कवितेची ओळख

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी सांगतो त्यांना कविता निवडायला
आणि मग ती प्रकाशाकडे धरायला
जणु काही एखादा फोटो ...
किंवा कानाला लावून पहा म्हणतो !

सोडा एक उंदीर कवितेत आणि पहा कसा
तो येतो बाहेर शोधून त्याचा रस्ता.
किंवा हिंडा कवितेच्या दालनात,
दिव्याचे बटण शोधित भिंती चाचपडत !

मला वाटते त्यांनी करावे स्किईंग
कवितेच्या पृष्ठभागावर,
एका बाजुला असलेल्या
कवीच्या नावाला हॅलो म्हणत !

पण त्यांना मात्र ते काही नाही रुचत ..
घेतात ते कविता,
बांधतात एका खुर्चीला आणि
छळ करुन मिळवतात कबुलीजवाब !

जुन्या गादीतला कापुस काढावा
काठीने झोडपून,
तसा काढतात अर्थ कवितेतून !!

(बिली कॉलीन्स यांच्या ईंग्रजी कवितेचा अनुवाद)

प्रकार: 

आशीष, माझी आवडती कविता आहे ही. धन्यवाद. Happy

ही मूळ कविता :

Introduction To Poetry

I ask them to take a poem
and hold it up to the light
like a color slide
or press an ear against its hive.

I say drop a mouse into a poem
and watch him probe his way out,

or walk inside the poem's room
and feel the walls for a light switch.

I want them to waterski
across the surface of a poem
waving at the author's name on the shore.

But all they want to do
is tie the poem to a chair with rope
and torture a confession out of it.

They begin beating it with a hose
to find out what it really means.

--------------------------------------------------

>>> author's name on the shore
कवीचं नाव तिथे लांब किनार्‍यावर राहिलं. आपल्याला खेळायचं आहे ते कवितेच्या तरंगांवर! त्याला ओळखीचा हात जरूर करा, पण आता खेळात तो नाही हे ही ध्यानात असू दे. Happy

>>> take a poem
and hold it up to the light
like a color slide

हे वाचतांना E. E. Cummingsच्या "The Symbol of all Art is the Prism. The goal is destructive. To break up the white light of objective realism into the secret glories it contains." याची आठवण झाली.

काडीने की काठीने?
बाकी मुळ कविता व अनुवाद दोन्ही सुंदर! आवडले!
कविता साधी पण अर्थपुर्ण; अगदीच झोडपून अर्थ काढायची गरज नाही! Happy

@स्वाती, धन्यवाद annotations करता.
@mayuresh, दोहोमध्ये नेमका काय फरक आहे?
इतरांनाही धन्यवाद.
Wondering minstrels ही माझी ईंग्रजी कवितांची आवडती जागा.
ही पण पहिल्यांदा तिथेच वाचली.

mayuresh, दोहोमध्ये नेमका काय फरक आहे?>>>
फरक आहे म्हणून तर ते दोन वेगळे शब्द आहेत मराठीत!
'काठ्या-काठ्या जमवून चिमणी घरटे बांधते' वा 'घराबाहेर पडताना आजोबा काडीचा आधार घ्यायचे'
वरची ही वाक्य जमतायत?
काठीने झोडपतात कापूस वगैरे हे ऐकिवात आहे, पहिलेही आहे. काडीने नव्हे, ती उकरायचे, टोकरायचे, कोरायचे.. वै. वै. काम करेल.. झोडपायचे जरा अतिच!
तरी आपणांस वाटत नाही तर हरकत नाही! Happy

हे काय नविन चालू केलय आशिषनी.. विंग्रजी कवितांचे अनुवाद...
ते पण एकदम जबरी... (लेखांइतक्या क्रिप्टीक नाहीयेत पण कविता... )

कोण म्हणतो मराठीला वाईट दिवस आले आहेत?

जोपर्यंत इंग्रजी , हिंदी मधे कविता लिहील्या जात आहेत, तोपर्यंत मराठी कवितेला मरण नाही.

आता काडी, काठी असा शब्दच्छल करत बसण्यापेक्षा, मला वाटते मराठी कवितेत पण मूळचेच इंग्रजी शब्द वापरावेत. म्हणजे बोलताना जसे करतो तसे. कारण, म्हणजे अर्थ जास्त स्पष्ट होतो. उगाच मराठी शब्द कशाला शोधायचे? उदा. "छान आहे, आवडले, उत्तम" असे लिहीण्यापेक्षा 'क्लास' असे लिहीले की झाले. ज्यांना कळत नाही त्यांनी आबुदोस!

माझा मर्‍हाठाचि बोलु कवतिके, परी अमृतातेहि पैजा जिंके. आणि आता तर परकीय भाषेतील शब्द घेऊन मराठी अधिकच प्रगल्भ, समृद्ध झाली आहे. अमृतच काय, एलिक्झिर ऑफ लाईफ शी पण बेट जिंकेल!! शिवाय किती सोपे! मराठी शिकायची, वाचायची गरज नाही!!

Happy Light 1