मंगळ

मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2016 - 18:29

सुरुवात माझ्यापासून करतो

माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.

*1) जात*

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?

मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.

तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.

त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.

प्रेम, बीअर आणि मंगळ ! (भाग - २ दुसरा)

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2015 - 13:34

...
भाग १ - http://www.maayboli.com/node/52461
...

पण हे सारे करताना मी एक गोष्ट विसरलो होतो...

जन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी छापलेल्या "आर-के" या स्टॅंपला देवाने तथास्तु म्हटले असते तरी त्या ‘के’ चा ‘आर’ म्हणजे ‘राजकुमार’ कोणी दुसराच असणार होता...

...

विषय: 

आयुष्यातील पहिलेवहिले .. - प्रेम, बीअर आणि मंगळ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2015 - 05:07

..

"आयुष्यातले... पहिलेवहिले !..

हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !

मंगळयान मोहीम: इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन

Submitted by कोकणस्थ on 24 September, 2014 - 00:40

भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्याबद्दल या धाग्यावर त्यांचे अभिनंदन करुया. मंगळ ग्रहाच्या बाबतीत अधिक माहिती इथे देता येईल.

मंगळ कार्य !

Submitted by अंड्या on 27 February, 2014 - 13:36

आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?

"कडक पृथ्वी" - "सौम्य मंगळ"

Submitted by गुलाम चोर on 22 October, 2013 - 00:29

हो - नाही - हो करता करता अखेर फायनल झालेलं आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था लवकरच मंगळावर (तोच तो आपल्या भारतीयांच्या जीवनात 'चहा' , इस्त्री यांच्या खालोखाल 'कडक' मानला जाणारा…) यान पाठवणार आहे. मोहीम यशस्वी होईल असं गृहीत धरू.. नाही धरू'च' (कारण शेवटी आपल्या खिशातूनच जाणार आहेत हे पैसे). सारे काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीला भारताचे 'मंगलयान' मंगळाच्या दिशेने झेपावेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ आपली मुद्रा आणखी ठळक करतील.

आता मला अशी शंका आहे कि, जर आज - उद्या - १०० वर्षांनी मंगळावर वस्ती शक्य झाली तर....

मंगळावरील प्रयोगशाळा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

क्युरिऑसिटी साधारण १२ तासांपूर्वी मंगळावर अवतरले. मंगळाचे एक वर्ष कार्य करु शकेल इतपत उर्जा या मंगळाचराला प्लुटोनियम द्वारे उपलब्ध आहे. ताशी ३० मिटर गतीने सरकत, अडीच फुटांपर्यंतचे अडथळे पार करत क्युरिऑसिटी या लाल ग्रहाची माय्क्रोब्सना सहन करण्याची वृत्ती आजमावेल. पण हे विज्ञानाबद्दलच नाही तर अर्थकारणाबद्दलही आहे.

ग्रहांशी माझे (फार)काही देणेघेणे नाही, पण यावर कोणीही काहीही न लिहिलेले पाहून राहवले नाही. म्हणून हा आल्प खटाटोप. सगळीकडे याबद्दल बरेच काही अर्थातच उपलब्ध आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

थंड डोके, दूरदृष्टी, सखोल विचार/ सज्ज जाहलो करण्या विश्वसंचार

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

KISS (केक इन्स्टिट्यूट अॉफ स्पेस स्टडीज) च्या सौजन्याने एक बस भरून कॅलटेक-जेपीएल चे आम्ही ५९ लोक ८ मार्च २०१२ ला स्पेस-एक्स (SPACEX - http://www.spacex.com) ला गेलो. spacex ला सहजी जाता येत नाही म्हणून लॉटरीत नावे टाकून आमची निवड झाली. डाऊनटाऊनची संध्याकाळची गर्दी टाळण्याकरता एक-दोघे वगळता सगळेच बसने आले.

आम्ही जरा जास्तच वेळेवर पोचल्याने थोडावेळ बाहेर थांबावे लागले - लोकांचे पासपोर्टस, ओळखपत्रे वगैरे पण तपासून होत होते. बाहेर एक लालभडक टेस्ला उभी होती. ५० हजार डॉलर्सच्या या गाड्या पृथ्वीचे आवश्यक भविष्य असु शकतात.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - मंगळ