व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही......

Submitted by ASHOK BHEKE on 24 May, 2021 - 11:54
राजन सावंत

प्रिय राजन सावंत......

अस्त

Submitted by गणक on 22 May, 2021 - 14:27

अस्त

खंगलो उध्वस्त नाही !
झिंगलो मदमस्त नाही !

मीच भेटे ना मलाही ,
एवढा मी व्यस्त नाही !

विकत घ्यावे मज् कुणीही ,
एवढाही स्वस्त नाही !

बघ अवेळी येत आहे ,
आठवांना शिस्त नाही !

गाल देऊ मार खाण्या ?
मी तसा "नेमस्त" नाही !

रक्षका कर तूच चोरी ,
जर इमानी गस्त नाही !

तो कधी ना भेटला जो ,
आपल्यांनी त्रस्त नाही !

मी रवी आहे उद्याचा ,
कोंबड्यावर भिस्त नाही !

ओळ सुचली वाटले मग ,
आज माझा अस्त नाही !

वृत्त - मनोरमा (गालगागा गालगागा)

( सूचनांचे स्वागत )

वेणुपुत्राची गाथा

Submitted by झुलेलाल on 20 May, 2021 - 13:45

आपल्या वाटणीला आलेलं भाग्याचं संचित नियती कशी क्रूरपणे हिरावून घेते... सुनील देशपांडे यांच्या आनंदी सहवासाचं भाग्य मला गेल्या काही वर्षांत लेखनाच्या निमित्ताने लाभलं. आज सुनीलजी आपल्यात नाहीत, ही दु:खद बातमी कळली. शरीरातल्या रक्ताची एक थंडगार शिरशिरी शिरापासून पायापर्यंत सरसरत सरकली, आणि मन सुन्न झालं...

तो ही माणूस निघाला ! (विधाता)

Submitted by गणक on 8 May, 2021 - 05:59

तो ही माणूस निघाला !

"चव" घेता तेव्हा कळले "तो" कडवट ऊस निघाला !
मी माणव समजत होतो तो ही "माणूस" निघाला !

शब्दांच्या बाजारी ना मन माझे विकले गेले
किंमत मोठी होती की ग्राहक कंजूस निघाला !

लोकांना दिसली माझी झोळी मोठीच सुखाची
उचलून जरा ती घेता हलका कापूस निघाला !

क्षण आनंदाचा कुठला चिरकाल कधी ना टिकला
श्रावण माझा हा सरला अन् तो ताऊस निघाला !

"संत्रीची" घेत जराशी बोलून खरे ते निजले
मी जागा, हाती माझ्या संत्रीचा ज्यूस निघाला !

लावून मुखोटे मजला नुसतेच लुबाडत होते
वर दिसण्या तांबुस पिवळा खोटा हापूस निघाला !

बुशरा अन्सारी- पाकिस्तानी कलाकार

Submitted by बाख on 8 May, 2021 - 05:17

युवा कीर्तनकार महिला : हभप शिवलीला ताई पाटील महाराज

Submitted by ------ on 4 May, 2021 - 00:34
shivleela tai patil

ह भ प.
म्हटलं की डोक्यात पगडी घातलेले , घा-या डोळ्यांचे, गो-या रंगाचे , साठी उलटलेले , धोतर नेसलेले बुवा डोळ्यासमोर यायचे. गेल्या वीसेक वर्षात हे चित्र पालटले. कीर्तन म्हटलं की अभिजन या प्रतिमेला छेद गेला. त्याला कारणे देखील आहेत. परंपरागत व्यवसाय म्हणजे धार्मिक विधींचे पुरोहित, गुरूजी यासाठी अभिजन वर्गात मनुष्यबळ नाही. उच्चशिक्षण आणि परदेशी करीयर यामुळे उलट कुणी या व्यवसायात आलाच तर त्याला अर्थार्जनाची संधी आहे परदेशी.

आत्मविश्वास कसा वाढवावा ? न्यूनगंड कसा कमी करावा?

Submitted by अजय on 10 March, 2021 - 23:45

कधीकाळी माझ्यातला आत्मविश्वास एकदम कमी झाला होता. तो मी प्रयत्नपूर्वक वाढवू शकलो. त्या टप्प्यातनं जाताना मला उपयोगी पडलेल्या या काही युक्त्या. मी डॉक्टर/ मानसोपचार तज्ञ नाही . या युक्त्या मी नुसत्या वाचलेल्या नसून मी प्रत्यक्षात वापरून मला त्याचा फायदा झाला आहे.

शब्दखुणा: 

गणितज्ञ गुरू लाभलेला एक इंजिनिअर कलाकार

Submitted by दिनेशG on 9 March, 2021 - 04:31

तुमची आवड हाच तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला ‘काम’ करायला कधीच लागत नाही. जे आपण करता ते अगदी मनापासून आपसूकच आपल्या हातून घडते. परंतु कितीतरी असे लोक आहेत की ते आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतर करण्यास कचरतात. आपण कितपत यशस्वी होऊ याची भीती त्यांच्या मनात असते. दोन दशकांच्या पेक्षा जास्त इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना शिकविल्यावर एक गोष्ट मला कायम जाणवत आलीय ती म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की काय करायचे आहे याचा पुरेसा अंदाज आलेला नसतो.

शब्दखुणा: 

महिला दिनानिमित्त - आजीबाई बनारसे (लंडनच्या आजीबाई)

Submitted by आस्वाद on 9 March, 2021 - 01:07

**स्पॉइलेर अलर्ट **

गेल्या वीकेंडला शेवटी शकुंतलादेवी पाहिलाच. सिनेमा ठीकठाक. शकुंतलादेवींचं आयुष्य बटबटीतपणे दाखवलंय, असं वाटलं. खूपच बॉलीवूड स्टाईल आहे. शिवाय विद्याची ओव्हर acting! असो. पण त्या निमित्ताने मला एका आदरणीय व्यक्तिमत्वाची आठवण करून दिली.

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व