समाज

माणुसकी विसरलेली देवभूमी

Submitted by धडाकेबाज on 25 June, 2013 - 04:32

उत्तराखंड भारताची देवभूमी. पण ह्या देवभूमीतील लोकांचे खरे स्वरूप उत्तराखंड पुराच्यावेळी उघड झाले देवभुमीत राहूनही माणूस मनाने कसा क्रूर असू शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तराखंड. अर्थात यात सर्व स्थानिकांचा समावेश नाही अनेक लोक पूरग्रस्त भाविकांना मदत करत आहेत तर दुसरीकडे स्थानिकाकडून त्यांची लुट हि चाललेली आहे.

एका पराठ्याची किंमत २५० रुपये पाण्याची बाटली २०० रुपये, चिप्स १०० रुपये, टैक्सीचे भाडे जेथे पूर्वी जायला १००० रुपये घेत तेथे आता ४००० रुपये. लोकहो हा महागाईचा दर नाही आहे हा आहे देवभूमीतील लोकांनी भाविकांवर लावलेला आपत्ती कर..

विषय: 

उत्तराखंड दुर्घटना : आवाहन

Submitted by जीएस on 20 June, 2013 - 14:02

जसे जसे मदतकार्य वेग घेत आहे तसे तसे उत्तराखण्डातील दुर्घटनेचे अतिशय भयावह स्वरूप समोर येत आहे. पाचशे रस्ते, पावणेदोनशे पूल, नव्वद धर्मशाळा, चाळीस हॉटेल्स, शेकडो घरे वाहून गेली आहेत. हजारो मृत्युमुखी पडले आहेत तर लाखाहून अधिक रहिवासी, यात्रेकरू व पर्यटकांना सुटकेची आणि मदतीची गरज आहे.

विषय: 

पैठणचा ताजमहाल

Submitted by डॉ अशोक on 19 June, 2013 - 13:50

पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.

शब्दखुणा: 

समर जॉब

Submitted by स्वाती२ on 19 June, 2013 - 09:05

माझ्या मुलाने मिडलस्कूल पूर्ण केली तेव्हा केलेले हे लेखन. माझा मुलगा 'मोठा' होत होता त्या काळातील आठवणींची पाने. फक्त नावे बदलली आहेत. दुसर्‍या संस्थळावर हे लेखन काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. बर्‍याच जणांनी लिंक मागितली होती म्हणून मायबोलीवर पुन्हा प्रकाशित करत आहे.

गेल्या आठवड्यात माझ्या मुलाचा समर जॉबचा पहिला दिवस होता. इथे १४ वर्ष पूर्ण झाली की मुलं part-time job करू शकतात. बरीच मुलं १०-११ वर्षापासून छोटी-मोठी कामं करून कमाई करु लागतात. मुलाला पहील्या दिवशी कामावर सोडुन येताना मला त्याने कमाईसाठी केलेल्या उचापती आठवत होत्या.

विषय: 
शब्दखुणा: 

समाज व्यवस्थेच्या पाठीवर ओढलेला आसूड- पोतराज

Submitted by धडाकेबाज on 16 June, 2013 - 03:53

पोतराज हा आपल्या समाजाचे एक दुर्लक्षित अंग.पोटासाठी मरीआयचं नाव घेऊन नाचतात. देवीच्या भक्तांनी त्यांना अनेक नांवे दिली असली तरी शासन दरबारी कोणतीही नोंद नसल्याने त्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना गावाकडे राहायाला स्वतःचे धड घर नाही, उदरनिर्वाहासाठी जमीन नाही, कर्ज घेऊन धंदा करावा तर त्यासाठी हवे असलेले कोणतेही कागदपत्र कडे नाही. त्यामुळे पोटापाण्यासाठी बिर्हाड पाठीवर घेऊन बायको -मुलांसह डोक्यावर जरीमरी देवीचा देव्हारा घेऊन, फिरून अंगावर आसुडाचे फटके सहन करत लेकांचे भविष्य सांगत त्यांना फिरावे लागते.

विषय: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

देवदासी प्रथा- दोषी कोण?

Submitted by धडाकेबाज on 14 June, 2013 - 02:54

आज आपल्या देशात स्त्रिया सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत एक महिलाही राष्ट्रपती होवून गेली. परंतु आपल्या समाजातील स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे ज्याला महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो तो वर्ग आहे देवदासी स्त्रियांचा.

विषय: 

नशिबाचि(ही)शायरी...!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 June, 2013 - 08:59

वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला
पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला?
खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला
मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला...

आळसाची मीच माझ्या,ढाल मी केली जरी
प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी
दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले
नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले...

नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला
लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला
मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले
मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'...

उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे
कळले...नाही ढाल-ती,'मुखवटा' आहे तिथे

शब्दखुणा: 

वृद्धाश्रमासाठी नाव सुचवा

Submitted by लालशाह on 10 June, 2013 - 02:45

नमस्कार माबोकरानो.
पुण्याच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम काढण्याचा विचार असून सर्व तयारी झाली आहे. हे वृद्धाश्रम नॉन प्रोफिट ऑर्गानायझेशन नसून प्रोफिट ऑर्गानेयझेशन असेल. पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने हे वृद्धाश्रम सुरु करीत आहोत.

ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील उपकार नको आणि प्रवासातील मुक्कामाचे होटेलही नको. तर योग्य किंमत मोजून म्हातारपणी आयुष्यात नवचैतन्य निर्माण होईल असं हे घर असेल. जे वृद्धाना आपलं व हक्काचं वाटेल असं.

विषय: 
शब्दखुणा: 

"है कोई माई का लाल?"

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2013 - 04:27

संस्कारांचा अभाव, शिक्षणाला दिले जाणारे अपुरे प्राधान्य, शहरसीमेवरील गावातील रस्त्यालगतच्या जमीनी विकून वाढत्या वयातच हाती आलेला बक्कळ पैसा, चित्रपटातील नायकांचे अनुकरण करण्याच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेण्याची इच्छा, राजकारण्यांकडून मिळणारी सुरक्षितता, व्यसनाधीनतेत रमण्याची ओढ आणि मुळातच उदरनिर्वाहासाठी काही फारसे करावयाची गरज उरलेली नसणे या घटकांच्या सातत्यपूर्ण मार्‍यामुळे गेल्या पाच दोन वर्षात एक नव्या प्रकारचा गट निर्माण झालेला आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज