पोहे १ वाटी
सुकं खोबरं १ वाटी
२ सुक्या मिरच्या
मीठ चवीनुसार
पोहे आणि सुकं खोबरं वेगवेगळं ५ मिनीटं भाजुन घ्यावं.
थंड झालं की दोन्ही एकत्र, सोबत २ सुक्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घालुन मिक्सरला लावावं.
अगदी बारीक पण नाही आणि जाडही नाही इतपत बारीक करावं.
एकदम सुकी होते ही चटणी.

