पर्यावरण

पर्यावरण

दख्खनचे जागतिक बंध उलगडताना....

Submitted by वरदा on 14 September, 2020 - 08:33

आजचं जग हे झपाट्याने होणार्‍या वैश्विकीकरणाचं आणि त्याचबरोबर अस्मितांविषयक वाढत्या जाणिवांचे आहे. सगळं जग एकसमान व्हायला लागलं तर आपण आपली सांस्कृतिक ओळख विसरून जाऊ, अशा एका नकळत्या भीतीने गेल्या काही दशकांमध्ये अस्मितांच्या भिंती जास्तच पक्क्या होऊ लागल्या आहेत. या अस्मितांचे ताणेबाणे बहुपेडी आणि गुंतागुंतीचे असतात. यातला एक ठळक उठून दिसणारा धागा म्हणजे प्रादेशिक अस्मिता. त्याविषयी आपण समाज पातळीवर, सांस्कृतिक क्षेत्रात वारंवार प्रकट होत असतो.

जीवनज्योती कृषी उद्योग

Submitted by अनया on 26 August, 2020 - 09:26

जीवनज्योती कृषी उद्योग

IMG_20200622_103856936[1].jpg

पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.

बाल-रोप संवर्धन उपक्रम

Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 11:44

“बाल-रोप संवर्धन उपक्रम”
स्वरूप व माहिती:- घरच्या घरी बियांपासून उगवणार्‍या रोपाचे संवर्धन करणे.
उपक्रमात भाग घेण्यासाठी मुलांनी छोटी कुंडी, अर्धी कापलेली प्लास्टीक बाटली किंवा एखादा रिकामा श्रीखंड-आम्रखंडाचा डबा अश्या कोणत्याही वस्तू मधे धने, बडीशेप, मटकी, मूग, ओवा, झेंडू, तुळस, आलं, पुदिना, लिली, कोरांटी, गोकर्ण, गुलबक्षी इत्यादी पैकी बियांपासून सहज उगवणाऱ्या रोपट्याचं जतन करायचं आहे.
एक महिन्यानंतर संयोजकांनी दिलेल्या लिंक वर मायबोलीकरांनी आपापल्या पाल्याने जपलेल्या रोपट्याचे फोटो अपलोड करावेत.

भारतातली पहिली पाणथळ जागांची वेबसाईट ....लवकरच ...

Submitted by डी मृणालिनी on 1 August, 2020 - 04:26

भारतातली पहिली पाणथळ जागांची वेबसाईट ,आपल्यासमोर येते आहे १५ ऑगस्ट २०२० रोजी ..... वेबसाईट चे उदघाटन करणार आहेत राष्ट्रीय वेटलँड समितीचे सदस्य आणि सल्लागार मी. अफरोज अहमद ... लोकसहभागातून बनलेली ,लोकांची ,लोकांसाठी वेबसाईट...
इंग्लिश टीजर - https://www.youtube.com/watch?v=qvrTJ_nyiAk
मराठी टीजर - https://www.youtube.com/watch?v=IAKF-eUAO5o

प्रांत/गाव: 

निसर्गलाच प्रश्न

Submitted by Santosh zond on 29 July, 2020 - 20:38

निसर्गलाच प्रश्न
एका ठिकाणी एक लहान मुलगा खूप रडत होता कारण त्याने लावलेल एक रोपट पावसामुळे खाली जमिनीतून उद्वस्त होऊन पडल होत, आणखी एक लहान मुल,त्याला पण त्याच गायीच वासरु दिसत नव्हत म्हणुन गायी पेक्षा जास्त कावीलवान आणि निरागस होऊन ते वासरू कुठ दिसत का ते तो शोधत होत........
आणि हे अस फक्त लहान मुलंच करू शकतात,
लहान मुलांची मन खरच फुलासारखी सुंदर आणि पवित्र असतात कोणीतरी म्हटलेलंच आहे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात त्यांना जस सांगीतलेल शिकवलेल असत ते तसच वागतात व बोलतात ( maturity comes from childhood )

शब्दखुणा: 

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त - वाघीण (एका आईची गोष्ट)

Submitted by अरिष्टनेमि on 29 July, 2020 - 13:22

वाघीण – एक आई

२०१० सरत आलं होतं. थंडीचा जोर वाढू लागला. झाडांची पानगळ सुरु झाली. ताडोबातल्या तळ्यात विदेशी पाहुणे येऊन मुक्त संचार करु लागले. याच वेळी पांढरपवनीची गर्भार वाघीण दिवस भरत आले म्हणून अस्वस्थ होऊ लागली. माहितीतल्या सुरक्षित ठिकाणांना वारंवार भेटी देऊन पिल्लांसाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागली. अखेरीस एक ठिकाण तिनं नक्की केलं. त्याच्या आसपासच दोनेक दिवस ती रेंगाळली. फार दूर गेली नाही. एके दिवशी कळा सुरु झाल्या आणि आडोसा शोधून तिनं चार बच्चांना जन्म दिला; तीन माद्या आणि एक नर. डोळे मिटलेल्या गुलाबी गोळ्यांना ती प्रेमानं चाटू लागली.

पत्रास कारण कि .......

Submitted by डी मृणालिनी on 26 July, 2020 - 06:18

आज भल्या सकाळी पोस्टमन काका आले. आज नेमके सगळे कामात होते ,त्यामुळे पत्र माझ्या हाती पडलं . लिफाफा छोटा होता . त्यावरचं अक्षर तर फारच सुरेख होतं . अगदी सुंदर आणि वळणदार . याअर्थी सरकारी पत्र नाही याची खात्री पटली .लिहिणाऱ्याचा पत्ता पाहिला आणि मी तीनताड उडाले !
खालचा वाडा ,गावडे वाडीत जाताना येणारी चिंचोळी वाट ,त्या वाटेवरून पुढे गेल्यावर आजू बाजूला 'मी ' असतो ,धामापूर ,ता:मालवण ,जि : सिंधुदुर्ग - ४१६६०५

शब्दखुणा: 

चिमणी

Submitted by अरिष्टनेमि on 11 July, 2020 - 17:02

माझ्या लहानपणी सुदैवानं पोकेमॉन वगैरे जन्मले नव्हते आणि असतील तरी भारतात अवतरले नव्हते. त्यामुळं लहानपणी असंख्य सुंदर गोष्टी ऐकता आल्या, चष्मे न लागता वाचता आल्या. जवळ-जवळ सगळ्या गोष्टीत चिमणी-कावळा असायचेच अन् या गोष्टीतल्याच हजारो चिमण्या गावभर असायच्याच. अगदी कधीही दिवसभरात एक मिनीट चिमणी नाही असं नाही. बघता-बघता अचानक चिमणी हा पक्षी कधीकाळी इतका दुर्मिळ होईल असं वाटलं नव्हतं.

शब्दखुणा: 

शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग ३.२

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 06:38

पहिल्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75247
दुसऱ्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75248
भाग ३.१ चा दुवा: https://www.maayboli.com/node/75249
डिस्क्लेमर - सध्याची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. या लेखात सुचवलेले सगळे उपाय आत्ता लागू पडतीलच असे नाही. सर्वांनी प्रथम आरोग्याची काळजी घ्या.

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण