गद्यलेखन

मान्यता !.. (एक अंकी नाटक )

Submitted by Sujata Siddha on 8 November, 2023 - 03:07

मान्यता !.. (एक अंकी नाटक )

प्रवेश पहिला

स्थळ : ( कै. अरविंद जातेगावकरांचा बंगला , जुन्या पद्धतीने सजवलेल्या भल्या मोठ्या दिवाणखान्यात पितळी कड्या असलेल्या झोपाळ्यावर जातेगावकरांची धाकटी मुलगी मयूरी हलके हलके झोके घेता घेता पुस्तक वाचते आहे , तिच्याच समोर त्याच झोपाळ्याच्या पितळी कडयांना टेकून ,पाय लांब करून बसलेली तिची वाहिनी ईशा लॅपटॉप वर काही कामे करते आहे ,तिच्या गोऱ्यापान नाजूक पायातले पैंजण तिच्या हालचाली बरोबर मध्येच किणकिणत आहेत )

शब्दखुणा: 

दिवाळी

Submitted by तुषार विष्णू खांबल on 4 November, 2023 - 08:39

दिवाळी
शब्दांकन : तुषार खांबल
१. धनत्रयोदशी
घरात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या रमेशला आज त्याच्या मुलांनी दिवाळीच्या खरेदीसाठी भंडावून सोडले होते. “संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल” असे खोटे आश्वासन देऊन रमेश घराबाहेर पडला खरा; पण परत कधीही घरी न जाण्याचा निर्णय घेऊनच. आपल्या कुटुंबाच्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, काय करायचे असे जगणे, हा विचार आज सतत त्याच्या डोक्यात घोळत होता आणि तसाच तो मिळेल त्या मार्गाने पुढे जात होता.

आमचे धोत्रे गुरुजी (भाग २)

Submitted by मिरिंडा on 3 November, 2023 - 05:42

माझे विचार थांबेनात.ज्याअर्थी गुरुजींना इथे नसलेला सदाशिव दिसला आणि ते त्याच्याशी बोलत होते. याचा अर्थ त्यांना भास होत होते. खरंच दिशाचं म्हणणं ठीकच आहे.पण मानसोपचार तज्ज्ञ माहिती असणं आणि डॉक्टर माहिती असणं यात फरक आहे.तरीही मी चवकशी करायचं ठरवलं.ऑफिसला गेलो.जाताना गुरुजींना प्रेमाने झापून गेलो आणि वेळेवर जेवण्याचं वचन घेऊन गेलो.कामात दिवस कसा गेला कळलं नाही.संध्याकाळ झाली.काम चालूच होतं.आज तरी मी नऊच्या आत घरी जाणार नसल्याचं जाणवलं.एका मिटिंगसाठी बसलो होतो.चर्चा रंगात आली होती.अचानक दिशाचा फोन आला.मी बाजूला जाऊन वैतागून घेतला." काय आहे ? मला उशीर होणार आहे.तुम्ही जेऊन घ्या.

आमचे धोत्रे गुरुजी (भाग १)

Submitted by मिरिंडा on 31 October, 2023 - 02:25

--------- स्टॅंडवर एसटी उभी होती. ऐन उन्हाची वेळ. मी गेली पंधरा मिनिटे आत बसून होतो. अडीचची एसटी पावणेतीन झाले तरी सुटत नव्हती. गावातल्या घराची विकटीक करून मी मुंबईला निघालो होतो. आई-वडील गेल्यापासून घर रिकामं पडलं होतं. गावात घर भाड्याने देऊन फारसं भाडं येणार नसल्याने मी ते रमणिकशेटला विकून आलो होतो. थोडंफार गलबलल्यासारखं झालंच होतं.नाही म्हटलं तरी ग्रॅज्युएशन पर्यंत मी तिथे दिवस काढले होते. गावाचा अखेरचा निरोप मी एकट्यानेच घेतला. माझी बायको दिशाला मी सोबत घेतलंच नव्हतं.

प्युअर सिक्वेन्स - भाग ६ (शेवटचा भाग)

Submitted by कविन on 26 October, 2023 - 23:59

भाग ५

भाग ६

मंगेश त्याच्या कामात खरच बेस्ट असावा. लकी त्याच्याकडे रिलॅक्स होता. सिद्धीने "गो चॅम्प!" म्हंटल्या म्हंटल्या तो मंगेशच्या मागोमाग घरात आतल्या बाजूला गेला देखील न कुरकुरता.

"बघ म्हंटलं होतं ना मी he is the best"

"खरय. He is the best" तिला उत्तर देताना मनात मात्र येऊन गेलं, "ही माझ्याबद्दल कधी, म्हणेल असं?”

प्युअर सिक्वेन्स - भाग ५

Submitted by कविन on 24 October, 2023 - 23:08

भाग ४

भाग ५

पुढल्या दोन मिनिटात ओला कार गेट मधून आत आली.

कारमधे मागच्या बाजूला सिट कव्हर पसरुन पाठ टेकतो तिथे त्याच्या ब्लॅंकेटची चौघडी ठेवून लकी महाराजांना खिडकीजवळ स्थानापन्न केले. त्याच्या बाजूला मधल्या सीटवर सिद्धी बसली. दुसऱ्या खिडकीजवळ लकीची प्रवासी बॅग ठेवून मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो.

गाडी एसी असल्याने खिडकीच्या काचा बंद होत्या. लकीने बाहेर डोकं काढलं तर? बाहेर निघायचा प्रयत्न केला तर? या माझं बिपी वाढवणाऱ्या शंकांना त्यामुळे सध्या पूर्णविराम मिळाला होता.

प्युअर सिक्वेन्स - भाग ४

Submitted by कविन on 24 October, 2023 - 01:01

भाग 3

भाग ४

शनिवारची सकाळ म्हणून गजर बंद करुन ठेवला होता. पण चिन्याच्या कॉलने झोपमोड झालीच.
"विकेंडला सकाळी ६ वाजता कोण कॉल करतं? आता कारण तसंच काही महत्वाचं नसेल ना चिन्या तर तिथे येऊन बदडेन तुला." मी फोन उचलून बेसिनपाशी जात म्हंटलं.

“अव्या यार एक इमर्जन्सी आलेय. मदत हवी होती. ताईच्या कारला अ‍ॅक्सिडेंट झालाय. जिजूला पण बराच मार लागलाय.”

“ओह! मॅन. फार लागलय? नीट सांग मला सगळं. काकांना सांगितलं? मी येऊ तिथे?”

प्युअर सिक्वेन्स - भाग ३

Submitted by कविन on 22 October, 2023 - 00:59

भाग २

भाग 3

"अव्या आज तुझी वकिलीण बाई बरोबर डेट नाही ना?" किर्तीच्या प्रश्नावर मी, ‘नाहीये’ म्हणून उत्तर देऊन पुढे काही मेसेज करणार इतक्यात तिचाच मेसेज आला.

"कूल. मग आज काही इतर प्लॅन करुही नको. उद्या पहाटेच्या फ्लाईटने मी परत जातेय. मी आजचा दिवस तुम्हाला भेटायला फ्री ठेवलाय. तू आणि चिन्या मला साडेसहा वाजता भेटताय मॉकिंगबर्ड कॅफेत." तिने ऑर्डरच सोडली.

"बरं चिन्याला कळवलयस ना? साहेब हल्ली व्यग्र असतात वेगवेगळ्या कामात" मी ऐकवलं.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन