गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......
(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)
जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की... 


