गद्यलेखन

अपहरण - भाग १

Submitted by स्मिताके on 14 February, 2024 - 08:16

८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी.

शब्दखुणा: 

कांड नवीन कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 30 January, 2024 - 05:52

कांड
आज मी ऑफिसमधून घरी येतानाच मनाशी निश्चय करूनच बाहेर पडलो. काहीही झालं तरी आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच. माणसाच्या सहन शक्तीला सुद्धा काही मर्यादा असतात. माझ्या त्या संपल्या होत्या. आज मी पियाला, माझ्या बायकोला , घराबाहेर काढण्याचा निश्चय पक्का केला होता. कोणत्याही परिस्थितीत !! अशी निर्लज्ज्ज आणि नको असणारी बाई घरात ठेवायची माझी बिलकुल इच्छा नव्हती.

साद

Submitted by रेव्यु on 27 January, 2024 - 12:26

साद........ !
आम्ही आमची पाचवी अमेरिकेची ट्रीप संपवून परत निघालो होतो.आमच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावरून उड्डाण केलं आणि मी सीटच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून घेतले.क्षणभर प्रचंड एकटेपणाने मन झाकोळल्यासारखं झालं. इतका वेळ विमानात चढण्याच्या,
सामान ठेवण्याच्या गडबडीतही; सेक्युरिटीतून पुढे जाईपर्यंत तासभर तिष्ठत असणार्‍या तेजूचे-माझ्या थोरल्या कन्येचा चेहरा, अश्रूंनी भरलेले डोळे सतावत होते. दहादा दूरवर उभ्या असलेल्या तिला बाय बाय करत होतो. शेवटी नजरेआड झाली.
मी माझ्या मोबाईलकडे पाहिलं अन त्यात तेजूचा संदेश आणखीच माझ्या मनाला सैरभैर करून गेला.

शतदा प्रेम करावे..........

Submitted by sarika choudhari on 25 January, 2024 - 07:05

" या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.. . " हे गीत जगण्यावर प्रेम करायला शिकवतं. पण आजच्या युगातील चित्र पाहील तर उलटच दिसेल लोक " या मरणावर या मृत्युवर शतदा प्रेम करावे. .” असेच गाणे गाताना दिसतात. माणूस जगण्यापेक्षा मरणाला जवळ करत आहे. थेाडं काही मनासारखं झाल नाही की दे जीव.जसा काही जीव बाजारातच मिळतो. आपली मानसिक स्थिती इतकी कमजोर झाली आहे की, कोणी अरे म्हणायाची देर आपण लगेच आपला मौल्यावान जीव द्यायला तयारच असतो. मनुष्य जन्म एकदाच मिळतो पण तो सार्थकी न लावता आपण आपलं जगण वाया घालवत आहे. जीव द्यायचाच झाला तर देशासाठी द्या. आपलं जीवन एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करा.

सोबत ३

Submitted by रघू आचार्य on 19 January, 2024 - 10:33

मागचा भाग वाचण्यासाठी
https://www.maayboli.com/node/84563

कॉफी खूप गरम नव्हती.
खरं सांगायचं तर थर्मास असो किंवा गाडीत चहा कॉफी गरम करायचं उपकरण असो..
तिला ताज्या चहा कॉफीची चव येत नाही.
उलट एक विशिष्ट वास येतो फ्लास्क कोटिंगचा.
ज्याला गरमागरम पेय प्यायची सवय आहे त्याला कोमट झालेल्या चहा कॉफीची मजा येत नाही.
तरी पण पावसाळी वातावरणात हे सुद्धा अमृतच.

शब्दखुणा: 

अश्वत्थामा

Submitted by प्रणव साकुळकर on 15 January, 2024 - 14:36

रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.

सोबत - २

Submitted by रघू आचार्य on 14 January, 2024 - 16:05

समोर एक मनुष्याकृती उभी होती
आधीच्या भागावरून पुढे चालू

पावसाची रिमझिम आता संततधार झाली होती.
काही क्षणातच मुसळधार पाऊस पुन्हा सुरू होईल हे दिसत होतं.
आताच नीटसं दिसत नव्हतं.
पावसामुळे एसी चालू ठेवून वायपर मीडीयम स्पीड वर ठेवलेले होते.
एलईडी हायलाईटने शाळेतल्या ढ मुलाप्रमाणे पावसातली आपली हुषारी खांदे उडवत कबूल केली होती.

थांबावं कि जावं ?

कि कोण आहे ते जाता जाता बघावं ?

मी गाडी स्लो केली. आतले दिवेही लावले.
स्त्री होती ती.

शब्दखुणा: 

सोबत

Submitted by रघू आचार्य on 12 January, 2024 - 08:56

वैधानिक इशारा : शीर्षकावरून गुलजारचा चित्रपट असल्याचा गैस होईल. पण लेखक पॅरानॉर्मल गुलजार अर्थात रामसेंचा चाहता आहे तसेच भयंकर आळशी आहे. हा भाग लिहायला सहा+ महीने लागलेले आहेत. पुढचा भाग कधी येईल सांगता येत नाही. आयडी उडाला नाही तर तीन तास ते कधीही. आपल्या जबाबदारीवर वाचायला सुरूवात करावी
#############################

भ्या चढाच्या वळणावर इंजिननं झटके मारले..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन