कविता

बालभारतीच्या कवितेची गाणी

Submitted by Charudatta Sawant on 28 February, 2022 - 10:39
तारीख/वेळ: 
28 February, 2022 - 10:21
ठिकाण/पत्ता: 
तळेगाव दाभाडे, पुणे

बालभारतीच्या कवितेची गाणी

मला माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या आपणा सर्वांनाच आवडत असत.

ह्या बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेला वाचक आणि श्रोत्यांसाठी त्या मी नवीन रुपात सादर केले आहे.

बालभारतीच्या कवितेची गाणी ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे.

माहितीचा स्रोत: 
https://charudattasawant.com/balbharati
प्रांत/गाव: 

मराठी भाषा दिवस -२०२२: सरस्वतीची चिरंजीव मुले - शांता शेळके: अमितव

Submitted by अमितव on 26 February, 2022 - 14:08
Shanta Shelke

साधीशीच वाटेल अशी सुती साडी, गोरा रंग, कपाळावर ठसठशीत नजरेत भरेल असं कुंकू, कानात मोत्याच्या कुड्या, मोठे डोळे आणि त्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा, डोक्यावरुन पदर घेतलेला, हसतमुख चेहरा, साधंसच वाटेल असं रसाळ, ऐकत रहावं असं प्रेमळ बोलणारी आजी ही शांताबाईंची झालेली पहिली ओळख. त्याकाळी दूरदर्शनवर एक कवितांचा कार्यक्रम सादर होत असे, आणि घरी आजी तो मनोभावे ऐकत असे. त्यात म्हटल्या जाणार्‍या कित्येक पारंपारिक कविता आजीला तोंडपाठ होत्या आणि दूरदर्शनवर त्या सुरू झाल्या की इकडे आजी त्या पूर्ण करत असे.

मन

Submitted by कविन on 26 February, 2022 - 00:06

मन 'पोलादी', हे ठावूक मजला आहे
चिंतेचे कारण? वाट 'चुंबकी' आहे

मन अजाण? हट्टी? काय म्हणावे सांग!
ते,अशाश्वताला शाश्वत समजत आहे

मन डोकावतही नाही गर्दीमध्ये
ते 'आयसोलेशन' मधेच रमले आहे

मन म्हणाल ते ते, सर्व बाळगून आहे
ते किंमत जोखून, वापर ठरवत आहे

मन चंचल नाही परी स्थिरही नाही
हे 'भलेबुरे'च्या मधले काही आहे

मन उलट-सुलटचा खेळ खेळते आहे
हा विणकामाचा छंद, अघोरी आहे

शब्दखुणा: 

'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२'

Submitted by विनिता.झक्कास on 3 January, 2022 - 08:58

नमस्कार माबोकर,

'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.व आम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी काम करतोय.
ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' आयोजित करत आहोत.

आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.

अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

शब्दखुणा: 

माझ्या कविता

Submitted by pkarandikar50 on 31 December, 2021 - 07:28

माझ्या कवितांचा ‘कदाचित’ हा (पहिला आणि शेवटचा) काव्य-संग्रह दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला त्या दिवसाच्या आठवणी दाटून येतात. तो माझा सत्तरावा वाढदिवस होता! माझ्या बाबतीत असे काही होणार आहे असे कुणी मला माझ्या चाळीशी-पन्नाशीत सांगितले असते तर मी त्या माणसाला वेड्यात काढले असते कारण जवळपास अर्धे आयुष्य जगून होईपर्यंत मला काव्य हा एक दुर्बोध आणि ‘कठीण’ साहित्य प्रकार वाटायचा.

विषय: 
शब्दखुणा: 

माझं ते दीक्षित डाएट

Submitted by चैतन्य रासकर on 23 November, 2021 - 07:13

माझं ते दीक्षित डाएट चालू असताना
तू चीझ बर्स्ट पिझ्झा खातेस
अन माझ्या त्या ढेरीकडे
कुत्सित नजरेने बघतेस

सकाळचा नाश्ता करायचा नाही
असं ठरलं होतं आपलं
बटाट्याचे वडे तळताना
तुला काहीच कसं नाही वाटलं?

दिवसातून फक्त दोनदा जेवणार होतो
कमी गोड कमी खाणार होतो
तुझ्या या साजूक तुपातल्या बिर्याणीचं
मी काय बरं करणार होतो?

सोळा तास लंघन करायचं होतं
हाल्फ चड्डीवर पळायचं होतं
त्या इन्शुलीनला फैलावर धरून
ताळ्यावर आणायचं होतं

पण तू मास्टरचेफ बघू लागलीस...

शब्दखुणा: 

अकांशाचा भुंगा...

Submitted by अक्षय समेळ on 15 November, 2021 - 23:11

अकांशाचा भुंगा पोखरी मनास
नश्वर असे सर्वकाही आठवी मनास
परी चालताना मार्गावरून सत्याच्या
खेचेल गोडी ऐहिक सुखाची मनास

वासना उठाठेव करिती मनास
उरेल का सत्य चिंता जाळसी मनास
मनाचेच हाल होती मनाच्याच हातून
दुसरा कोण विरोध करिसी मनास

अस्मितेचा मृत्यू रडवी मनास
दुःख काय असते जाणवी मनास
"मी" पणा सोडाया मन धाजावत नसे
तेव्हा मिथ्या अहंकार फासी देई मनास

काय काय करावे, संभ्रम आडवी मनास
गृहीत धरले सारे, चूक आकळी मनास
नश्वर वस्तूंचा मोहापाश सुटणार नाही
सत्य जाणून गल्यानी मारे मिठी मनास

- अक्षय समेळ

एकांत

Submitted by अक्षय समेळ on 15 November, 2021 - 00:27

आजची कविता भुजंगप्रयाग ह्या मध्ये लिहण्याचा प्रयत्न केलाय... बघा! जमलंय का आणि काही त्रुटी आढल्यास सांगायला विसरू नका.

एकांतात माझ्यासवे चंद्र जागा
नक्षत्रे असे सोबतीला तयाच्या
उदासी नभांची जमा होत गर्दी
उरावा जसा मंद अंती उसासा

दुरावा मनाचा अता खोल झाला
तुलाही मलाही दुभंगून गेला
कधी भेट होई? अता कोण जाणे
उरावी तरी ही जराशी अपेक्षा

- अक्षय समेळ

खंत

Submitted by अक्षय समेळ on 11 November, 2021 - 02:40

जाणिवांचा मृत्यू अन्
पुरता गांजला देह
काल होती तशी नाही
ही मावळणारी सांज

झोळी साऱ्या ह्या ऋतूंची
वाटते आज निकामी
रंग रंग वितळले
काळोखाच्या गर्द दोही

विझते ज्योत क्षणात
वाऱ्याच्या मंद स्पर्शाने
केले असता प्रयत्न
पेटेल पुन्हा नव्याने

जिद्द असेल अंतरी
झुकेल ते आकाशही
दुःखाला मरण नाही
खंत जर बाळगली

- अक्षय समेळ.

बाळ होऊनी पुन्हा जन्मावे...

Submitted by अक्षय समेळ on 9 November, 2021 - 06:57

सोडूनी चिंता उद्याची सारी
बाळ होऊनी पुन्हा जन्मावे
अन् पदराच्या अभायाखाली
डोळे घट्ट मिटून पुन्हा निजावे

वाटता भीती जराशी अंधाराची
ओढुन घ्यावी रजाई जरतारीची
अन् धडधड तुझ्या हृदयाची
ऐकत गुपचूप पडून रहावे

घरभर बागडावे इवल्या पावलांनी
मनसोक्त हसावे खोड्या करुनी
अन् मिळता ओरड जरासा
तुझ्या पाठीमागे हळूच लपावे

- अक्षय समेळ.

Pages

Subscribe to RSS - कविता