भविष्य

ज्योतिष चंद्रयोग

Submitted by y2j on 13 November, 2019 - 03:46

चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.

वृश्चिकेची साडेसाती

Submitted by बोकलत on 18 October, 2019 - 23:56

मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मला एक विचारायचं आहे. माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिकेच्या लोकांची साडेसाती येत्या 24 जानेवारीला संपणार आहे असं म्हणतात. मी तुनळीवर अनेक व्हिडिओ पाहिले त्यात वृश्चिकेची लोकं करोडपती होणार, जगावर राज्य करणार वैगरे वैगरे बोललं जातंय. म्हणजे थोडक्यात आमचे दिवस चांगले येणार. परंतु माझ्या बायकोची रास कुंभ आहे आणि कुंभ राशीची साडेसाती वृश्चिकेची साडेसाती संपल्यावर सुरू होते. बायकोला अर्धांगिनी म्हणतात म्हणजे कुंभ राशीच्या साडेसातीचा त्रास मलापण होणार का?

विषय: 

कवितेचा दिवस

Submitted by सामो on 17 September, 2019 - 15:31

क्वचित एखादा wistful अन विरही दिवस उगवतो. कुंडलीतील १२ व्या , सर्व boundaries, भिंती गळून पडणार्‍या घरात माझा भ्रमण करणारा चंद्र आलेला असतो. शहाण्या ज्योतिष्यांनी आधीच warn केलेले असते - Spin slow, vortex ahead. अंतर्मुख होण्याचा काळ आहे. अन खरच अनुभवास येते ही अंतर्मुखता. काहीतरी हरवल्याची, दुरावल्याची तीव्रमनस्क जाणीव घेऊन येते. background ला सतत मंद स्वरात गुणगुणल्यासारखं एक deep longing मनात गुणगुणत रहातं. बरं कोणासाठी, किंवा कशासाठी, काय हरवलय म्हणून हे longing आहे ते देखील काही केल्या कळत नाही.

विषय: 

लिव्ह इन रिलेशनशिप

Submitted by सामो on 17 September, 2019 - 15:04

ती पुस्तकांच्या जगात रमणारी, तर तो मोकळ्या आभाळाखाली मस्तमौला भटकणारा. ती किचकट गणिती प्रमेय सोडविण्यात जगाचे भान विसरणारी तर तो मानवी अंतरगाचा ठाव घेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा. हिला विशिष्ठ शब्द त्या शब्दाचा ध्वनी , नाद भुरळ घालणारा तर त्याला निसर्गसहवासात पक्षांच्या बोलीचे संमोहन.
मिथुन लग्नाची ती अन धनु लग्नाचा तो एकत्र येण्याचे फारसे प्रयोजनही नव्हते ना संधी पण आला बुवा योग जुळून. भेटले ते एकदा अन मग परत मग परत.

चवथ्या घरातील प्लूटो

Submitted by सामो on 17 September, 2019 - 13:50

हा धागा अतिसंवेदनशील मनाच्या लोकांनी वाचू नये. ज्योतिषामध्ये रुचि असलेल्या लोकांचे प्लूटो या ग्रहाविषयीचे अनुभव वाचायला आवडतील. मायबोलीवर ज्योतिष/भविष्याचा वेगळा ग्रुप असल्याने तेथेच हा धागा पोस्ट करत आहे.
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.

विषय: 

बुध -नेपच्युन‌ जोडी

Submitted by सामो on 17 September, 2019 - 12:39

नेपच्यून आणि बुधाने एकत्र यायचे कारण काही नव्हते,
दोघात‌ असे सामायिक काहीच‌ क‌धीच न‌व्ह‌ते,
.
मात्र‌ दोघे प्रेमात‌ आप‌ट‌ले.
.
बरं नेपच्यूनला तरी अंत:प्रेणा व्हायला हवी होती, की नाही, प्रेम आंधळे असते यात संशयच नाही.
बुधाचीही अक्कल कुठे चरायला गेली होती?,नेपच्यून बुधाची विजोड‌ जोडी जमली होती..
बुधाला वर्तमानपत्र जितके आवडीचे , नेपच्यूनला वास्तवाचे चटके तितके नकोसे.
बुधाने घेतलेला वैचारिकतेचा बसा, ,तिथे नेपच्यूनचा पाडाव लागावा तरी कसा?
मग व्हायचे काय दोघानचा मेळ बसेना,कुठे काय चुकतंय कोणाला कळेना.

भविष्य

Submitted by झुलेलाल on 12 September, 2019 - 08:43

वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही.

विषय: 

भेंदीचा भाव आणि संदया किरकिरे अर्थात माजी दारूची अर्धी बातली आणि सैतानाच्या दारलिंगची लावनी

Submitted by अज्ञातवासी on 1 September, 2019 - 04:00

प्रेरणा - पप्पू अक्कु काका,
आणि...
अवेनजर्स....

सकाळ झाली मी उतलो
तसं सकाळी सगळेच उठतात
मी करखानदारु फ्याक्ट्री सारख्या रुक्ष क्षेत्रात वावरणारा माणूस
तुकाराम महाराज मनुन गेलेत दिसमाजी काहीबाही लित जावे
म्हणून मी पुढील शृंगारर्स कौटुंबीक रहस्य थरर कता लित आहे

----------
भेंदीचा भाव आणि संदया किरकिरे अर्थात माजी दारूची अर्धी बातली आणि सैतानाच्या दारलिंगची लावनी

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भविष्य