आत्महत्या

अनुत्तरीत फासे..

Submitted by aksharivalay 02 on 22 June, 2020 - 06:34

14 जूनला सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. त्याची आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग पाहता पाहता दिवसभर मीडिया, सोशल मीडिया या माध्यमांवर सुशांत सिंग विषयीच्या बातम्यांचा महापूर आला. मीडिया मध्ये स्पेशल रिपोर्ट च्या नावाखाली नको नको त्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या. त्याच्या आत्महत्येच्या कारणांचे नको नको ते तर्क काढले जाऊ लागले. मीडियावाले प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणत मी या बातम्यांकडे दुर्लक्ष केलं पण 15 जूनला सकाळी दहा वाजता माझा फोन वाजला आणि मला कळालं की माझ्या मामे भावाने गळफास लावून आत्महत्या केली.

विषय: 
शब्दखुणा: 

समाजकारण आणि इन्ट्रोव्हर्जन

Submitted by अननस on 16 June, 2020 - 01:01

काल सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हादरली. ज्यांचा सिनेसृष्टीशी निकटचा संबंध नाही असा समाजही इतक्या तरुण, गुणी, यशस्वी आणि उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने हळहळला. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी याचे मागणी त्याच्या घरच्यांनी केली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. एका प्रशोंत्तरात श्री सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एकूण होणाऱ्या आत्महत्यांनी व्यापकता सांगितली,वर्षांला साधारण पणे  ८ लाख आत्महत्या होतात ही संख्या दहशतवाद, युद्ध (सीरियन युद्ध यासारखे अपवाद सोडता), खून यापेक्षा जास्त आहे.

आता मुलांना हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे...

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2020 - 13:19

माझी मुलगी सध्या सहा वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिला ॲक्टीव्हिटी कम बालनाट्य अश्या एका क्लासला टाकले होते. (क्लासचे नाव विचारू नका) मुलगी पुरेशी क्रिएटीव्ह आहे आणि ड्रामा ॲक्टींगचीही आवड आहे हे पाळण्यातले पाय साधारण दिसले होते. फार नाही पण बरेपैकी रमायची तिथे. चारसहा महिन्यांनी त्यांच्या नाटकाचा सीजन आला तेव्हा प्रत्येकाला छोटीमोठी भुमिका मिळणारच या हिशोबाने एका कळपातल्या बकरीची भुमिका तिला देण्यात आली. सोबत चक्क एक डायलॉग !
नाही म्हटले तरी आमचा हिरमोडच झाला. पण म्हटले जाऊ दे कदाचित आपल्या मुलीतील कलागुण त्यांना फारसे दिसले नसतील वा तिनेच दाखवले नसतील.

विषय: 

आकांत

Submitted by स्वप्नील रसाळ on 22 December, 2018 - 01:10

दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला

का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी

रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,

धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला

ब्लू व्हेल गेम बॅन एक चांगले पाउल

Submitted by अश्विनीमामी on 16 August, 2017 - 06:20

ब्लू व्हेल गेम ही रशियात उगम पावली आहे. त्यात टीनेजर मुलग्यांना विशेष करून टार्गेट केले जाते. एक एक चॅलेंजेस दिली जातात . ह्यात शरीरावर ब्लेडने कापणे सेल्फ हार्म व अशी चॅलेंजेस वाढत वाढत जाउन शेवटी खेळणार्‍या मुलाला आत्महत्या करायला उद्युक्त केले जाते. ते फायनल चॅलेंज. गेल्या महिन्यात मध्यप्रदेश, मुंबई, केरळ इथून आठवी नववी दहावीतील मुलग्यांच्या आत्महत्या काही प्रमाणा त ह्या गेम मुळे झाल्या आहेत असे लक्षात आले आहे व पोलीस तपास चालू आहे.

विषय: 

" मी भूमिपुत्र "

Submitted by सेन्साय on 10 June, 2017 - 07:27

.
मी भूमिपुत्र
सर्व भुकेल्यांचा मित्र
जीवन विखुरले हो सर्वत्र
गोठुनि गेली आता काळरात्र

मी भूमिपुत्र
कष्टाळलेे माझ्या जीवनाचे चित्र
रंग सर्व उडुनि गेले
रक्ताचा लाल उरला मात्र

मी भूमिपुत्र
सामान्य जगण्यांसही अपात्र
बायको मुलांस न देवू शकलो
सुख समृद्धीचे स्थिर छत्र

मी भूमिपुत्र
कर्जात जाहलो गलितगात्र
नव्या मौसमाच्या आधारे
उमीद जागवून राहिलो मात्र

म्हाताऱ्याची आत्महत्या

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 April, 2015 - 11:15

जगून खूप झालय जीवना
फूट आता मरून जातो
ओझे वाहून थकलो तुझे
पुरे आता फेकून देतो

तुझी उष्टी सुखं किती
ओरपून मी चाखली इथे
कळून चुकले पण आता
किती मज फसवले तू ते

किती असावे हलकट कुणी
खरेच दाखवून दिलेस तू
वेचलेल्या प्रत्येक फळात
किडीस पेरले होतेस तू

आणि फिरविले बैलागत
पोट चाकरी लावून पाठी
मरणाची दावूनी भिती
नाडलेस रे दिवसाकाठी

दिला तसाच देह फटका
सुमार व्याधीत मळलेला
अन अभिमानी मन वरती
मीठ जखमेवर चोळायला

वृद्ध घोडा मरून जाता
तुला फरक पडत नाही
पण तरीही लक्षात घे रे
तू मला मारत नाही

विक्रांत प्रभाकर

पंचनामा.

Submitted by किश्या on 16 March, 2014 - 05:58

आज सुदाम सकाळीच रानातुन चक्कर मारुन परतत होता. चेहर्यावर जरा जास्तच आनंद होता..डोक्यात काय काय विचार चालु होते.. या वेळेला पिक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही.. आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुध्दा राहिले नविन काहीच वस्तु पण घेता आली नाही.. कमीत कामी ह्या वर्षी तरी ते करता येईल... आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज देखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चला सुद्धा ठेवता येईल...

"काय सुदामा कसा काय म्हणतीय पिक पाणी?? औंदा काय लै मज्जा आहे राव तुझी.. जवारीच कणीस तांब्या सारख पडलयं मर्दा रानात" पाटील.

आपातकालीन निकास

Submitted by अपूर्व on 23 August, 2011 - 21:50

’कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतक-याची आत्महत्या’; ’परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या’; ’पती व मुलांचा खून करून पत्नीची आत्महत्या’ या आणि अशा अनेक दु:खद बातम्या दर चार दिवसागणिक वर्तमानपत्रात वाचायला मिळतात (लागतात). अशा कृत्यामागे कारणं काय असतात हा भाग वगळता, आत्महत्या या गोष्टीकडे कशा दृष्टीने बघितलं जातं याचा विचार केला तर,

’लोकांना आत्महत्या ही गोष्ट म्हणजे जीवनाला असलेली ’आपातकालीन निकास’ ची खिडकी वाटते. ही गोष्ट वेगळी, की आपातकाल असण्याच्या वेळा कमी असतात आणि भासण्याच्या वेळा जास्त.’
- अ. ज. ओक

गुलमोहर: 

उमेद हरवलेली मुलं.....

Submitted by मोहना on 30 June, 2011 - 09:12

साहिलच्या चेहर्‍याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं. गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणार्‍या, वर्तमानपत्र, दूरदर्शनवर पाहिल्या जाणार्‍या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणार्‍या या गोष्टी आता त्यांच्याही घरात शिरल्या होत्या. मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक, गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकिचे त्याला साथ देतात.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - आत्महत्या