मासिक पाळी

सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज

Submitted by रंगराव on 27 May, 2019 - 15:13

दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही.

शब्दखुणा: 

पॅड मॅनः एका नव्या संकल्पनेला रुजवताना

Submitted by अश्विनीमामी on 10 February, 2018 - 08:32

पद्मावत बघून मग पॅड मॅन बघायचा म्हणजे पीएचडी चा थीसीस पूर्ण करून मग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासारखे आहे. जौहर, स्वत्व, स्त्रीत्व पॅट्रिआर्की( मेली!!!) ह्यावर कोअर विचार करून झाल्यावर मासिक पाळी सारख्या एकेकाळी शरीर धर्म असलेल्या बाबीवरचा चित्रपट बघावा तरी का असे वाट्त होते पण वेळ होता. बघितला झालं. संपूर्ण चित्रपट एक प्रचारकी थाटाची डॉकुमेंटरी असल्यासारखा आहे. व इथे पण ती कायम फ्रेंच मुलग्याच्या सिनेमांत असणारी म्हातारी बाई आहे. ह्या क्षणाला मला परत निघून जावेसे वाटले पण
राधिका आपटे!!! उसके लिये तो हम जमीन बेच देंगे....

विषय: 

मुलीच्या मासिक धर्माविशयी

Submitted by गंगी on 30 July, 2013 - 10:18

माझी मुलगी ११ वर्षांची आहे... आणि मे मध्येच तिचे पिरियडस सुरु झाले.... बरं झाले तर झाले ते फारच अनियमित आहेत... दर ८ .. १५ दिवसला येतात... आयु. औषधे चालु केली आहेत.. २ महिने झालेत... पण एलोपथी डॉ. म्हण्तात.. काहीच गरज नाही औषधांची... सुरुवात ही अशीच असते... पण ती ( माझ्यामते) फारच लहान आहे ... आणि ह्या अनियमितपणाला अगदिच कंटाळली आहे...तिला समजावुन सांगता माझी नाके नउ येत आहे...
काय करावे समजत नाहीये... ह्यातुन काय मार्ग काढावा.. आयु औषधे चालु ठेवावि का एलोपथी घ्यावे.... पण मग साइड इफेक्ट ची भिती वाट्ते... अजुन फारच लहान आहे ती हे सगळं सहन करण्यासाठी Sad

वंध्यत्व-२. स्त्रीयांमधील वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.

Submitted by साती on 24 April, 2012 - 15:24

यापूर्वी वाचा -
भाग १. प्राथमिक माहिती आणि पुरूषांमधील वंध्यत्व.

भाग२. स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.

............. पुरूषांमधील वंध्यत्वाविषयी चर्चा करणे जेवढे सोपे होते,तेवढेच स्त्रीयांबद्दल चर्चा करणे कठिण. कारण बाळाच्या जन्मामध्ये तिचा हिस्सा मोठा. स्त्री-पुंबीज मिलनापासून ते बाळ गर्भाशायात वाढून , जन्माला येपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी स्त्रीच्या शरीरात घडतात. त्यामुळे अपत्य जन्मापूर्वीच्या प्रत्येक पायरीतील चूक स्त्रीयांमध्ये वंध्यत्वाचा दोष निर्माण करू शकते.

विषय: 

PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम !

Submitted by रुणुझुणू on 9 May, 2011 - 08:25

" किती जोरात बोलतोस ? जरा हळू बोल."
......"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय."

" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत ?"
......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. "आई असं का करतेय ?"

" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही."
....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.

विषय: 
Subscribe to RSS - मासिक पाळी