भारत

दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे स्मित )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

"रानवाटा" प्रदर्शनाला भेट देणार्‍या माबोकरांचे गटग

ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन केंद्र बिग बझार शेजारी, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम).

जिप्सी उर्फ योगेश जगताप (डोळा मारा) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.

त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.

दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत

१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.

पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार

अमेरिकेत कार रेंटल संबंधी माहीती हवी आहे.

माझे सासू सासरे आणि नणंद यायच ठरवतायत, त्यामुळे त्याना आसपास /दूर फिरवण्यासाठी ७ सीटर वाहनाची गरज लागणार आहे.महीना भरा साठी अशी गाडी रेंट करणं किवा विकेंड्स ना रेंट करण्याचा विचार करतोय, पण नेट वरून रेट काढले तर दिवसाला ७०-८० $ कमीतकमी होतील असं दिसतय.याशिवाय मायलेज/टॅक्स्/इन्शुरन्स वैगरे वेगळ होईल.
कुणाला लॉग टर्म रेंटल / किवा डिस्काऊंट्स असलेली कार रेंटल्स माहीती आहेत का?
तसंच नॉर्थ कॅरोलीना मधून नायगरा/न्यूयॉर्क्/डीसी ई. तरी कमीत कमी त्यांना पाहायचय. अशा टूर्स असतात का?(एकटेच फिरून या असं म्हणण बरोबर वाटत नाहीये पण निदान एखाद्या ठिकाणा साठी जरी सोय झाली तर...)

पुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.

ठिकाण/पत्ता: 
"गंधर्व" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर. रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३. ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.

लोकहो,

नीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.

ठिकाण - "गंधर्व" रेस्टॉ.

तर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.

लाल बाग बोटॅनिकल गार्डन बंगलोर (फ्लॉवर शो) - भाग १

नमस्कार मंडळी!
इथे बरीच निसर्गप्रेमी मंडळी पाहीली तसेच छायाचित्रणाची आवड असलेली मंडळीही बरीच आहेत. बंगलोर येथील लाल बाग बोटॅनिकल गार्डन मध्ये दरवर्षी साधारण २६ जानेवारीच्या आसपास एक भव्य फ्लॉवर शो आयोजित होतो. त्या प्रदर्शनातील विविध फुला-फळांची मांडणी केवळ अप्रतिम असते. ही छायाचित्रं फक्त एक तुटपुंजा प्रयत्न आहे ते सौंदर्य साठवून घेण्याचा. मी काही उत्तम छायाचित्रकार वगैरे नाही. जर चुकुन छायाचित्रे चांगली आली असतील तर ती फक्त आणि फक्त कॅमेरॅची करामत आहे आणि सहाजिकच प्रदर्शनात मांडलेल्या सुंदर फुलांची. १०० च्या वर फोटो आहेत. फक्त निवडून टाकले तरी ८० च्या खाली जाणार नाहीत. म्हणून तीन-चार भागात विभागणी करते आहे. त्यातील हा पहिला भाग.

(पिकासा वेब मधून प्रकाशचित्रं चढवण्यासाठी जिप्सी यांची खूप मोलाची मदत झाली. तसेच जागूताई, दिनेशदा आणि रूनी पॉटर यांचीही मदत झाली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.)

भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/31236
भाग तिसरा: http://www.maayboli.com/node/31266

australia & newzealand मध्ये प्रवास मदत

मी जून मध्ये माझ्या परीवाराबरोबर australia & newzealand मध्ये फिरायला येण्याचा विचार करत आहे. मी भारतातुन package tour घेतली नसुन येण्याजाण्याची सोय स्वत करत असल्याने तिथे फिरण्याकरता मला मदत हवी आहे. मी अशी tour शोधत आहे कि जी मला दोन्ही देश (hotel, sightseeing, indian veg food, travel from australia to Nz ) सोय करेल.अशी local tour कोणाला माहित आहे का? काही उपाय सुचवता येइल का? आम्हि २+२ असे येत असुन शाकाहारी आहोत. मला असे समजले कि खाण्याचे सामान आणु शकत नाहि. प्लीज मदत करा.

मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम

ठिकाण/पत्ता: 
भरत नाट्य मंदीर, पुणे

बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..

खास बालगीतांचा कार्यक्रम..

१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...

कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..

ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्‍या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...

गर्भसन्स्कार

मी सहा महिन्याची प्रेग्ननन्ट आहे .पण बेड रेस्ट वर आहे. ह्या परिस्थितीत किन्वा सामान्य वेळी आपण कोणत्या विशेश गोश्टी करु शकतो येणार्या बाळासाथी?
मी चान्गले music , मन्त्र वगैरे एइकते पण अजुन काय करता येईल का?

माणिक बाग प्रोजेक्ट - पिंपरी

पुण्याच्या पिंपरी येथील मगर स्टेडियमच्या समोर चालु असलेल्या वाघेरे यांच्या 'माणिक बाग' प्रोजेक्ट मध्ये कोणी फ्लॅट बुक केले आहे का?

असल्यास कृपया संपर्क साधा किंवा फोन नंबर कळवा. थोडी माहीती हवी आहे.