेन... समसही तसेच दिसतात अर्धवट. ब्राउजरने समसचा प्रोब्लेम सुटणार नाही. त्यामुळे दोन्हीकडे पळेल असे काहीतरी सुचवा...

उगाच बदलायचा प्रयत्न करुन आहे तेही गमवेन... अस काही होत नाही, बहुतेक सर्व मोबाईल्स मधे ओपेरामिनी ब्राउजरमधे देवनागरी फॉन्ट निट डिस्प्ले होतो,

मराठी समोसेसाठी....... http://www.getjar.com/mobile/18661/indisms-for-samsung-gt-s5250-wave-ii/
..
.
.
जुन्या फोन मधे देवनागरी फॉन्टला निट सपोर्ट होता. नविन आलेल्या स्मार्टफोन मधे मराठी फॉन्ट म्हणजे 'पुढचे पाठ आणि मागचे सपाट' सारख झालय Angry

मि गेल्या महिन्यात नोकिआ c 5 घेतला , आज सकाळि पाहिला तर मोबाइल बंद ! Sad
चार्ज करुन पहिला दोन तास काहिच धाकधुक नाहि , काय झाल असेल?

थंडे, एकच महिना झाला आहे लगेच घेऊन ना नोकिया केअर मधे. वॉटर डॅमेज असेल तर काहीही होणार नाही पण इतर काही असेल तर तू तो फोन बदलून घे दुरूस्त करून घेण्याच्या ऐवजी.

C5 चांगला फोन आहे. तुझ्या फोन मधे काहीतरी मॅन्युफॅक्टरींग डिफेक्ट असेल चेक करून घे लागलीच.

थंड Lol मोबाईलची बॅटरी काढुन कॉन्टॅक्ट पॉईन्ट्स चेक/क्लिन कर, नंतर बघ चालू होतोय का, नाही झाला तर सर्विस सेंटर मधे घेवून जा

Pages