प्रेमात पडला वँपायर ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 November, 2010 - 03:47

आमची प्रेरणा

एक वँपायर म्हणे प्रेमात पडला...
प्रेमाच्या आवेगात वेडा ...
आपल्याच प्रेयसीचे रक्त प्यायला....
कालच कुणीतरी त्याला...
.....
......
सहाराच्या HIV testing center बाहेर तोंड लपवताना पाहीला.....! Proud

इरसाल म्हमईकर

Biggrin Biggrin Biggrin

"रक्त प्यायल्याने HIV होत नाही">>> असाच काहिसा प्रश्न मी एका AIDS बद्दल ट्रेनींग द्यायला आलेल्या ट्रेनर ला विचारला होता, की मच्छर चावल्याने AIDS पसरू शकतो का? त्या माणसाने निट उत्तर दिले नाहीच उलट भर क्लासमधे माझ्यावर भडकला Sad

..

खरी कैच्याकै कविता !!!

प्रसिक | 2 November, 2010 - 12:20 नवीन

मच्छर चावल्याने AIDS पसरू शकतो का?>>>> नाही..... पण मच्छराला तर होईलच ना?

>>>

च्यायला , मुळ विषय वॅम्पायर आहे की AIDS Proud

..

तुम्ही काय करत होता तिकडे इरसाल राव? >>>>.

गिरायिक शोधत हुतो राव. नवा धंदा सुरु केलाय बंगाली बाबाचा Proud

व्हँपायर म्हणजे ड्रॅक्युलाची मिसेस ना?>>>>>

आशु, बाई किती गं तु भोळी... वँपायर म्हणजे एक काल्पनिक रक्तशोषक प्राण्यांची (सजीव्/निर्जीव) जमात आहे.... तो बाबा किंवा ती बाई काहीही असु शकते....
(अवांतर : 'ते' वँपायरही असु शकते)
हा शब्द मुख्यत्वेकरुन वँपायर बॅटसशी संबंधीत आहे. वटवाघळांची एक रक्त पिणारी जात खरोखर अस्तित्वात आहे. त्यांचा पिशाच्चाशी काही एक संबंध नाही. त्यावरुन बहुदा वँपायर हा शब्द आला असावा.

Lol धम्माल चाललेय नुस्ती... मला व्हँपायर म्हटलं की ते अ‍ॅमवे चेन मार्केटिंगचीच आठवण येते... नवनवीन गिराईकं शोधण्यासाठी जीवाचं रान करत अस्तात.. हल्के घ्या, मस्करीत म्हणतेय.. Light 1 Happy

व्हँपचं स्त्रीलिंग म्हणजे व्हँपायर वाटलं असेल

>>>

व्हँपचं स्त्रीलिंग म्हणजे व्हॅम्पाई ...मुंबई सारखं ....(कैच्याकै) Proud

मला व्हँपायर म्हटलं की ते अ‍ॅमवे चेन मार्केटिंगचीच आठवण येते>>>> शॉल्लेट पंच ड्रीम...., अगदी खरय Proud

Pages