निळा सागर
.... .. .. .. .. ... ... ..
.. .. .. .. .. .. .. .. .. .. . ....
.... .. .. .. .. ... ... ..
.. .. .. .. .. .. .. .. .. .. . ....
आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे.
जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ.इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केलेही असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!!