नोकरी-व्यवसाय

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 01:59

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

हँडरायटींग जॉब स्कॅम?

Submitted by साधना on 4 August, 2014 - 08:38

शनिवारी नेरुळला एक जाहिरात नजरेला पडली, handwriting jobs, work from home, earn Rs 4800 per week.

जाहिरात वाचुन थोडी उत्सुकता वाटली, काँप्युटरच्या जमान्यात हस्तलिखिताच्या कामाला आठवडा ४८०० मिळताहेत याचे आश्चर्यही वाटले. लगेच फोन लावला. कसे लिहायचे त्याचे ट्रेनिंग देणार, दर आठवड्याला असायनमेंट मिळणार आणि मग पैसे असा सोप्पा रुट. याचे ४८०० मिळणार? कायतरी लोच्या आहे नक्की ही घंटी वाजली डोक्यात. फोनवरुन पत्ता घेतलेलाच. घराच्या जवळच होता. म्हटले इतके वर्षे स्कॅमबद्दल वाचतोय पण प्रत्यक्ष स्कॅम करणारी माणसे काही पाहिली नव्हती, आता लगे हाथ पाहुनही घेऊया.

दमलेल्या तुमची आमची कहाणी

Submitted by अपूर्व on 9 July, 2014 - 03:14

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व फायदे

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 June, 2014 - 14:04

एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील... एक ना दोन गोष्टी असतात! तुम्ही सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरेच काही अवलंबून असते.

मराठी भाषेचा अभिमान??? आर्थिक स्तरावर बोंबाबोंब!

Submitted by निक्षिपा on 28 May, 2014 - 05:35

मी एका चांगल्या कंपनीमध्ये मराठी कॉपी रायटर म्हणून गेले ८ वर्ष कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यात कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेत आणि त्याचा नकळत माझ्या कामा संदर्भात परिणाम झालाय अर्थात ही स्लो पोयझनिंग प्रोसेस आहे… थेट 'नोकरीला येऊ नकोस' असे न सांगता काम कमी केली जात आहेत… थोडक्यात नवीन दाणापाणी शोधायची नितांत गरज निर्माण झाली आहे. ८ वर्षापासून या ठिकाणी कामाला असल्यामुळे थोडा थोडा करत पगार वाढत आता महिना ३० हजाराला पोचला आहे.

नोकरी बदल... प्रोफेसर लेक्चरर म्हणुन जॉब

Submitted by _आनंदी_ on 22 May, 2014 - 10:48

बी.ई. केल आहे..
आत्ताची नोकरी नीट आहे ... पण लेक्चरर प्रोफेसर ई शिकवण्याच्या बाबतीत इंटरेस्ट आहे...
मागे माय्बोलिवरच एक धागा होता तिथेही हा प्रश्न विचारल होता पण तो धागाच सापडत नाहिये...
१) मला विचारायचे होते सेट नेट ची गरज नाही ना?
आणि २) त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवण्याचे पण ऑप्शन असतात अस ऐकुन आहे..
क्रुपया अनुभव शेअर करा महिती द्या...

सिन्गापूर बद्दल माहीती हवी आहे...

Submitted by फोतोग्राफेर२४३ on 20 May, 2014 - 02:49

नमस्कार, कोणी माय बोली कर singapore ला आहेत का? असल्यास मला पुढील माहिती हवी होती. मी लवकरच तिथे शिफ्ट होतो आहे
तिथे आपल्या इंडियनस ला घरे मिळतात का?
तिथे लहान मुलांसाठी day care आहेत का?
तिथे नर्सरी कश्या आहेत?
कोणी राहून आले ले असल्यास आपले अनुभव share करावेत.
धन्यवाद.

ऑस्ट्रेलियातील नोकरीच्या संधी

Submitted by रंगासेठ on 25 April, 2014 - 23:28

नमस्कार

नुकतेच माझे काही सहकारी नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेत. तसेच सध्या ऑस्ट्रेलिया मधील नोकरीच्या संधीबाबतीत काही इमेल्स येत आहेत. माझा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार IELTS ची तयारी सुरू केलीय. तसेच Immigration process आणि नोकरीच्या उपलब्ध संधी यावर पण गूगलींग सुरू आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, इथे ते विचारतोय.

नोकरी
१) सध्या ऑस्ट्रेलियात नोकर्‍यांच वातावरण कसं आहे? रिसेशनचा प्रभाव आहे अथवा कॉस्ट कटिंगचा?

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय