माहिती

वेदकालीन संस्कृती भाग १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

संस्कृती म्हणजे काय?

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.

प्रकार: 

मेणबत्त्यांच्या दुनियेत

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी नुकत्याच केलेल्या जेल मेणबत्त्यांना सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. Happy
त्या पाहून खूपजणांनी त्या कश्या बनवितात याविषयी उत्सुकता दाखविली यासाठी जेल मेणबत्ती बनविण्याची घरच्या घरी करता येण्यासारखी सोपी पध्दत खालीलप्रमाणे.

प्रथम जेल मेणाविषयी
जेल हे एकप्रकारचे पारदर्शी मेण असून ते खनिज तेलापासून बनलेले असते. बाजारात मिळणारे जेल मेण जेली (घन) स्वरुपात असते.

साहित्यः जेल, आवडीनुसार काचेचं ग्लास, दोरा, स्टील अथवा अ‍ॅल्युमिनियमचे एक छोटं उभट भांडे तसचं एक पसरट भांडे, चमचा, जेल मेणाचे रंग.

विषय: 
प्रकार: 

छत्रपती घराणे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

महाराजांचे पूर्वज आणि वंशज..

करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !
सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...

व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.

shivaji.jpg

इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.

बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)

विषय: 
प्रकार: 

राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुखकर होण्यासाठी कसा होऊ शकतो? लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते? आजच्या राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिनानिमित्त, अशाच एका प्रयोगाविषयी...

http://72.78.249.107/esakal/20100510/5002131355233730205.htm
सौजन्य: दैनिक सकाळ

प्रकार: 

हमिंगबर्डच्या करामती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

६ मेला ऑफिसमध्ये शिरलो आणि खिडकीबाहेर एक हमिंगबर्ड हवेत ईंग्रजी यु आकाराचे सूर मारतांना दिसला. माद्यांना आकर्षित करण्याचे त्यांचे हे तंत्र आहे. ५-६ वेळा त्याने हे केले. तोपर्यंत माझा कॅमेरा सुरु होऊन विडिओ घेणे मी सुरु केले होते. एकदा उच्चतम बिंदुपर्यंत पोचणे आणि खाली मारलेला सुर पकडता आला आणि तो गायब झाला. मी कॅमेरा काही क्षण सुरु ठेवला, नंतरही अधुन-मधुन बाहेर पहात होतो, पण तो काही परत आलेला दिसला नाही.

विषय: 
प्रकार: 

साहित्य पुरस्कार : राष्ट्र आणि राष्ट्रवाद

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm

प्रकार: 

पोमोसची प्रतिकृती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी विविध देशातील नाणी व नोटांचा संग्रह करतो हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक वेगळे काही दिसले की माझ्यासाठी ठेवतात. इटलीत अन्नुचार्य ज्वालामुखीमुळे आठ दिवस अडकुन पडलेली सिमोना काल पॅसॅडेनाला परतली. येतांना टर्की व ग्रीस खाली असलेल्या एका छोट्या बेटावर पसरलेल्या सायप्रस नामक देशाचे एक दोन युरोचे नाणे (माझ्या वैयक्तिक जालावर नसल्याचे पाहुन) आणले.

pomosmap.jpg2_Euro_coin_Cy.gif

विषय: 
प्रकार: 

महाराष्ट्रदिन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.

केतकर उवाच

विषय: 
प्रकार: 

महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी स्वखुषीने व विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी) लादून घेणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाडच मारून घेतली आहे. सुदैवाने विधिमंडळातील विधेयकांसाठी, इतर अधिकृत कागदोपत्री कामांसाठी व राज्यकारभारासाठी (शासनव्यवहारासाठी) मात्र मराठीचा उपयोग अनिवार्य केलेला आहे.

प्रकार: 

मराठी जनतेचीची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे. ह्या जाहीरनाम्यातील सूचनांबद्दलच्या शासनाच्या कार्यवाहीचे येत्या काळात मूल्यमापन करून मराठी माणसाने शासनाचे प्रगतिपुस्तक भरावे आणि त्यातील कामगिरीवरूनच पुढील निवडणुकीच्या वेळी ह्याच शासनाला पुन्हा प्रवेश द्यायचा की बोटाला धरून बाहेरची वाट दाखवायची ह्याचा निर्णय घ्यावा."

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - माहिती