क्रिकेट

T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

विषय: 
शब्दखुणा: 

भारतरत्न (?) विराट कोहली (??)

Submitted by अंड्या on 28 February, 2014 - 12:28

मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्‍यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्‍यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले.

सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 

एफर्टलेस मॅगी नूडल्स - रोहीत शर्मा

Submitted by अंड्या on 13 November, 2013 - 12:34

६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.

विषय: 

सचिनची निवृत्ती आणि क्रिडारसिकांच्या प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on 10 November, 2013 - 16:59

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

विषय: 

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 19 October, 2013 - 22:26

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

विषय: 

Champions League T20 2013

Submitted by केदार जाधव on 17 September, 2013 - 05:53

मित्रानो ,
Champions League T20 तासाभरातच चालू होतेय . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

३ (किंवा ४) संघ भारतीय असल्याने अर्थातच भारतीय संघ जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत.
पण ६-७ अनुभवी खेळाडू असलेले टायटन्स , कंदुराता , T&T हे अनपे़क्षित निकाल लावू शकतात.

आपला सपोर्ट तर मकॅलम बंधूंच्या ओटागो आणी T&T ला. Happy

Qualifiers Schedule :

9/17/2013 16:00 Qualifying Pool 1 Faisalabad Wolves vs Otago
9/17/2013 20:00 Qualifying Pool 2 Sunrisers Hyderabad vs Kandurata
9/18/2013 16:00 Qualifying Pool 1 Otago vs Kandurata

विषय: 
शब्दखुणा: 

आमचे असतील लाडके........

Submitted by जे.पी.मॉर्गन on 3 September, 2013 - 01:46

फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

IPL T20 2013 साठी "फँटसी लीग"

Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55

आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे

केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला

यावेळी हा आयपीएल साठी आहे

http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage

इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763

League PIN: 2106
.
.

ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx

स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय

League: Maayboli
Password: maayboli_13

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्रिकेट