साहित्य

भीती

बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता .
किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ?
आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत .
बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला .
किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार !

अंधेर नगरी चौपट राजा

अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .

चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .

योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .

राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .

योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .

जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."

राजा हादरला .

यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .

साहित्य, वाङ्मय...

साहित्य, वाङ्मय...

एकाने मारली आडवी रेघ
टांगले त्यावर अ, ब, क, ड सुरेख

कोणीतरी म्हटले हे तर शब्द
शब्दामागून शब्द हे तर वाक्य

कोणी त्या संवाद म्हणे तर कोणी गद्य
नाट्य दिसे कोणा तर कोणा वाटे पद्य

भावभावनांचा कधी कल्लोळ
कधी शब्दांचेच लोळामागून लोळ

नामकरण केले त्याचे साजेसे
साहित्य, वाङ्मय असेच काहीसे....

थोडी बहुत जमवलेली पुस्तकं

थोडी बहुत पुस्तकं जमवली आहेत. त्यांची यादी इथं लिहितोय. वाचायला पुस्तक हवं असेल तर बिनधास्त * मागा.

*अटी लागू

आज ना उद्या मला ही आणि अजून जी आहेत / होतील (ह्या यादीत न टाकलेली) ती सगळी कुणालातरी द्यायची आहेत.*

कारण हज्जार -
१) जागेची अडचण आहे.
२) मोह सोडवायचा आहे. इ. इ.

ही यादी सध्यातरी इंग्रजी व मराठी पुस्तकांची आहे. जशी वाढतील तशी यादीत भर घालत जाईन. स्मित

***

SR. NO. TITLE AUTHOR
1 Jack STRAIGHT FROM THE GUT JACK WELCH
2 Social Intelligence The New Science of Human Relationships DANIEL GOLEMAN
3 Working with Emotional Intelligence DANIEL GOLEMAN

शबद गुरबानी

काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

साहित्याचे निकष यावर माझे मत

0

नमस्कार

या फलकावर तुम्ही चांगल्या साहित्याची निवड करताना कुठले निकष लावता यावर लिहा. ज्यानी त्यानी विचारविनिमय करुन आपापले मत प्रामाणिक होऊन मांडावे. स्पष्टीकरण देता आले तर अजून छान. अलिकडे मायबोलिवर चांगल्या कवितांची निवड होते आहे. पुढे कधीतरी आणखी कुठल्या तरी साहित्यप्रकारचीही निवड केली जाईल. त्यावेळी इथली बहुसंख्य मते विचारात घेता येतील.

दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक

0

जुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले!!!!