प्रेम कविता

सांग काय आठवु मी ....

तांबुसल्या पालवीचा ऋतू हाकेवर होता
तुझ्या पळसमिठीत प्राण केशरला होता
केली नजरबंदी तू ,दिशा चुकले पाखरू
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?

सोनधारा ओतल्यास बहाव्याच्या अंगावर
तूच शिंपडला वर्ख फुलपंखी स्वप्नांवर
अंती वन्ही होत राना अग्निदंश केलास तू ...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?

दरी डोंगरी फिरलो ,स्वप्ने वेचित हिंडलो
खटमधु करवंदी क्षणांनी त्या गाभुळलो
शेव गुंतला जाळीत हळु सोडविलास तू ...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?

उंच पठारावरती देह शांत टेकलेले
गुढ पाषाणांभोवती सांजस्पर्श फिरलेले

प्रेमपत्र लिहायचे होते

प्रेमपत्र लिहायचे होते............ .......... ............

prempatra1.jpg

तुला पाहता

तुला पाहता
तुला पाहता वाजू लागतो
आसमंती अलगुज
तुला पाहता होऊ लागते
फुलाफुलात कुजबुज
तुझे पडावे स्वप्न म्हणून
जाती पाखरे निजून
तुला पहावे नव्या प्रभाती
म्हणून फुले येती फुलून
तुला पाहण्या चन्द्र उगवतो
कलेकलेने मुग्ध होतो
अप्राप्तिने तुझ्या दु:खे
झुरुन झुरुन विरक्त होतो

विक्रांत

एक एकटा एकटाच!!!

तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मन माझे आजही रडते आहे,
तिच्या आठवणींच्या स्पर्शात आजही वेडे फुलते आहे!
मन माझ तेव्हाही एकाकीच होत आणि आजही एकाकीच आहे,
फरक फक्त एवढा कि आज त्याला माझ्या हृदयाची साथ आहे!
जीवनात माझ्या आता एकही फुल फुलणार नाही,
वेड्या ह्या मनाला कोणीही प्रेम देणार नाही!
एकट्या ह्या वाटेवरून आजपर्यंत मी चालत आलो,
प्रेमाचा प्रत्येक रस्ता आपोआपच विसरत गेलो!
कधीतरी ती आयुष्यात पुन्हा एकदा दिसेल,
डोळ्यामधून पाणी माझ्या गालावर बरसेल!
तिच्याच आठवणीत मी जगलो तिच्याच आठवणीत मरेल,
मेल्यानंतर तरी काय माझे प्रेम तिला कळेल????

"सावज"

***
नाजुक तु साजुक तु,
सुंदर तु मादक तु ....,
प्रिये..,अल्लड आणि नादान तु,
या शरीराचा 'प्राण' तु ...पण..,

आज केलासच या मनाचा 'घात' तु ॥१॥

नखरेल तुझ्या मागण्या त्या
पुरवल्या मी जिवतोड....
मागणीत तुझ्या नव्हतोच कधी
सखे, आज कळली मला तुझी ती 'खोड'... ॥२॥

शोकऋतु आज मजवर
घेतेलास 'हासत' काढता पाय
प्रेम म्हणते माझे मला
जाउदे..रे..'ती' 'नादान' बाय... ॥३॥

ठरलो तुझा 'सावज' जरी,
मनी माझ्या समाधान,
पहिल्या नजरेतच हारलो होतो,
तुला या देहाचे 'प्राण'... ॥४॥

अधीक याहुन काही हवं तुला,
तरीही....., सखिप्रिये, तु मला सांग!!
तु मला सांग!!! ॥५॥

***
चातक -
२९०९२०११

अजूनही त्याच्या आठवणी

गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.

तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.

मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले

मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”

मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.

मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर

चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………

तू येतोस जेव्हा..

रुणझुणत्या पैंजणांच्या नादातून तू भेटतोस जेव्हा,

कोवळया नवलाईच्या हिरवळीत

येतोस तेव्हा..

तेव्हा..

मनातले सूर गवसल्यासारखं वाटतं..

तारा ह्रदयातल्या,

झंकारुन..

शब्द गुंफू लागतात..

आठवणी तूझ्या

माझ्याभोवती कोश विणू लागतात,

त्या कोशात मी इतकी गुरफटून जाते,

की..

ना मी इतरांची उरते ,

ना स्वतची..

माझं पूर्ण जगच विरघळून जातं..

त्या नवीन जगाच्या सीमेवर

मी तूझीच वाट पाहत राहते...

तुझ्यासोबत त्या जगात हरवून जायचं असतं,

सोनेरी स्वप्नांची गुंफण घालायची असते...

त्या जगातल्या वाटा अशाच चालत रहाव्याश्या वाटतात..

तुझ्याच सोबतीने..

सुटका

सुटका

दुपारची शांतता एखाद्या गुहेसारखी
खिडकीबाहेर झुलणाऱ्या गव्हाच्या लोम्ब्या,
तू तेथे बसली आहेस शांत जुन्या कोपऱ्यात,

माझे मन भरकटत शेतात,
घराच्या सर्व खोल्या पार करीत
गुहेचा थंड गार काळोख ओंलांडत

सभोवतीचे सूर्यप्रकाशाचे तुकडे उचलून हातात
मी धावत सुटतो मोकळ्या माळरानात, उजाड तेकड्याभोवती

निळे आकाश खेचत जाते मला
वारा ढकलत जातो मला
तुझ्यापासून दूर... दूर...

पण प्राचीन आठवणीतून बाहेर येत
जेव्हा तू साद घालतेस खिडकीतून

जग थांबते स्तब्ध... नदी वळण घेते अचानक,
अन माझ्या मनाचा भोवरा फिरू लागतो तुझ्याभोवती.

राकेश भडंग
सैतानाची ख़ुशी कवितासंग्रह मधून

हास्य माझ्या प्रेमाचे

हास्य माझ्या प्रेमाचे

तिच्या त्या चाहुलिने मी पघळायचो असा
जशी त्या चहात साखर पघळते

तिच्या त्या विचारात मी मग्न व्हायचो असा
जसा तो भ्राम्हन पोथित होतो मग्न

प्रयत्न मी फार केले जवळ तिच्या जाण्याचे
तिच्याशी बोलण्याचे तिच्यात रमण्याचे

तिच्यासमोर जाण्याची भिती अशी वाटायची
हसुनी माझे दात पीवळे तिला दिसण्याची

जेम तेम जसे तसे गाठले मी प्रेम गडाला
शेवटी मग मी गेलो प्रपोज तिजला करायला

तिनेही मला तेव्हा साथ द्यायच ठरवल
दुसर्या दिवशी लगेच मला भैया म्हणुन रोखल

अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची

एक पसाभर 'तू'

सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..

अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..