गद्यलेखन

गर्वहरण

Submitted by प्रणव साकुळकर on 27 February, 2024 - 23:09

सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.

मराठी भाषा

Submitted by मोहना on 27 February, 2024 - 21:15

"ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,

आई v/s मम्मी आणि बाबा v/s पप्पा

Submitted by ओबामा on 27 February, 2024 - 08:51

काल संध्याकाळी मांडीवरच्या संगणकावर (शुध्द मराठीत laptop) नजर लाऊन काम करत असतानाच, माझ्या मुलीने हळूच जवळ येऊन, मेरे बापू (दंगल चित्रपट पाहिल्यापासून हे माझे नवीन नामकरण) अशी लाडाने साद घातली. अगदी प्रेमाने माझा गालगुच्चा घेत, ”My dady is so cute” अशी स्तुतीपर वाक्य टाकायला सुरूवात केली, तेव्हा मी एकदम सावध झालो. बायकोने, प्रेमाने अ$$हो आणि मुलगी लाडात येऊन माझ्याबद्दल जास्त आदर दाखवायला लागल्या की लगेच माझा एसीपी प्रद्दयुम्न होतो, “दया, कुछ तो गडबड है”.

अपहरण - भाग ४

Submitted by स्मिताके on 25 February, 2024 - 15:18

भाग ३ - https://www.maayboli.com/node/84694

कर्नल ऑडमिंटन.
एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने !कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता.

शब्दखुणा: 

अपहरण - भाग ३

Submitted by स्मिताके on 21 February, 2024 - 11:50

भाग २: https://www.maayboli.com/node/84681

या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.

"अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा.

शब्दखुणा: 

चॉप्ट

Submitted by मोहना on 19 February, 2024 - 08:12

"माणसात जायला लाग आता." लेकीला म्हटलं.
"म्हणजे कुठे?" चेहर्‍यावरची माशीही न हलवता तिने विचारलं.
"सुट्टी आहे ना. तुझी लसही घेऊन झाली आहे. कुठेतरी काम कर. तेवढाच माणसांशी संपर्क."
"दादा गेला नव्हता माणसात." लेक माणसात जायला तयार नव्हती.

ती आणि तो २०२४

Submitted by केशवकूल on 19 February, 2024 - 01:25

मी आपला माझ्याच धून मध्ये गाडी चालवत होतो. शिल्पा रावची गाणी ऐकत.
कलंक नाही...
हवाके साथ साथ. घटाके संग संग. रस्ता असा कि जणू तेरी चाल है नागीन जैसी.
माझी गाडी म्हणजे जुना खटारा. मेकानिक म्हणतो, “आता बस झालं. मी पण कंटाळलो. मोडीत काढा. कंडम गाडी. भंगार मध्ये टाका. दुसरी घ्यायला झालीय.”
अरे वा रे वा. ह्या गाडीचा आणि माझा जनम जनम का रिश्ता आहे. तिला अशी कशी टाकून देऊ? माझी जीवन साथी. कधी कधी रुसते पण थोडी मरम्मत केली तेल पाणी टाकले कि लगेच हसते.
तेव्हड्यात एका भारी गाडीने मला ओव्हरटेक केलं.
माझ्या समोरच ती जात होती. लेटेस्ट टॉप मॉडेल.

एक अदृश्य माणूस!

Submitted by केशवकूल on 17 February, 2024 - 19:53

मी भानगौडा गोपाळगौडा पाटील. लोक मला भागो म्हणतात. नाव विचित्र वाटतंय ना. आमच्याकडे अशीच नाव असतात,
“आज लई खुश दिसताय?”
आज आणि रोज. आपण नेहमीच खुश!
“पण हे “अदृश्य माणूस” हे प्रकरण काय आहे? तुम्ही काय नवीन शोध लावलाय आहे? म्हणजे असं काही रसायन शोधून काढलाय का कि ते प्यालं कि माणूस अदृश्य होतो.”
नाही तसं नाही. हे आपलं जन्मापासूनचं आहे. माझा जन्म झाला तेव्हाच मी अदृश्य झालो. दवाखान्यात जो गोंधळ. बाळ गेलं कुठं? कुणी पळविला तर नाही ना? आई रडायला लागली. मिडवाइफ़च्या तोंडचे पाणी पळाले. मग कुणीतरी बोलले, “अहो बाळ तर इथे आहे.” अशी गंमत झाली.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन