माझ्या ऑफिसातली रांगोळी स्पर्धा

Submitted by साधना on 5 November, 2010 - 12:06

दिवाळीनिमित्त ऑफिसात रिटेल टिमने रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या ब्लॉक्सनी आधी रांगोळ्या घातल्या होत्या, त्यांचे आयोजन वेगळे होते आणि हे आयोजन वेगळे होते. इथे सगळ्यांना २x२ चा चौकोन दिला आणि फक्त ५ रंग दिले, कोणाला चाळण किंवा इतर काही वापरायचे असेल तर ते त्यांचे त्यांनी आणायचे. रंग मात्र दिलेलेच वापरायचे असे बंधन होते. दिलेल्या रंगात मिठ, तांदुळ किंवा इतर काही मिसळायचे स्वातंत्र्य होते.

खाली रांगोळीत गढलेल्या रांगोळीवीरांचे फोटो

वेळेचे बंधन नव्हते, तरी तासाभरात पुर्ण झाल्या सगळ्या रांगोळ्या. यातल्या पारितोषिक विजेत्या रांगोळ्या.
प्रथम क्रमांक -

द्वितिय क्रमांक -

तृतिय क्रमांक -

माझ्यामते पारितोषिकाला लायक असलेल्या रांगोळ्या -

पण आयोजकांना संस्कारभारतीच्याच रांगोळ्या जास्त आवडल्या बहुतेक Sad
बाकीच्या ब-यापैकी घातलेल्या रांगोळ्या -

(ही रांगोळी घालताना आधी ग्रिड काढुन घेतले आणि मग त्यावर रांगोळी काढली. मला बराच वेळ नक्की काय काढलेय त्याचाच पत्ता लागत नव्हता Happy )


ही मिठ रंगवुन घातलीय.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला त्या पारितोषिकाला लायक मधल्या पहिल्या दोन खूप आवडल्या. हरणाची/बारशिंगी वाली रांगोळी मस्त आली आहे एकदम.

माझं पण रुनीला अनुमोदन !
नंबर दिलेल्या पेक्षा ती पाणी घेऊन जाणारी बाई, हरिणांची रांगोळी आणि निळा गणपती जास्त सुन्दर आहेत !
काय सुन्दर रांगोळ्या आहेत एक एक.. तुझ्या ऑफिस मधे एक से एक कलाकार आहेत, सांग त्यांनी आमचा फीडबॅक !!

मला द्वितीय पारितोषीक मिळालेली आणि पारितोषिकाला लायक मधल्या, पहिली , दुसरी आणि पाचवी खुप आवडल्या.

पाणीवाली बाई जरा जास्त रेखीव हवी होती. हरणे सुंदर आहेत.
संस्कार भारतीची डिझाईन्स चांगली दिसत असली तरी त्याला खुप प्रमाणात रांगोळी व रंग लागतात. (आणि आता त्यात तोचतोचपणा जाणवतो.)
पण काहिही असले तरी, अशा पारंपारीक कला अजून जपल्या जाताहेत, हेच खुप आनंददायी आहे.

छान आहेत रांगोळ्या.
संस्कारभारतीच्या रांगोळ्यांचं वैशिष्ट्य काय असतं?