गद्यलेखन

निद्रानाश (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 20 July, 2017 - 18:39

मला आज नेहमीसारखी झोप येत नव्हती.
रात्रीचे अकरा वाजले होते, दहा वाजल्यापासून, मी बिछान्यावर लोळत होतो, मग मोबाईल सुरु केला, फेसबुकवर पस्तीस फ्रेंड्स ऑनलाईन होते, हो मी मोजले, तेवढाच टाईमपास!! पण मी कोणाला मेसेज केला नाही, मागच्या आठवड्यात, ऑनलाईन असलेल्या मोजून दहा लोकांना "हाय" असा मेसेज पाठवला, तर चार जण आपोआप ऑफलाईन झाले, दोघांनी रिप्लाय दिला नाही, तर उरलेल्या चार लोकांनी मला ब्लॉक केले, हा शॉक माझ्यासाठी फार मोठा होता.

पुळण - भाग ८

Submitted by मॅगी on 20 July, 2017 - 02:27

भाग ७

चमकता कोयता जसजसा जवळ येताना दिसू लागला तसतशी समिपा घाबरून मागे सरकत सरकत इनडोअर रेस्टोरंटच्या दारापर्यंत गेली आणि पळतच समोर आलेल्या वॉशरूमचे दार उघडून आत शिरली. बेसिनसमोर उभी राहून तिने समोर पाहिले तर मोठ्या आरशात आतल्या बाजूने समुद्राच्या उधाणलेल्या लाटा टकरा देत होत्या.

शब्दखुणा: 

पुळण - भाग ७

Submitted by मॅगी on 19 July, 2017 - 01:18

भाग ६

'टिंग टी, टिंग टी, टिंग टी, टिंग टी, टिंग टिडिंंग टिडिंग'.. 'अभी ना जाओ छोडकर'चा रिंगटोन जोरात वाजला आणि समिपा आठवणीतून बाहेर आली. तोंड धुवून पटकन जीन्स चढवली. त्यावर काळा रेसरबॅक आणि वर निळ्याहिरव्या चेक्सचा शर्ट घालून बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या. पिक्सी कटवाल्या केसांमधून ब्रश फिरवला आणि ओठांवर ग्लॉस फिरवून तयार झाली.

"आई, मी जेधेवाडीला चाललेयss नलिन आणि क्यूटी आहेत बरोबर. मी जेऊनच येईन रात्री"

पायात क्रॉक्स सरकवत समिपा जिन्यात जाऊन ओरडली..

शब्दखुणा: 

फ़ेक फ़ेमिनीस्ट

Submitted by जयश्री साळुंके on 18 July, 2017 - 00:39

हा माझा माबो वर लिखाणाचा पहिला प्रयत्न आहे. काही चुका असल्यास कळवावे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हा लेख कोणालाही दुखावन्यासाठी नाही, हा माझा अनुभव आहे, सगळेच लोक असे नसतात हेही मला महिती आहे.

पुळण - भाग ६

Submitted by मॅगी on 17 July, 2017 - 02:24

भाग ५

"विठोबा, आलास होय तू.. हम्म हि तुझी चाय! चार चमचे साखर घातली आहे. नाहीतर म्हणशीssल सुरेशनाना कंजूष!" आजोबा बाहेर येत म्हणाले. "आणि दारातसा उभा राहिलास? येऊन बस त्या बाकावर."

"हि बारकी कधी आली नाना? पयल्यानंच बघितली, हुबेहूब आजीस सारकी दिसते, नाssय?" विठोबा चहाची फुरकी मारून जरा तरतरीत झाला.

शब्दखुणा: 

आत्ता चोर आला होता!

Submitted by मोहना on 16 July, 2017 - 23:57

खरंच! म्हणजे झालं काय की तसा तो यावा असं मला बरेच दिवस वाटत होतं. मध्ये एकदा शेजारी येऊन गेला तेव्हापासून. काय तो तेव्हा गहजब, प्रसिद्धी आणि गोंधळ. फारच आवडलं होतं बाई मला. शेजारीण तर हिंदी सिनेमातल्या नटीसारखी हवेत तरंगत होती काही दिवस. मलाही तिच्यासारखाच तरंगण्याचा अनुभव घ्यावासा वाटायला लागला. पोहायला गेलं तर मला तरंगताच येत नाही निदान असं तरी. तर झालं ते असं. चोराला दाराची उघडी फट दिसली. घर इतकं शांत दिसत होतं की घरात कुणी असेल असं त्याला वाटलंच नाही. शेजारणीला वाटलं, आला वाटतं नवरा. दोघं एकमेकांसमोरच आले. शेजारीण किंचाळली तशी तोही जोरात ओरडला.

शब्दखुणा: 

गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 July, 2017 - 13:01

“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल ?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात टेकवंत विचारलं.

“अम्…टेडी बीअर?”

“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”

”Management Ethics चं textbook?”

“असं abstract गिफ्ट देतं का कुणी, बावळट. Think something romatic .”

“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली.

“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”

“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलंस.”

त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.

लता आणि नातेवाईक

Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2017 - 09:04

लताची समस्या अशी आहे. लताचा नवरा तीन वर्षांपूर्वी अती मद्यपानामुळे गेला. तिला एक मुलगा आहे जो आठवीत आहे. त्याचे नांव मदन! लता सासरी राहत नाही कारण सासरचे तिला नांदवत नाहीत. म्हणून ती पुण्यात आईजवळ राहते. लताचा भाऊ विवाहीत असून तो वेगळा राहतो व लताकडे लक्ष देत नाही. लताला तीन बहिणीही आहेत पण त्यातल्या दोघींचे नवरे असेच अती मद्यपानामुळे वारले. एक मेहुणा चांगला आहे व तो लताला मदत करतो. लता चार ते पाच घरची केर फरशीची कामे करून नऊ हजार रुपये महिना मिळवते त्यातील तीन हजार खोलीच्या भाड्यात जातात.

पुळण - भाग ५

Submitted by मॅगी on 14 July, 2017 - 08:20

भाग ४

"मॅssम, मॅssम.. क्या हुआ? उठीये प्लीज.." खूप दुरून घुमल्यासारखा आवाज आला आणि समिपाने प्रयत्न करून डोळे उघडले. तर समोर क्यूटी तिच्या समोर बसून तोंडावर पाणी शिंपडत होती. तिच्या शेजारी उभ्या म्हाताऱ्या बाईकडे बघून समिपाचे डोळे विस्फारले.

"अवं ताई घाबरू नका, काय तुमी शेरातल्या पुरी.. जरा काय नवीन दिसलं की लागल्या घाबराय! बोंबलाय काय लागता, चक्कर काय यिती.. अवगड हाय तुमचं जगणं बगा!" म्हातारी गालात हसत म्हणाली.

"ओ बाई तुम्ही कोण ते आधी सांगा. आणि इथे काय करताय?" समिपा उठून बसत म्हणाली.

शब्दखुणा: 

लॉटरी

Submitted by आनन्दिनी on 12 July, 2017 - 04:59

लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन