नोकरी-व्यवसाय

५० व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतर करण्याबद्दल

Submitted by शार्प शूटर२९ on 16 August, 2023 - 02:16

आम्ही कॅलिफॉर्निया मध्ये सहा वर्षे एच-1 वीसा वर राहून 2012 मध्ये भारतात परत आलो. आता 2024 मध्ये मला पुन्हा अमेरिकेत जायची संधी मिळत आहे. यावेळी एल-1 वीसा वर जाउन ग्रीन कार्ड (ईबी-1 केटेगरी) आणि eventually अमेरिकन सिटिज़नशिप घेण्याची संधी आहे. संधी कॅलिफॉर्निया, टेक्सस आणि मिनेसोटा या राज्यात आहे. पण या दहा बारा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुलगा 11 वर्षाचा आहे आणि त्याच्या शाळेत सेट झाला आहे. बायको सध्या जॉब करते आहे परंतु तिच्या कंपनीचा अमेरिकेत प्रेजेन्स नाहीय. त्यामुळे तिला जॉब सोडून अमेरिकेत नवीन जॉब करावा लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमची वये आता लेट 40s मध्ये आहेत.

करीयरची संधी

Submitted by पिहू१४ on 23 May, 2023 - 13:57

दहा वर्षांनंतर करीयरच्या कुठल्या संधी उपलब्ध असतील‌‌.आज दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणतं शिक्षण घ्यायला हवे.येणार्या काळात कुठले पर्याय निवडावेत.

अगरबत्ती बिझनेस

Submitted by विनिता.झक्कास on 29 April, 2023 - 10:24

नमस्कार माबोकर,

सगळे खुशाल असाल अशी कामना करते.
सुचेतस इंडिया ही कम्पनि मी आणि माझ्या मुलाने सुरु केली आहे. हे मी मागे सांन्गितले होतेच.
ऑडिओ बन्वायची कामे सुरु आहेत. कुकू एफ एम, मिर्ची प्लस साठी काम सुरु आहे. चांगला रिस्पॉन्स आहे.

खादी ग्रामोद्योग मधे अगरबत्तीचे ट्रेनिंग घेऊन आता अगरबत्तीचे काम सुरु केले आहे. हा प्यूअर महिला उद्योग आहे.
भेसळमुक्त अ‍ॅलर्जी विरहित अगरबत्ती आम्ही बनवतो आहोत. तसेच अस्सल गाईच्या शेणाच्या गोवर्‍या पण सेल करतो आहोत.
डिलरशीप पण देणे सुरु आहे. महीला डोअर टू डोअर सेल करु शकतात. रिझल्ट छान आहे.

हिंजवडी चावडी-डेमो आणि बरंच काही

Submitted by mi_anu on 12 February, 2023 - 09:31

हिंजवडी चावडी-डेमो आणि बरंच काही

निलेश ने आज 11 वाजताची सिगरेट वारी रद्द केली.
पल्लवी ने आज लंच आधी केशर चंदन फेसवॉश ने चेहरा धुवून फेस सिरम आणि लिप ग्लॉस लावणं रद्द केलं.
विद्येश ने आज लंच पूर्वी 20 मिनिटं शेअरबाजाराच्या बातम्या वाचणं रद्द केलं.
संजना ने आज मैत्रिणीला फोन करून सासूबाईंचे विचित्रपणे सांगणं रद्द केलं.
खुद्द मुख्य मांजर राजभूषणने त्याच्या मित्रांबरोबरचा पिझ्झा बेत पुढे ढकलला.

शब्दखुणा: 

वर्तुळ

Submitted by सामो on 4 August, 2022 - 03:03

खरं तर अर्पितान काहीही प्रश्न न विचारताही, नेहमी सिराज , तिला स्वतःच्या डेटबद्दल इथ्यंभूत माहीती द्यायची. आई व मुलीत जर सांमजस्यपूर्ण नाते असेल तर असे होणे साहजिकच नाही का! आईने अगदी मैत्रिणच असले पाहिजे असे नसते कारण आई एकच मिळते. परंतु जरी आईने , मुलीचे मन लावुन ऐकून घेतले तर मुलगी तिच्यापाशी कित्येक गुपिते उघडी करते हे अर्पिताला इतक्या वर्षांच्या आईपणानंतर, माहीत होतेच की.
सिराज काही बोलत नाही हे पाहून, अर्पिताने कॉफीचा कप सिराजपुढे ढकलत स्वतः घोडं दामटवलं. "सिरु कशी झाली मग कालची डेट? कुठे भेटलात? किती वेळ गप्पा झाल्या?"
"खास नाही झाली. वेळेचा अपव्यय नुसता.."

लेऑफ

Submitted by उपाशी बोका on 13 July, 2022 - 00:05

सध्या परिस्थिती अशी आहे की जगभरात बहुतेक सगळीकडेच महागाई वाढत आहे. त्यामुळे बहुतेक देशात व्याजदर वाढवले जात आहेत, ज्यामुळे महागाई आटोक्यात येईल. याचा एक परिणाम म्हणजे फायदेशीर व्यवसाय करणे, हळूहळू बऱ्याच कंपन्यांना कठीण होईल आणि त्यातूनच मग लेऑफ म्हणजे नोकऱ्या जाण्यास सुरुवात होणार आहे. म्हणून सर्वांना सावध करण्यासाठी हा धागा काढला आहे. कामावरून काढताना कंपनी आणि एच.आर. अजिबात दयामाया दाखवत नाही असा माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, म्हणून कृपया गाफील राहू नका.

जपानमध्ये शाकाहारी पदार्थ कुठे मिळतील.

Submitted by Ashwini_९९९ on 23 March, 2022 - 23:53

नमस्कार........
माझा भाचा जपानला नोकरीनिमित्त जात आहे. पूर्ण शाकाहारी आहे.. नक्की पोस्टिंग कुठे आहे हे टोकियोला तो पोचल्यानंतर कंपनी सांगणार आहे.
जपानमध्ये आपले भारतीय शाकाहारी पदार्थ /जेवण कुठे मिळेल ह्याची माहिती हवी आहे. अगदी घरगुती पदार्थांचा आग्रह नाही. मागच्या वेळेस interview साठी गेला होता तेव्हा चांगलेच हाल झाले होते जेवणाचे ...

कर्मचारी सुधारणा कार्यक्रम

Submitted by पाचपाटील on 12 February, 2022 - 10:32

('कर्मचारी सुधारणा कार्यक्रम': एक केस स्टडी;
समस्या, सोल्यूशन्स, उद्देश, अटी, शर्ती वगैरेसहित)

१. जमलेल्या माझ्या तमाम सभ्य आणि विद्वान
स्त्री-पुरुष होss,

ज्वेलरी मेकिंग व्यवसाय

Submitted by पिहू१४ on 26 December, 2021 - 06:58

नमस्कार मायबोलीकर मला ज्वेलरी मेकिंग व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या बद्दल माहिती हवी आहे . मार्केटिंग आणि इतर गोष्टी कशी सुरुवात करावी ? मी नाशिक ला राहते MIDC area आहे . कुणी माहिती देऊ शकेल का ?

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय