नातीगोती

फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!! - भाग २

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 15 March, 2017 - 05:14

फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 14 March, 2017 - 05:49

गोष्टीची सुरुवात.....

शब्दखुणा: 

परतफेड!!! - भाग २

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 12 March, 2017 - 00:24

परतफेड!!! - भाग २

'नकार कळवलांत ना सकाळी? मग आता इथे क्लीनिकमध्ये? का आलात तुम्ही?', साशंक स्वरात सारिकाने विचारले. तसा एव्हढावेळ पायाकडे टक लावून बसलेल्या प्रसादने डोके वर काढले अन मिश्कीलपणे सारिकाला म्हणाला, 'क्लीनिकमध्ये येण्याआधी पेशंटला परवानगी घ्यायला लागते कि काय तुमच्याकडे?

'पेशंट आणि तू? काय झालं?'

डाव्या पायाच्या अंगठ्याकडे निर्देश करत प्रसादने पायाची जखम दाखवली.

'छोटासा ऍक्सिडेंट झाला, इथेच पुढच्या चौकात, म्हणून इथे आलो.'

'सॉरी, माझा जरा गैरसमजचं झाला, बस् तू…मी…नर्सला बोलावते अन ड्रेसिंग करायला सांगते.'

शब्दखुणा: 

परतफेड!!! - भाग १

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 10 March, 2017 - 22:08

'ट्रिंग ट्रिंग', फोनची बेल वाजली अन आईने अधीरतेने फोन कानाला लावला. तिचा सगळा जीव जणू, कानातच जमा झाला होता. सकाळी पाहुणे येऊन गेले तेव्हाची नुसती या फोनचीच तर वाट पाहत होती. बाबा मात्र जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात पेपर वाचत बसले होते. एवढ्या अधीरतेने उचललेला फोन तिने फक्त, 'अहो पण! बरं….,मुलांच्या इच्छेपुढे आपण काय बोलणार, नाही का?' एवढं एकंच वाक्य बोलून ठेवून दिला. बाबांना कळायचं ते कळलं अन, आता पुन्हा हिचं रडगाणं चालू होणार त्याआधी आपण इथून सटकूया असा विचार करून बाबा उठले अन आतल्या खोलीत जाऊ लागले. पण ते आत जातील न जातील तोच आईची बडबड सुरु झाली.

मावशी ती मावशीच असते

Submitted by विद्या भुतकर on 9 March, 2017 - 23:12

मागच्या वर्षी भारतात जाताना एक काळजी होती,'मावशी' झाल्याची. आता यात काळजी करण्यासारखं काय ते पुढे कळेलच. पण मावशी म्हटलं की मला आमची मावशी आठवते. आई आणि मावशी या पाच भावानंतरच्या दोन मुली, त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक होती आणि आजही आहे. दोघीही बहिणी,'आपल्याला आईने जावई कसे अगदी सारखे शोधून दिले आहेत' म्हणत अजूनही नवऱ्यांच्या गोष्टी एकमेकींना सांगत बसतात. आई धाकटी, त्यामुळे मावशींमध्ये असलेला समंजसपणा तो आम्हालाही कायम दिसत राहिला , अजूनही दिसतो.

डाव !!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 9 March, 2017 - 08:07

'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही?', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

रेड लाईट एरियातलं तत्वज्ञान - गंगा जमुना !

Submitted by अजातशत्रू on 8 March, 2017 - 09:48

जमुनाबाई एकदम फाटक्या तोंडाची,
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..
तू बारा गावचे पाणी पिला असशील, मी बारा गावची लोकं पचवलीत."
असं सांगताना ती छातीवर तळहाताने ठोकत असते अन तिच्या चेह-यावर अनामिक अभिमान असतो.
या अभिमानाची वर्गवारी मला अजूनही करता आली नाही.
हातातल्या पंख्याने ओल्या झालेल्या गळ्यावर हवा घेत ती आधी पचकन थुंकते, पुढे बोलते,
"इथे कुठली गीता अन कुठला भगवान ?"

छोट्यांसाठी छोटे निर्णय

Submitted by विद्या भुतकर on 7 March, 2017 - 22:39

मागच्या आठवड्यात डिस्नेच्या आईस स्केटिंग इव्हेंटला मुलांना घेऊन गेलो होतो. छान होता शो, विशेष करून दोघेही स्केटिंग शिकत असल्याने अजून पुढे काय शिकता येईल हे दाखवायला चांगले होते. तिकीट तसे महाग होते पण मागच्या सीट घेतल्या. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे खाण्याचे पदार्थ, पाणी हे सर्व ४ पट किमतीचे होतेच. अनेकदा अशा ठिकाणी उगाच चिडचिड झाल्याने आता अशा गोष्टींचा त्रास कमी करायचा हे ठरवून गेलेले. बेसिक खाण्याचे आणि पाणी घेऊन शो ला गेलो. मुलांना सर्व आवडले. नेहमीप्रमाणेच तिथे असलेल्या खेळण्यांच्या स्टॉलवरून काहीतरी घेण्याचा हट्ट त्यांनी केलाही. ज्याची किंमत योग्य वाटली ते घेतलेही.

पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का?

Submitted by सचिन काळे on 7 March, 2017 - 12:08

आज रविवार! मस्त सुट्टीचा दिवस. श्रीयुत दिलीप, सकाळचा नाष्टा वगैरे आटपून आरामखुर्चीमध्ये पेपर वाचत बसलेले आहेत. त्यांचे रिटायरमेंटहि जवळ आलेले असल्याकारणाने पेपरमध्ये त्यासंबंधित लेख वाचण्यावर आजकाल त्यांचा भर असतो. त्यांच्या सौभाग्यवती अनिताची स्वैंपाकघरात आवराआवर चाललीय. मुलगी जाई, स्टडीरुममध्ये कॉलेजचे प्रोजेक्ट पूर्ण करत बसलीय. तिचे हे कॉलेजचे शेवटचे वर्ष. पुढील दोनएक वर्षात तिला उजवायचा त्यांचा विचार आहे. तिला आतापासूनच लग्नाच्या मागण्या येण्यास सुरुवात झाली आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती