भविष्य

देव तारी...

Submitted by केजो on 12 May, 2021 - 12:39

"अरे तुला सांगतो, आमच्या ऑफिसातले लालवानी साहेब म्हणजे नं एक अजीब नमुना आहेत. साहेब आहेत असं सांगूनही अनोळखी माणसाला कळणार नाही. अरे ऑफिसात पाऊल ठेवलं की पाचव्या मिनिटाला त्यांचे ते गडगडाटी हसू कानावर पडतं. साला ऑफिसमध्ये काम सगळ्यांनाच असतं रे, पण लालवानी साहेब असले नं की हसत खेळत चक्क कामाचा फडशा पडतो आम्ही! कधीही विचारा,सगळेच ओव्हर टाईमसाठी एका पायावर तय्यार. सगळ्यांसाठी जेवण मागवणार, बायकांना घरापर्यंत सुखरूप सोडण्याची सोय करणार. तू येच एकदा त्यांना भेटायला.", अभिजीत शेजारी जोरजोरात चालू असलेल्या भजनी मंडळींच्या वरचा सूर लावून सांगत होता.

आहुती ????????

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 May, 2021 - 06:02

यज्ञास बैसलों आम्ही

आहुतीचा मान घ्यावा

भरा झोळी माझीच फक्त

भरभराटीचा आशिष द्यावा

अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला

घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा

त्याच चोरुनी यज्ञ मांडला

आता आहुतीसाठी आटापिटा

तिथे दूरवर चूल पेटली

राखण करती दोन मशाली

भाकरी रांधण्या तिथेच बैसली

सुन्न चेहरा घेऊन माउली

महत्प्रयासे पार मशाली

आता राहिली फक्त माउली

तिला एकदा का आडवी केली

आहुतीची मग चिंता मिटली

माऊलीचा भोग चढवितो

जगणं आलंय जिवा

क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो

विषय: 
शब्दखुणा: 

सिझेरियन जन्मकुंडली

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 April, 2021 - 00:26

खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. पण तेव्हा प्रसूती ही नैसर्गिक होत असे.फार तर एखादी सुईण अडलेले बाळंतपण सुकर करण्याचा प्रयत्न करीत असे.पण सिझेरियन हा वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता ज्योतिषांनी मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.

भयज्योतिष

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 April, 2021 - 06:53

एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते.

ओळखितील माहितगार ज्योतिषी सुचवा

Submitted by अथेना on 13 January, 2021 - 10:55

कोणाच्या माहितीमधे चान्गला ज्योतिष विषयक सल्ला देणारे आहेत का? शक्यतो फोनवरून घ्यायचा आहे, ऑनलाईन पेमेन्ट करून.
कुणाला अनुभव असेल तर, प्लीज नाव/नम्बर सुचवा. काही वयक्तिक आयुष्याबद्दल सल्लामसलत करायची आहे, त्याद्रुष्टिने सान्गा.

अपलोड-वेणा

Submitted by अनन्त्_यात्री on 13 August, 2020 - 13:24

सिंग्युलॅरिटीच्या
या गोठल्या वर्तमानकाळात
संगणकेश्वराज्ञेनुसार
माझा सायबोर्गावतार
आटोपता घेण्यासाठी
अपलोडतोय महास्मृृतिकोषात
माझ्या जाणिवा, नेणिवा,
अन्
होलोग्राफिक अस्तित्वखुणा.

ई-जैवकचरा होऊन वितळेन मग
पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात

हजर होईल
माझा डिजिटलावतार
कधीही, कुठेही
संगणकेश्वराच्या मर्जीनुसार

सायबरअमरत्वाच्या
या दुर्धर अपलोड-वेणा
माझ्या एकेका सर्किटनसेतून
ठिबकतायत...

एक संवाद

Submitted by सामो on 5 August, 2020 - 12:31

---------------फार पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेले एक हलकेफुलके ललित. ज्योतिष विषयात रस असणार्‍यांना आवडू शकेल. ------------------

"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली.

"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले.

माया नावाची संकल्पना

Submitted by सामो on 22 July, 2020 - 14:09

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.

कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या लोकांची जन्मकुंडली

Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2020 - 01:46

मला कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, परिचितांच्या किंवा अन्य कारणाने आपण
सहजपणे त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थान , नाव ( प्रसिध्द केले जाणार नाही पण सॉफ़्टवेअर रेफ़रन्स साठी आवश्यक ) रोगनिदान झाल्याची तारीख किंवा मृत्युची तारीख हवी आहे.

९७६३९२२१७६ व्हाटसप वर ही माहिती कळवावी.

भारतात फ़ारच मृत्यु किंवा बाधीतांची संख्या अजुनतरी सुदैवाने मर्यादीत असल्यामुळे भारत बाहेरील लोकांची माहिती मिळाल्यास सुध्दा चालेल. माहितीसाठी आगावु धन्यवाद !

विषय: 

साडेसातीे: वास्तविक उपाय!

Submitted by केअशु on 7 March, 2020 - 00:44

मित्रहो! दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनीने मकर राशीत प्रवेश केलेला आहे.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपली आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु झाली.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती अाहे.

साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भविष्य