ऑप्शन्स ETC

Submitted by केदार on 26 February, 2010 - 11:44

F & O बद्दल माहिती.

F - Futures
O - Options

आज आपण ह्यातील ऑप्शन्स बद्दल बेसिक माहीती पाहू.

ऑप्शन म्हणजे एखादी अंडरलायिंग सेक्युरिटी (समभाग) एका भविष्यातील एका विशिष्ट किमतीला विकत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार/ हक्क. ( right to buy or sell) पण ऑप्शन विकत घेतले पाहीजे असे काही नाही. ते स्वेअर ऑफ करता येते. ह्या सर्व शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत, पण बाजारात हिच भाषा चालते म्हणून मी ती वापरत आहे.

Nifty_Option.png

वरिल चित्रात अन्डरलायिंग सेक्युरिटी हा निफ्टी इंडेक्स आहे. त्यातील कॉलम कडे लक्ष द्या.

अन्डरलायिंग - सेक्युरिटीचे नाव, उदा, LNT, F, Apple, DJX इ इ.
एक्स्पायरी डेट - भविष्यातील निश्चित तारीख. ह्या दिवशीचा तो करार. भारतात दर महिन्याचा शेवटाचा गुरुवार ही त्या महिन्याची एक्स्पायरी डेट, तर अमेरिकेत तिसरा शुक्रवार.
स्ट्राईक प्राईज - तुम्हाला ज्या किमतीला ती सेक्युरिटी विकली जाईल ती किंमत. वरिल चित्रात विवीध स्ट्राईक प्राईज आहेत. ४०००, ४४००, ४५००, ४९०० इ इ
लॉट साईज - म्हणजे क्वांटिटी. एक लॉट हा साधारण ५० चा (निफ्टीसाठी) LNT साठी २००. भारतात लॉट साईज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एका कराराची किंमत ही ( ५० X ४९०० ) स्टाईक प्राईज एवढी होते.
ऑप्शन टाईप कॉल
.

ऑपश्नचे चार प्रकार आहेत.

लाँग कॉल (विकत घेणे)
लाँग पुट (विकत घेणे)
शॉर्ट कॉल (विक्री)
शॉर्ट पुट (विक्री)

आता हे कॉल अन पुट काय आहेत? ते समजावून घेऊ या.

कॉल म्हणजे एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी विकत घेण्याचा हक्क, पण ती विकत घ्यायलाच पाहीजे असे बंधन अजिबात नाही. (the right but not the obligation)

पुट म्हणजे नेमके उलट एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी, विकण्याचा हक्क पण बंधन नाही.

ह्या क्रियेतून वरिल चार प्रकार निर्माण होतात. आणखी काही उपयुक्त गोष्टी.

इन द मनी - वरिल चित्र नीट पाहा. त्यात स्पॉट प्राईज ४९२२ आहे तर स्ट्राईक प्राईज ह्या वेगवेगळ्या आहेत. कॉल ऑपश्न साठी इन द मनी म्हणजे स्पॉट प्राईज ही तुमच्या स्टाईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ४८०० चा भविष्यातील कॉल करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

पुट ऑप्शन साठी मात्र हे उलट. म्हणजे स्पॉट प्राईज ही स्ट्राईक प्राइज पेक्षा कमी असते. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ५००० चा भविष्यातील पुट करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

आउट ऑफ मनी -
कॉल ऑप्शन साठी स्पॉट प्राईज (सद्य किंमत) ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा कमी असते. उदा निफ्टी सद्य किंमत ४९२२ पण तुम्ही जर ५००० चा कॉल विकत घेतला तर अजूनही हे ऑपश्न आउट ऑफ मनी आहे.

पुट ऑप्शन साठी उलट म्हणजे सद्य किंमत ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा निफ्टी स्पॉट ४९२२ पण तुमच्याकडे ४८०० किंवा ४९०० चा करार असला तर तो पुट आउट ऑफ मनी ठरेल.

पुढच्या भागात आणखी काही टेक्नीकल टर्मस जसे पाहू.

क्रमशः Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण सेल ऑर्डर एक्जेक्यूट न झाल्याने त्याचे कॅश प्रोजेक्शन दिसत नाहीये का? >> हो सेल ऑर्डर तू जर लिमिटने दिली असशील तर ती एक्जेक्यूट न झाल्यामुळे अजूनही तुझ्याकडे पोझिशन ओपन आहे.

जागो - टाईम डिके पर्यंत गाडी आलीच नाही, >> कारण लेख क्रमशः आहे, पुढे मग वेळ नाही मिळाला, आणि ऑप्शन च्या आधी साधे टेक्नीकल्स समजावून द्यावेत म्हणून ती मालिका सुरु केली. खरेतर ऑप्श्नस च्या स्टॅटेजी पण इथे लिहल्या नाही अजुन.

णखी एक अतीमहत्वाचे, कधीही मार्केट ऑर्डर शक्यतो देऊ नये. >> ह्या बद्दल मी सिलेक्टिव आहे, काही काही स्टॉक्स, फ्युचर्स व ऑप्शन्स ना मी मार्केट ऑर्डर देतो. (फ्युचरला खूप जास्त वेळा) पण त्याचे कारण असते. शेअर मार्केट डायनॅमिक असल्यामुळे इथे एकदम ठामपणे काहीच करता येत नाही. ते त्या त्या मार्केटवर अवलंबून आहे.

जागो - टाईम डिके पर्यंत गाडी आलीच नाही, >> कारण लेख क्रमशः आहे, पुढे मग वेळ नाही मिळाला, आणि ऑप्शन च्या आधी साधे टेक्नीकल्स समजावून द्यावेत म्हणून ती मालिका सुरु केली. खरेतर ऑप्श्नस च्या स्टॅटेजी पण इथे लिहल्या नाही अजुन. >>>> लेखाची गाडी पुढे जाईना त्यामुळे आमची पण ट्रॉलीपण अडली Happy म्हणून ऑप्शन काय आहे ते जरा प्रत्यक्ष करून पाहीले.

३० सप्टें पासून निफ्टी ६००० च्या वरच आहे.६१०० च्या वरही होता. आता मी दिलेली ऑर्डर सध्या स्क्वेअर ऑफ करावी की तशीच ठेवावी-जागो म्हणतो तसे -डिके होण्यासाठी?
या उदाहरणावरून साधारण स्ट्रॅटेजी समजावून सांगितली म्हणजे बरे होईल! Happy

8.jpg

वरील चित्रामध्ये Call Option आहे. आणि खालच्यात Put Option आहे.

9.jpg

१) Call Option मध्ये जास्त स्ट्राईक प्राईस ला मार्केट प्राईस खूप कमी तर कमी स्ट्राईक प्राईस ला मार्केट प्राईस जास्त आहे.
स्ट्राईक प्राईस :१)६८०० २) ६२०० ३) ५१००
मार्केट प्राईस : १)४.३५ २)९१.९५ ३)९८०
याच्या बरोबर उलट सिन्यारियो Put Option ला दिसतो.

हे का?

२) वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस ला खरेदी केल्यास त्याप्रमाणे आपल्या नफ्यात /तोट्यात फरक पडतो का?

टाइम डिके माहीत नसताना ऑप्शनच्या रुळावर गाडी सोडायचीच नसते.. अर्धे अधिक पाणी आणि कोळसा धूर होऊन गेले आणि मग टाइम डिके म्हणजे काय हे समजले तर त्याचा काय फायदा? Happy

एफ ओ सेटलमेंट डे शेवटच्या गुरुवारी असते.. साधारण २७-२८ तारखेला असते. म्हणजे ३० पैकी ३ दिवस गेले. उरलेल्या दिवसात ८ शनि रवि आणि एखादा सुट्टीचा दिवस. म्हणजे प्रत्यक्षात १८ च दिवस ट्रेडिंगसाठी हातात उरतात. वरच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर यातच दडलेले आहे.

समजा , निफ्टी आता ६००० आहे. ६२०० चा स्ट्राइक प्राइसचा कॉल ९१ रुपयाला आहे. याचा अर्थ शेवटच्या दिवशी ६२९१ च्या वर निफ्टी झाला, समजा ६३००, तर ६३००-६२०० हा फायदा १०० रु चा त्याला होईल. ९१ रु ही खरेदी आणि १०० हा विक्रीचा आकडा. म्हणजे ९ रु फायदा.

आता, ६८०० चा कॉल जर ९१ ला एखादा विकत घेईल, तर तो वेडा म्हणावा लागेल. कारण निफ्टी ६८९१ झाला तरच त्याला फायदा होईल. त्यामुळे अशा कॉलची किंमत कमीच असणार ना? आणि त्यातही समजा जर निफ्टी वरच्या उदाहरणाइतकाच राहिला ६२९१ तर हा कॉल बुडाला. तो शून्यच होणार. ६१०० ला निफ्टी असताना ६८०० च्या कॉलला जास्त किंमत येणारच नाही कारण हातात दिवस कमी असतात.

कॉलची किंमत दोन गोष्टींवर ठरते.
१. स्पॉटचा भाव.. म्हणजे बाजारचा आताचा भाव. म्हणजे निफ्टी ६१०० आहे. तर ६१०० आणि त्याच्या खालच्या किंमतीना कॉलची किंमत जास्त असते. निफ्टी ६१०० असताना ६००० च्या कॉलला जास्त किंमत असणार . कारण ऑलरेडी तो १०० रु प्रॉफीटला आहे.... त्यामुळे त्याची किंमत १०० पेक्षाही जास्त असणार. ५९०० च्या कॉलमध्ये २०० रु नफा आताच आहे, म्हणून तो २०० च्या वर असणार. म्हणूनच स्ट्राइक प्राइसच्या खालच्या कॉलना इन द मनी कॉल म्हणतात. याउलट स्ट्राइक प्राइस जास्त असणार्‍या कॉलबाबतीत असते. निफ्टी ६१०० असताना ६२०० चा कॉल सध्या ० फायद्यात, कारण ६२०० च्या वर निफ्टी गेला तरच फायदा. त्यात पुन्हा कॉलची किंमत ३० रु असेल, तर त्याच्याही वर निफ्टी गेला तरच प्रिमिय्म वसूल होणार. म्हणून अशा कॉलना आउट द मनी कॉल म्हणतात.

२. हातात असलेला काळ : निफ्टी ६१०० असताना सध्या ऑक्टो चा ६२०० चा कॉल ९० रु ला आहे. तर नोव ६२०० चा कॉल १३०-१४० असा असेल. कारण साधे आहे. ऑक्टोबरचा कॉल २८ ऑक्ट ला संपणार. पण नोव्ह. चा कॉल अजुन एक महिना राहू शकतो. म्हणून ऑक्टोबरचा महिना चालू असताना नोव आणि डिस चे कॉल आणखी महाग असणार. चार्ट पहा, म्हणजे कळेल.

पुटच्या बाबतीत हीच गणिते उलट होतात.

तुमचा तो कॉल सध्या किती झाला आहे?

दुसर्‍या प्रश्नाचे बरेचसे उत्तर वर आलेले आहेच.

तरी काही मुद्दे मांडतो.

स्ट्राइक कोणतीही असू दे, स्ट्राइक + प्रिमियम याच्या वर निफ्टी गेल्याशिवाय कॉल मध्ये फायदा मिळणार नाही, हे पक्के लक्षात करा. म्हणजे कोणता स्ट्राइकचा कॉल घ्यायचा हे आपोआपच लक्षात येईल. त्यात हातात किती दिवस आहेत, मार्केटचा साधारण ट्रेंड काय आहे, याचा विचार करा आणि मग निर्ण्य घ्या. प्रिमियम किती भरतो, यापेक्षा तो वसूल होण्याचे किंवा बुडण्याचे चान्सेस किती आहेत, हे जोखणे महत्वाचे.
निफ्टी हा आय टी, मेटल , बँक अशा महत्वाच्या शेअर वरच ठरतो, त्यामुळे या क्षेत्रातील माहिती रोज पाहून निर्ण्य घेणे.

लाँग टर्मचे चार्ट याबाबतीत कुचकामी असतात.. कारण लाँग टर्मचा चार्ट भले पुढच्या वर्षी निफ्टी ९००० होणार असे दाखवेल. पण त्याचा अर्थ २८ ऑक्टोबरला तुमच्या ६२०० च्या कॉलच्या वरच तो राहील आणि तुम्ही त्याच्या ४ दिवस आधी कितीही प्रिमियमला तुम्ही तो विकत घ्या, तुम्ही फायद्यातच याल , याची ती हमी नसते. Happy ऑप्शनसाठी बाजाराचे वारे समजणे महत्वाचे.... ऑप्शन म्हणजे १०-२० दिवसाची 'मजा' असते. अशा वेळी कुंडली काय कामाची? Proud त्यामुळे चार्ट एक तर शॉर्ट टर्मचे समजून घ्यावेत, जे बर्‍याच वेळेला फसवे ठरतात. आणि लाँग टर्मचे कुचकामी असतात. Happy

केदार, अय सी आय सी आय मध्ये चार्ट-ग्राफ पहायची सुविधा आहे का? पूर्वी वेब साइटवर लिंक असायची.... फ्री ... आता बहुतेक फक्त कस्टमरना अकाउम्ट मध्येच ग्राफ दिसतो आहे असे वाटते. अ‍ॅक्सिस डायरेक्ट या नावाने अ‍ॅक्सिस बंक सुद्धा असे अकाउम्ट काही दिवसात सुरु करणार आहे म्हणे.

मी काल तो ६९.९० ला स्क्वेअर ऑफ केला.

10.jpg

वरच्या चित्रात दिसते त्याप्रमाणे मला ६४६ च नफा झाला असे मला वाटते! बरोबर ना?

अभिनंदन... Happy रिअल प्रॉफिट आले.. अनरिअलचा कॉलम मोकळा आहे.. आता तरीही या कॉलवर लक्ष ठेवा. शेवटच्या दिवशीच्या प्राइसवर लक्ष ठेवा...

परवादिवशीच्या कॉलबरोबर तुलना करा.. निफ्टी ६०६६ असताना कॉल ४५-५० रेंज मध्ये होता.

आता निफ्टी ६०६१ आहे. जवळपास तेवढाच. पण कॉल मात्र ३०-३७ मध्ये आहे. कारण टाइम डिके.

केदार.

nt.JPG

एन टी पी सी ची कुंडली पाहिली का? सप्ट ऑक्ट मध्ये हेड & शोल्डर पॅटर्न दाखवत आहे... माझ्या अंदाजानुसार हा सिग्नल बेअरिश -मंदीचा असतो... आता या महिन्यात बहुधा १९० च्या खाली जाईल..... शॉर्ट ला चांगला आहे... Happy

थोडेफार शिक्षण झालेय तर आता एक Nifty short strangle केले आहे.
Nifty Dec 6600 Call Sell and Nifty Dec 5700 Put Sell.
बघुया एक्स्पायरी ला काय होतेय. रेन्ज तशि बरीच ब्रॉड आहे. त्यामुळे ४८०० च्य आसपास फायदा व्हायला हवा.

शिक्षण कुठून घेतलेत? कोर्स असेल तर सांगा.......... नोव्हेंबर असताना डिसेंबर का घेतले? स्पेसिफिक रीजन आहे का?

ICICIDirect चे कोर्सेस आहेत. पण मी सध्या त्यांच्याच वेब्साईटवरुन अभ्यास केला. डेरिवेटिव स्ट्रॅटिजी अशी एक लिन्क पण आहे. वरची स्ट्रॅटिजी त्यांनीच सुचवलेली आहे.

या दोन्ही सेल पोजिशन असल्याने ४३००० मार्जिन आहे.

६६०० चा कॉल ४२.८ तर ५७०० चा पुट ५७.२ ला सेल केला त्यामुळे टोटल इन्फ़्लो आहे ४७८० (ब्रोकरेज वजा जाता).
प्रिमिअम=४२.८+५७.२=९९.९.

त्यामुळे एक्स्पायरी च्या दिवशी ; ६६००+९९.९=६६९९.९ च्या खाली आणि ५७००-९९.९=५६००.१ च्या वर निफ़्टी असला तर ही स्ट्रेटेजी फ़ायद्यात असेल. टोटल फ़ायदा अर्थातच ५०*९९.९-ब्रोकरेज म्हणजेच ४७८०.

NTPC will be down ( when it was 195.....)

now NTPC is below 188 Happy

केदार,सुरेश,जमोप्या...

मी आधी लिहीलेली स्ट्रॆटेजी Short Strangle मध्ये दोन्ही पोजिशन या OTM होत्या.
जर त्या पोजिशन ITM घेतल्या तर काय व्हायला पाहीजे?
पोजिशन खालील्प्रमाणे:

Sell :Nifty 5900 Nov Call at 121
Sell : Nifty 6300 Nov Put at 288

Premium received per share : 121+288=409

वरील Strategy बद्दल माझे पर्सेप्शन असे आहे:

Profiability range: (5900+409=)6309 to (6300-409=)5891
Max profit range :5900 to 6300
Max profit : 50x409= 20450 (brokerage not considered)

हे बरोबर आहे का? expiry ही शेवटच्या दिवशी ३.३० नन्तर होते का?

expiry च्या वेळेस Put ची Time Value काय होते?

Sell :Nifty 5900 Nov Call at 121
Sell : Nifty 6300 Nov Put at 288
असे करु नये...

१. निफ्टीचा ५९०० चा कॉल १२१ ला विकला.... म्हणजे निफ्टी ५९०० च्या खाली राहिला तरच तुम्ही फायद्यात.

२. निफ्टीचा ६३०० चा पुट २८८ ला विकला, तर निफ्टी ६3०० च्या वर राहिलात तरच तुम्ही फायद्यात.
म्हणजे पहिले झाले तर दुसरे तोट्यात आणि दुसरे झाले तर पहिले तोट्यात्....तेही प्रिमियमच्या किती तरी जास्त प्रमणात....

आउट ऑफ मनी ऑप्शन च्या व्यवहारात रिस्क कमी आणि प्रॉफिटही कमी असते... इन द मनीत दोन्ही जास्त असते....

Pages