नातीगोती

माझा सायकल प्रवास

Submitted by विद्या भुतकर on 14 April, 2017 - 12:13

आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली.

बाब्या मी इंजिनियर आहे ! :)

Submitted by विद्या भुतकर on 13 April, 2017 - 00:05

बाब्या मी इंजिनियर आहे !

मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.

कुणीतरी हवं असतं.....

Submitted by विद्या भुतकर on 5 April, 2017 - 22:57

आज दुपारी एका जवळच्या मैत्रिणीसोबत बराच वेळ व्हाट्स अँप वर बोलले. मला नक्की आयुष्यात काय हवंय यावर बोलत होतो. तसं तर मला बरंच काही हवं असतं. पण त्या क्षणाला मला ठीक का वाटत नाहीये आणि मला पुढे काय केलं पाहिजे हे तिच्याशी बराच बोलून कळल्यासारखं वाटलं. असं म्हणतेय कारण त्या क्षणाला ते प्रश्न सुटत नसतात, पण तेव्हा ते बोलण्यासाठी कुणीतरी असतं, ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते आणि ऐकून घेते हे काय कमी आहे? सर्व बोलून झाल्यावर प्रश्न सुटला नसला तरी मनावरचं मळभ दूर झालेलं असतं.

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by अदित्य श्रीपद on 4 April, 2017 - 06:10

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

पिंटू

Submitted by अदित्य श्रीपद on 3 April, 2017 - 01:05

पिंटू हा आमचा पाळलेला जातिवंत धनगरी कुत्रा होता. अगदी लहान पिल्लू असताना बाबांच्या मित्राने त्याला घरी आणून दिलं होत.मी हौसेने त्याच नाव ब्रुनो ठेवल होत पण मातोश्री आणि त्यांच्या कन्येने त्याला पिंटू( शी! काय भिकार नाव आहे)) म्हणायचं चंग बांधला. आता त्याला खाऊ पिऊ त्याच घालणार म्हटल्यावर त्याची पंचाईत झाली असणार आणि असे सुंदर ब्रुनो नाव टाकून तो पिंटू या नावालाच साद देऊ लागला.असो .

उन्हाळ्याची सुट्टी

Submitted by विद्या भुतकर on 29 March, 2017 - 23:51

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या वाढत्या त्रासाबद्दल आणि योग्य ती काळजी घेण्याबद्दल अनेक मेसेज वाचले. त्यावरून डोक्यात उन्हाळयाच्या सुट्टीचे विचार मनात यायला लागले. खरंतर पाऊस, पहिला पाऊस, पावसातलं प्रेम, हरवलेला पाऊस, डोळ्यातला पाऊस आणि त्यावर अनेक कवितांचा पाऊस दरवर्षी नेमाने येतो. आता इतकी सवय झाली आहे की लोकांच्या पोस्ट वाचून पावसाचा अंदाज येतो इकडे मला अमेरिकेत राहूनही. Happy असो.

तीन बातम्या एक सूत्र

Submitted by अतुल. on 23 March, 2017 - 06:57

या आठवड्यात तीन विलक्षण बातम्या लागोपाठ वाचायला मिळाल्या. विशेष म्हणजे तिन्हीमध्ये समान धागा एकच होता तो म्हणजे "प्रेम"

'स्वप्न' आणि 'सत्य' - भाग ७- हात धरला तर...?

Submitted by विद्या भुतकर on 20 March, 2017 - 22:40

भाग ६: http://www.maayboli.com/node/61530

दोघेही एका हॉटेलमध्ये समोरासमोर बसलेले.

ती: मघाशी त्या दोघांना पाहिलंस?

तो(घास खाता खाता): कोण?

ती: तेच रे टेबलच्या एका बाजूला बसले होते?

तो: ओह.. मला नाही आवडत हे असलं.

ती: आता त्यात काय?

तो: समोरासमोर बसायचं, हे काय एका बाजूला बसायचं?

ती: मग प्रेमात असतं.

तो: आपण नव्हतो का कधी प्रेमात?

ती: असं काय अरे? किती क्यूट दिसत होते दोघं.

तो: क्यूट?

ती: मग काय? आपण पण होतो की असेच.

गौराक्का!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 20 March, 2017 - 08:04

''गौराक्का, गौराक्का", राजूच्या हाकेकडे दुर्लक्ष करत, तिने हातातल्या दगडावरची पकड घट्ट केली आणि सर्वात उंच असलेल्या चिंचेवर नेम धरला. एक, दोन, तीन....म्हणत दगड भिरकावणार, इतक्यात आतापर्यंत अंगणात उभा राहून हाका मारणारा राजू जवळ आला होता. तिच्या हाताला धरून ओढंतच घराकडे नेऊ लागला. 'गौराक्का चल, काकूने बोलावलंय तुला लगेच.' 'थांब रे! ती चिंच पाडू दे, काय कटकट लावलीस, येते सांग आईला.' 'नाही काकूने लगेच बोलवलंय, चल.' राजूने धोशाच लावला. 'काकूचा चमचा कुठला, चल.' असे म्हणत नाईलाजाने तिने हातातला दगड खाली टाकला आणि राजूच्या खांद्यावर हात टाकून चालू लागली.

शब्दखुणा: 

पान्हा

Submitted by विद्या भुतकर on 16 March, 2017 - 23:03

सकाळी जाग आली तसे निशाने पलीकडे घड्याळाकडे पाहिले. अलार्म चुकलाच होता. नवरा आणि बाळ दोघेही गाढ झोपलेले होते. ती हळूच उठून बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तर झोपलेल्या विनयच्या बाजूला विहान इकडे तिकडे गंमत पहात लोळत पडला होता. तिला पाहिल्यावर तो आपलं बोळकं दाखवून हसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यांत चमक आली. त्याच्या केवळ हसण्यानेही दिवस छान वाटतो हे तिला पुन्हा एकदा जाणवलं.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती