मला दिसलेले लवासा -फोटोफीचर

Submitted by लसावि on 9 November, 2010 - 03:19

या पावसाळ्यात लवासा सिटी पहायची संधी मिळाली. हे तिथलेच काही फोटो.
यातला प्रत्येक फोटो,
'व्वा, काय एक्झॉटीक लोकेशन आहे!!', 'ब्युटीफूल', 'सुंदर लँडस्केपिंग' इ.इ.
किंवा
'काय आयसोअर आहे!!', 'निसर्गावर अत्याचार', इ.इ.
अशा कोणत्याही नजरेने पाहता येईल.

तुम्हाला ते कसे दिसले ते जरुर सांगा!

टप्प्याटप्प्यावर डोंगर खरवडून तिथे घरांच्या रांगा केलेल्या आहेत

IMG_1335.jpg

तिथल्या मुख्य रस्त्यावरील काही तयार इमारती

build.jpgroad.jpgbund.jpg

कॉनव्हॉकेशन सेंटर

convoc.jpg

स्वस्तात मस्त परवडणारा चहा-भजी देणारे लवासातले एकमेव हॉटेल!
hotel.jpg

'विकासा'च्या जिन्यात खालच्या पायरीवर राहिलेला गावकरी
mama.jpg

गुलमोहर: 

आगावा छान रे...
शेवटच्या फोटोत तर मला , ( तो गावकरी न बघता ) त्या पायर्‍या खाली जाताना दिसताहेत...

>>शैलजा तुमच संपुर्ण ललित आगाऊंच्या एका फोटोत (शेवटचा) सामावलय बघा
नाही... सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.

शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी आगाऊ!

एवढ्या हिरव्यागार डोंगरावर घरे? त्या बिल्डिंग्स नेहमीसारख्याच दिसत आहेत. तेथे कोणी येउन राहणे अपेक्षित आहे लवासावाल्यांना?

योग Happy

सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.>>> Lol
त्यासाठी परेश लिमयेंशी संपर्क साधावा!!

>>नाही... सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.
हेच मनात आले होते! Lol

>>शेवटचा फोटोच सगळं सांगून जाणारा आहे.
हो ना! आणि अगदीच "खोलातच" शिरायचं तर त्या गावकर्‍याच्या बाजूला प्रचंड मोठं मॅनहोल (झाकणा सकट हे विशेष!))दिसतय...
आगावा, ईतकी बोलकी छायाचित्रं काढू नयेत, हुकूमावरून. Happy
-----------------------------------------------------------------------------------
आता विकास-वादी म्हणतील तसही मॅनहोल नसतं तर कुणाला फरक पडणार होता हेही तपासून पहायला हवं.

शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी आगाऊ! >>> अनुमोदन

पवईचे डोंगर खरडून जे हिरानंदानीने केले... तेच लवासावाले करत आहेत... माणसाने आपली पायरी सोडून निर्सगाशी वैर करू नये...

अरे तुम्ही असं काय म्हणताय. तुम्ही सगळे किती दांभिक आहात. स्वतः शहरात रहाता, परदेश प्रवास करता, गाडी वापरता (स्वतःची की सरकारची की अजून कुणाची..) आणि कार्बन फूटप्रिंट वाढवता पण इथे नागरीकरण नको. त्या बिल्डींगी म्हणजे वाटल्या काय तुम्हाला. जमिन गेलेल्या गावकर्‍यांना दिले जाणारे फ्लॅट्स आहेत ते.

(ज्यांना गरज वाटेल त्यांनी दिवे घ्या, ज्यांना गरज वाटेल त्यांनी Proud घ्या. काही घेतलंच पाहिजे असंही नाही म्हणा.. )

>>जमिन गेलेल्या गावकर्‍यांना दिले जाणारे फ्लॅट्स आहेत ते.

पण ते सिध्ध करायला एकतरी फोटो गावकरी घराच्या आत असलेला असा हवा ना.

ईतर लवासायाचित्रकारांनी कृ. याकडे लक्ष द्यावे Happy

सुंदर दिसतय 'लवासा' पण त्याच्या मागची बरीच कहाणी समजतीये आताशी.. Sad

आम्हाला पण कुणी प्रपोजल दिलं होतं तिकडे प्रॉपर्टी घेण्याकरता.. बरं झालं नाय घेतली ती .. मेरेको तो माबो से निकाला मिल जाता Happy देशनिकाला सारखं 'माबोनिकाला'

भारी! शेवटचा फोटो बोलका. मी अजून लवासा पाहिलेलं नाही. पण अ‍ॅम्बी व्हॅलीची आठवण झाली.

पण ते सिध्ध करायला एकतरी फोटो गावकरी घराच्या आत असलेला असा हवा ना.<<
छे छे काहीतरीच तुमचं. आम्ही म्हणतोय ना दिले जाणारेत तर दिले जाणारेत.

Pages