मराठवाडा

व्याख्यानमाला निमंत्रण

सर्वांना निमंत्रण !
जेष्ठ विचारवंत, थोर इतिहास तज्ञ आणि शिल्प व मूर्ती कलेचे जाणकारः
प्रा. डॉ. देगलूरकर यांची व्याख्याने:

letter3.jpg

मराठवाडी पद्धतीने चिकन / मराठा पद्धतीने चिकन

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन (गावरान असल्यास चांगले), अर्धी वाटी सोललेला लसुण, एक इंच आले, एक मोठा कांदा, पाव वाटी किसलेले खोबरे, पाव वाटी दही, कोथिंबीर चिरुन पाव वाटी, धण्याची पावडर ४ चमचे, तिखट ४ चमचे, काळा मसाला ५-६ चमचे, मीठ, हळद.

क्रमवार पाककृती: 

आलं-लसुण, कोथिंबीर एकत्र वाटुन घ्यावे. चिकनला दही, हळद १ चमचा धण्याची पावडर, मीठ व अर्धा खोबर्‍याचा कीस व निम्मे वाटण चोळुन अर्धा तास ठेवावे.
एक कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर काळसर होईपर्यंत परतुन घ्यावा व वाटुन घ्यावा.
कुकरमध्ये थोड्या तेलावर उरलेल्या वाटणापैकी निम्मे वाटण व निम्मा कीस व अर्धा वाटलेला कांदा परतुन घ्यावा. त्यात थोडी हळद व २ चमचे धण्याची पावडर घालुन परतावे. थोडेसे तेल सुटु लागले की चिकन घालुन परतावे व नंतर त्यात पाणी घालुन शिजवावे. एका शिट्टीमध्ये चिकन शिजते.
एका कढईत थोडे तेल घेवुन त्यात उरलेले वाटण, कीस व कांदा परतावा. त्यात १ चमचा धणे पुड, ४ चमचे तिखट व ५-६ चमचे काळा मसाला घालुन परतावे. छान तेल सुटल्यावर कुकरमधल्या चिकनपैकी थोडे चिकन व रस्सा बाजुला ठेवुन बाकीचे ह्या मसाल्यात घालावे. गरजेप्रमाणे मीठ घालावे. बारिक गॅसवर थोडावेळ उकळु द्यावे.

आईचे मसाल्याचे प्रमाण :
१ वाटी धणे, दिड चमचा जीरे, एकेक चमचा शहाजीरे, लवंगा, दालचीनी, मिरे, खसखस, नागकेसर, अर्धा चमचा सुंठ पावडर, ५-६ बडी विलायच्या, ४-५ तमालपत्र, तेवढेच दगडफुल, एक कांदा वाळवलेला, ३ चमचे खोबरं आणि एक त्रितियांश वाटी तिखट.
इथे चमचा म्हणजे टेबलस्पुन.. स्मित( मी नेहेमी गडबड करते टीस्पुनच्या जागी टेबलस्पुन अन उलटं वापरते म्हणुन मुद्दाम लिहिलय..)
सगळे पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजुन घ्यायचे व बारिक वाटायचे...
तिखटाचे प्रमाण खाण्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे बदलावे.. - इति आई स्मित

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

ह्यात चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा हे प्रमाण ग्रुहित धरले आहे. ( आई तर जवळपास अर्धी वाटी काळा मसाला घालते) हे चिकन भयानक मसालेदार व तिखट असते. त्यामुळेच सुरवातीला थोडासा साधा रस्सा बाजुला काढुन ठेवावा. जास्त तिखट लागल्यास मिक्स करुन खाता येतो. रस्सा बर्‍यापैकी पातळ असतो अन नुसता प्यायला मस्त लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई