नवरा बायको

जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

विषय: 

लग्न - एक चर्चा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2016 - 01:54

प्रेम माणसाला आंधळे करते...
लग्न डोळे उघडते..
उघड्या डोळ्यांनी जग दिसते..
ते जग फार सुंदर असते..
पण आपल्या काही फायद्याचे नसते,
........ कारण आपले लग्न झालेले असते Happy

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

हे शब्द माझे असले तरी विचार माझे नाहीत, बस्स असेच काहीसे ऐकत असतो माझ्या विवाहीत मित्रांकडून, पुरुष आणि महिला दोघांकडून..
कधी गंमतीत तर कधी सिरीअसली..

एक विनोद कम तत्वज्ञान कुठेतरी वाचलेले,
अविवाहीत विचार करतात की की विवाहीतांची मजा आहे,
विवाहीत विचार करतात की अविवाहीतांची मजा आहे
फरक ईतकाच, विवाहीत हा विचार दिवसा करतात, तर अविवाहीत रात्री Wink

शब्दखुणा: 

नवरा बायकोचे भाडण

Submitted by महेश ... on 3 October, 2012 - 07:27

पहिला मुदा : घरात आइ आनि वडिल आहेत, नवरा असतोच. ते कहितरि ठरवितात अनि नेहमि प्रमाने बाय्कोला ग्रुहित ढरतात. बास झालि सुरुवत. ..... पअन हे अस का होत. नेहमिच बायकाना क ग्रुहित धरतात ? का त्यान अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जनिना हा प्रश्ना पडतो? आनि पुधे काय ? बाय्कोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करव, नोकरि सम्भलवि, पाहुने आलेकि त्यान्च पहवा, अनि एवधा करुनहि कोनिच विचार्नार नाहि, का तर बायको म्हनुन ??????? का हूत असेल हे सगल ? आज स्त्रि समानता असताना हि परिस्थिति ??

नवरा बायको... 'त्यांच्या' नजरेतून!

Submitted by आशूडी on 12 February, 2012 - 10:18

गद्य विडंबनाच्या मागील अंकाला वाचकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हाला पुढील अंक काढताना विशेष उत्साह आला. 'नवरा बायको' या सामान्य विषयावर चार ओळी लिहून मागवल्या असता आपल्या काही प्रसिद्ध लेखकांचे विचार इथे सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

गुलमोहर: 

युगलगीत: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2010 - 00:10

रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली
बसली ग बसली, कोपर्‍यात जावून बसली

हिरो:
तूला प्रफुल्लची साडी आणू का ग?
तूला नवा मोबाईल घेवून देवू का ग?
तूला कसला कंटाळा आलाय का ग?
मग टिव्हीवर 'सासबहू' बघ ना ग

हिरवीन:
जावा तिकडं नका येवू इकडं
नशीब माझं फुटकं
काय वस्तू देता असली कसली?
कशी वेळ माझ्यावर आली

हिरो:
आत्तां?
साडी नको अन मोबाईलबी नको
तुझी तर्‍हा ही असली कसली?
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
नको घरी सैपाक करू आज
बाहेर हाटेलीतच जेवू या ग

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नवरा बायको