वांग

दूध-वांग

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा लिटर दूध
४ ते ५ छोटी वांगी (पाव किलो)
एक चमचा तेल
चिमूट्भर मीठ्,(चिमूटभर साखर, गरम मसाला, दोन ते तीन पाकळ्या लसूण वाटून, दाण्याचे कूट)

क्रमवार पाककृती: 

वांग्याची देठे कापा. देठाच्या पाकळ्या काढू नका. वांग्याला देठाकडून दोन चिरा द्या.
फ्राय पॅन किंवा कढइत दूध ओता. त्यात ही अख्खी वांगी टाका. एक चमचा तेल घाला.
मंद आचेवर वांगी शिजवा. वांगी शिजली की पाहिजे तर थोडे दूध असताना गॅस बंद करा.
सुकी भाजी हवी असल्यास दूध आटू द्या.
गॅसवरून उतरवून भाजीत चिमूट मीठ घाला. कंसातील पदार्थ ऐच्छीक आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
गरम भाकरी किंवा पोळी बरोबर न्याहरी करा. दिवसभर समाधान राहील.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

वांग्यामुळे दूध नासत नाही.
छोटी वांगी नाहीच मिळाली तर वांग्याचे दोन किंवा चार तुकडे करा.
सांगलीच्या फिक्या पोपटी वांग्याची ही भाजी मस्त होते. ती नसतील तर कुठलीही वांगी वापरा.

माहितीचा स्रोत: 
गढहिंगलज्(कोल्हापूर्)जवळील एका खेड्यातल्या हॉटेलमधे ही भाजी खाल्ली.