विनोद

झाकली मूठ

Submitted by पॅडी on 4 April, 2024 - 13:26

लागोपाठ तीन दारुण पराभवानंतर, “मुंबई इंडियन्स” टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी मला पाचारण करण्यात आल्याची वार्ता, एखाद्या वणव्यासारखी, हा हा म्हणता सबंध चाळीत पसरली!

तुमचा आवडता/आवडती कॉमेडीयन कोण आहे?

Submitted by वर्षा on 1 February, 2024 - 22:09

स्टॅन्ड अप कॉमेडी बघता का?
तुमचा आवडता/आवडती कॉमेडी आर्टीस्ट / इन्फ्ल्युएन्सर कोण आहे?
मला अय्यो श्रद्धाचा कंटेंट आवडतो . कॉर्पोरेट विश्वावर विनोद करणार्‍या आणखी एकाचा हिंदी कंटेंट आवडला होता पण त्याचे आता नाव आठवत नाहीये. इथे अमेरिकेत झरना गर्ग बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे असे दिसते.
त्यामुळे इंग्रजी/हिंदी/मराठीतील तुमचे आवडते कलाकार येऊ द्यात. रेको प्लीज. Happy

शब्दखुणा: 

गांभीर्य विनोदापेक्षा अधिक फलदायी असते.

Submitted by केअशु on 16 October, 2020 - 02:10

विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात होते. तशाच प्रकारच्या टवाळ अॅप नव्याने भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्‍या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. असे का असावे बरे?

शब्दखुणा: 

करिअर प्लॅॅनिंग

Submitted by प्रभुदेसाई on 8 July, 2020 - 11:47

कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या.
“या, कुमारने मला सांगीतले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.”
“सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो.
“ नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे? मी तो ‘गणिताचा अभ्यास’ हा कार्यक्रम बघत होते.”

शब्दखुणा: 

शब्दधन - हास्य लहरी - विनोदी कथा लेखन स्पर्धा

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

hasya lahari.jpg
---
रामराम मंडळी!
कसे आहात? आम्ही बाकी मज्जेत! Happy
गणेशोत्सवाची तयारी तर जोरदार चालू दिसतेय सगळीकडे. मायबोलीवरही गणेशोत्सवाचा उत्साह काही कमी नाही! कित्तीतरी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित झालेत. मग, तुम्ही घेताय की नाही भाग स्पर्धांत आणि उपक्रमांमध्ये?

शब्दखुणा: 

चान्स मिळाला रे मिळाला की अभिनय!

Submitted by स्वीट टॉकर on 17 April, 2019 - 06:31

होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात.

विषय: 
शब्दखुणा: 

हुकुमशाही _ सविस्तर

Submitted by भास्कराचार्य on 16 November, 2018 - 12:10

लागणारा वेळ:
एखादे दशक.

लागणारे जिन्नस:

१. १ नावापुरती चिमूटभर लोकशाही.

२. १ सरकारच्या हातात सर्व नाड्या असलेली अमाप ताकद असलेली 'कल्याणकारी' अर्थव्यवस्था. डबघाईला आलेली असल्यास उत्तम. पण तशी नसली, तरी चालू शकते. ती योग्य तशी 'वाटून' घेता येते. मात्र ह्या परिस्थितीत पदार्थ शिजायला थोडा जास्त वेळ लागण्याची तयारी ठेवावी.

विषय: 

पारुबायची खाज

Submitted by शिवकन्या शशी on 13 January, 2018 - 01:11

पारुबायची खाज –

पारुबायला एक झ्यांगडी सवय होती!

खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंबा ठोकत, अंगावरचे कपडे काढत, गावभर सुसाट धावायचे!

पारुबाय बोल्ड! तिला मानणारे चिक्कार घोळके होते.

मग काही घोळके, 'बाई इथ्थं खाजवतंय का, तिथ्थं खाजवतंय का?'असं विचारून विचारून तिला विविधांगी खाजवायचे!पारुबायला इतकं बरं वाटायचं! काय विचारू नका.

पण नंतरनंतर घोळक्यांच्या लक्षात यायला लागलं,मायला, हिला खाजवता खाजवता आपल्या हाताबोटांची आग व्हाय लागलीय.मग हळूहळू घोळक्यांनी खाजवायचे थांबवले.तशी पारुबाय जास्त आक्रस्ताळेपणा करू लागली!

शब्दखुणा: 

'फेकू ' किस्से

Submitted by मार्मिक गोडसे on 27 December, 2017 - 21:38

काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो.
किस्सा: १

विषय: 

किस्से आणि निरीक्षणं (भाग ४).....इनिस्पेक्टर भिडे/भेंडे

Submitted by बग्स बनी on 8 March, 2017 - 08:15

नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
नेहमीप्रमाणेच आज ही.... एक खास किस्सा, जास्त वेळ वाया न घालवता आज सरळ सुरुवात करतो.

Pages

Subscribe to RSS - विनोद