पेशवा यांचे रंगीबेरंगी पान

तुझ्यासारखी माणसे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी

माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा

तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने

माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे

प्रकार: 

'चिमार'

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'चिमार'
ही गाठ शब्दाला आलेली (अस एक मत)
व्यक्त करण्याकरता तिलाच पुढे धरा
व्याकरणात ती बसत नाही
कुठेतरी बसावा असेही नाही
एखादे चिंब भारले पण
एखादं फळासारखं दुःख
ह्यांच्या तळव्यावर ठेवण्यास उत्सुक आहे
बिया कोया पाने फुटणारी मुळे
झारी धरणारे हात
गंजलेले पण सर्वव्यापी
ह्यांचया कुळातील
कदाचित
पण माहीत नाही!

'चिमार' ही परंपरा आहे
आत्मसात करून
स्वतः रंग होऊन
ओतून घेण्यास आसुसण्याची
कदाचित
पण तेही मला नक्की माहीत नाही

--------------------------------

प्रकार: 

रुद्रायन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

असा शब्द सहज भेटायला आल्यावर काय करायचे?
जाणुन घ्याय्चे त्याचे अंतरंग
त्याचे भाजलेपण
त्याचे अस्तित्व?

असे अर्थलागण न झालेले शब्द
जमवतोय मी... उल्कांचे अवशेष
पण वापरतोय परिचित हत्यार
यमक गमक मात्रा व्रुत्ते अलंकार
त्यांच्या जपणुकिसाठी

सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात ...
खुप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!

रुद्रायन हे निराकार आहे!
अशा रचनेचा अर्थ काय लावाल
बापड्यांनो?

------------------------------------

प्रकार: 

श्वास पडले कमी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

डोहात चांदणे,चांदण्यात मी
वेचता वेचता श्वास पडले कमी

रे भोगतो जरी स्वप्न शिक्षेपरी
पापण्या जोडतो रोज स्तवनात मी

जा घाल रे सुखा मला तू शिव्या
साथ वेदनेचा ना सोडणार मी

पंख दुबळे जरी सूर्य-झेप मनी
स्वप्न घाण्यास इथल्या ना जुंपणार मी

दिसता वेगळे रूप ह्या दर्पणी
सोड हा देह!वाचली नोटीस मी

अंग भोगमग्न हे जामे मलमली
नग्न आत्म्याचा दोष दिला कृष्णास मी

प्रकार: 

बोलावणे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

दिवस बदलत गेले शब्दा मधून माझ्या
नव्या व्याख्यांच्या ऐरणीवर घाव सोसतोच आहे
अर्थ पाळलेली सारी दारे "सावधान" च्या पाट्यांमागे...
तुमच्या गळ्यात शब्दांनो पाहतो मालकीचे पट्टे घट्ट रुतणारे
तुमच्या गुरकावण्यातले इमान ? लाळ गाळतेच आहे
चेहरे रेखलेली सांज नायकिणीच्या घरी
आज शब्दांचा गाव सारा लालदिव्यांचा बाजार आहे....
विकले नाहीच ज्यांनी इमान आपले कसल्याच अर्थाला
अशा शब्दांचा प्रदेश कोण्या अज्ञाताच्या दिशेला ...
ह्या मिथकाच्या वाटेवरचा एक हत्ती
पिसारा फ़ुलावून कित्येक दिवस खुणावतो आहे!

प्रकार: 

देवा

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मना दाटते सुख, देव पुन्हा घरा आले
काळोखाच्या भय-स्वप्नी तांबडे आभाळ झाले

वाट चुकलेला कोणी, शोधतो काय जाणे?
उरले न त्याचे काही, काय देणे काय घेणे?

कवटाळ घट्ट घट्ट गुदमरे श्वास येथे
भेट तुझी होता देवा, मोकळे भान झाले...

दर्पणात बघतो प्रतिमा देवपणा लाभलेली
तुझ्या-माझ्या मधे कशी द्वैत-काच आडवी उभी?

प्रकार: 

जगभरातील मृत-जीवंत लिप्या

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

जगभरातील पुरातन लिप्यांची थोडक्यात ओळख. ब्राह्मी लिहायला शिकत येइल कदाचीत... जुने टी.म.वी चे दिवस आठवले Happy

जगभरातील पुरातन लिप्या

विषय: 
प्रकार: 

जगभरातले गणिती

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

जगभरातील गणितींच्या बायोग्राफीज येथे वाचावयास मिळतील. काही भारतीय गणीती ह्यात सापडतीलः
जास्त वाचल्या गेलेल्या बायोग्राफीज
बायोग्रफीजची जंत्री -५००एडी - सद्यकाल

विषय: 
प्रकार: 

मन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातांवरचे फोड
चाके लावून किल्ली देऊन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राइव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतून
ओतत राहतात थकलेली बिले...
उपसत राहतो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत राहते फट माझ्या कर्दळ-कातडी मध्ये
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणून कदाचित लाचार म्हणून देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जागोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावाने

प्रकार: 

महाराष्ट्रदिन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.

केतकर उवाच

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पेशवा यांचे रंगीबेरंगी पान