नातीगोती

दोन टोकं

Submitted by विद्या भुतकर on 25 October, 2017 - 23:28

सकाळी ९ ची वेळ. कॅफे एकदम रिकामं होतं. संध्याकाळी तरुणाईच्या गर्दीनं फुलून जाणारं ठिकाण ते. सकाळी मात्र साफ सफाई करणारा मुलगा आणि तयारी करणारी मुलगी सोडलं तर सामसूम होतं. ती एका कोपऱ्यात आपलं पुस्तक घेऊन बसली होती. एका हातात कॉफीचा मग घेऊन मन लावून पुस्तक वाचत होती. 'Excuse me'! तिने आवाजाच्या दिशेनं आपल्या चष्म्यातून तिरप्या नजरेनं वर पाहिलं. एकदम फॉर्मल कपड्यात, चकाचक यावरून आलेला तो उभा होता. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला त्याने उत्तर दिलं,"सॉरी इथे तुमच्या टेबलवर बसलो तर चालेल का?" .
तिने त्याच चेहऱ्याने पूर्ण कॅफेवर नजर फेकली.

मी काय करू

Submitted by मी निल on 24 October, 2017 - 01:14

नोटः मी मायबोलीचा जुना सदस्य असलो तरी हा माझा डुप्लिकेट आयडी आहे
सहावर्षापुर्वी आमच्या एका नातेवाईकांकडून तिचे प्रोफाईल आमच्याकडे आले. प्रथमदर्शीच ती दिसायला निट नेटकी, चांगल शिक्षण असलेली असल्यामुळे आम्ही स्थळ पसंत केल.
दोन महिन्यानीं मध्ये आमचे अरेन्ज मॅरेज झाले. तिन आम्हाला एक गोड मुलगी देखिल झाली.
लग्न होण्याच्या अगोदरच मी तिला विचारले होते की 'तुझा कोणी बॉयफ्रेन्ड तर नाही/नव्हता' तीचे उत्तर नकारार्थी होते.

बंधमुक्त

Submitted by सेन्साय on 20 October, 2017 - 15:15

.

.

शेवटी तो क्षण आला
अटळ अन् नकोसा
नातं बंधमुक्त उरले
जीव झाला वेडापिसा

अखेरचा यत्न वाचवायचा 
बुड़त्या जहाजाला झाला
कर्मठ दुराग्रह पाहताना
अगतिक पाश सैलावला

अनावर हतबुद्ध भयगंडाला
भावनांचा झाला कोंडमारा 
ज्वालामुख मनस्वी उद्रेकला 
स्ववंचनेचा निर्जीव पसारा

गोठला पाषाण नात्यांचा
तारुण्य उन्माद निमाला
परिकथेचा तो राजकुमार
इथे बंधमुक्त मात्र उरला....

― अंबज्ञ

निरुत्तर...

Submitted by विद्या भुतकर on 11 October, 2017 - 22:21

संध्याकाळची वेळ, गर्दी, ट्रॅफिक, वाहनांचा आवाज आणि प्रदूषण यांनी कंटाळलेला तो, एक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबला होता. आख्खा एक मिनिट थांबावं लागणार म्हणून तो चांगलाच वैतागला होता. इकडे-तिकडे पाहत वेळ घालवत असतानाच त्याला डाव्या बाजूला एका रिक्षात बसलेली व्यक्ती दिसली. ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसली आणि तो आश्चर्याने उडालाच. सायलीच होती तर ती. Happy जरा गाल वर आलेले पण तेच तोंडभरून हसू आणि ओसंडून वाहणारा उत्साह. आणि हो तिच्याबरोबर एक बाळ पण होतं छोटासा.

पण सुरुवात करायला हवी.....

Submitted by विद्या भुतकर on 9 October, 2017 - 23:07

डिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे. Happy

शब्दखुणा: 

चिंता

Submitted by विद्या भुतकर on 27 September, 2017 - 23:21

काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.

रेड लाईट डायरीज - शांतव्वा ....

Submitted by अजातशत्रू on 25 September, 2017 - 02:01

प्रत्येकाच्या पावसाच्या अनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातली धग म्लान चेहऱ्यावर निखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....

माणसे वाचताना २- डॉ.प्रसाद दांडेकर यांच्याशी गप्पा

Submitted by सिम्बा on 21 September, 2017 - 04:56

काही दिवसांपूर्वी मी ‘माणसे वाचताना’ नावाचा एक लेख लिहिला होता.
पूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी, सामान्य पांढरपेशा माणसासाठी taboo असे आयुष्य जगणाऱ्या माणसांची ’माणूस’ म्हणून ओळख करून घेण्यासाठी ’ह्युमन लायब्ररी’ हा उपक्रम आहे.
दरम्यान या उपक्रमाची मुंबईत दोन सत्रे पार पडली, पुण्यातही एक सत्र झाले,
मी या उपक्रमाला एक वाचक म्हणून हजर राहिलो होतो.
इथे एक पुस्तक होते, ’NOT JUST A MEDICAL ERROR’- डॉ. प्रसाद दांडेकर

धपाटा

Submitted by विद्या भुतकर on 18 September, 2017 - 21:56

ती घरी आली. दमलेली, वैतागलेली.

तो: काय गं? काय झालं?

ती: तेच नाटक रे पुन्हा. कितीही काम केलं तरी पुरे होत नाहीच.

तो: जाऊ दे तू नको विचार करुस. जे काही आहे ते सरळ सांगून टाकायचं.

ती: ह्म्म्म... पण मग उगाच बाऊ होतो त्याचा. त्यापेक्षा सोडून देते.

तो: मी काय म्हणतो, तू मेलच कर मॅनेजरला सरळ. सगळं ऑफिशियल असलेलं बरं असतं. म्हणजे उद्या कुणी
विचारलं तरी तुझ्याकडे पुरावा राहील.

ती: बघते. काहीतरी करायलाच लागेल पण. नाहीतर हे असं घरावरही परिणाम होतो त्याचा. उगाच चिडचिड होते मग.

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

Submitted by मार्गी on 17 September, 2017 - 14:59

आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती