नातीगोती

संगत

Submitted by सेन्साय on 5 December, 2017 - 05:24

.

.

हसणे आणि रूसणे
ह्यातील फरक
जेंव्हापासून
कळायला लागला
तेव्हा पासून
आयुष्याचं गणित
विस्कटायला लागलं

आठवणीतले दिवस
आठवणीतच विरून गेलें
साठवावे जेवढे तेही
कमीच वाटू लागले

संगतीने जर कोणाच्या
माणूस घडत जातो
तर निसर्गाच्या संगतीत
मी कविता करायला लागलो

विसरलो होतो
जो स्वत:ला
पुन्हा मिळायला लागलो

हनम्या !

Submitted by विद्या भुतकर on 19 November, 2017 - 18:14

हनम्या उठला तर तांबडं फुटलं हुतं. दारात दोन कुत्री अंगावर चढून सकाळच्या पारीच सुरु झाल्याली. त्यांच्या केकाटन्यानंच जाग आल्याली. 'आरं हाड !' म्हणत त्यानं एक दगड हनला. पर त्यान्ला लईच जोर आल्याला. ती काय जाईनात. हनम्यानं त्यांचा नाद सोडला आन कांबरून उचलाय सुरुवात केली. घोंगड्याची वळकटी बांधून कोपऱ्यात लावली. गोधडीची शिस्तीत घडी केली. त्यावर उशी ठिवून दोन्ही एका कोनाड्यात ठेवलं. झोपेतच तंबाकूचा तोबरा भरून त्यानं लोटा हातात घेतला. परसाकडला जाऊन यीस्तवर उजाडलं हुतं.
परतीच्या रस्त्यावरच त्याला मामा दिसला. मामा म्हंजी त्याचाच मामा गावाच्या वेशीकडं जाताना दिसला.

कोण....? (शतशब्दकथा)

Submitted by नानाकळा on 10 November, 2017 - 13:36

ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.

हा बाहेर दोन गोजिर्‍या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.

'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.

आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."

तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.

क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "

“शांत राहा, बोलू नकोस”.

शब्दखुणा: 

तो, ती आणि किशोर

Submitted by विद्या भुतकर on 6 November, 2017 - 22:52

गुलाबी थंडीची ती रात्र. तो गाडी चालवत होता. ती बराच वेळ शेजारी बाहेर बघत बसली होती. मध्येच तिने सीडींचा बॉक्स काढला. शोधत शोधत ती 'किशोर कुमार' लिहिलेल्या सीडीवर थांबली. तिने सीडी टाकली आणि पहिलंच गाणं ..... 'मेरे मेहबूब इनायत होगी...... ' लागलं.

'वाह ....!' ती उद्गारली. तिच्या 'वाह' वरच त्याला कळलं ती आता नॉर्मल होत आहे.

एकेक गाणं येऊ लागलं तशी ती त्या गाण्यांसोबत आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली. तो हळूच हसलाही. तिने ते पाहिलं होतं. पण समोरच्या गाण्याचे बोल सोडून त्याच्याशी बोलायला ब्रेक घ्यायची तिची इच्छा नव्हती.

भाव बधीर

Submitted by सेन्साय on 5 November, 2017 - 23:32

.

.

अर्धजिवंत कलेवर सामोरि
बघण्यात मश्गुल तमाशा आहे
बधीर आहे कलियुगात माणूस
त्याचा जिवंतपणाही बधीर आहे

अस्पृहतेच्या या जाणिवा
उरात धडकी भरवणाऱ्या
सर्व काही बधीर आहे येथे
मृत्यूचा घनघोर हा अपमान आहे.

मेंदू विवेकशून्य बधीर झालेला
नात्याचा गुंता ही येथे बधीर आहे
मृत्युही बधीर कुटुंब जिव्हाळयाचा
रेशिमकीड़ा कोषात गुरफटला मात्र आहे

वाढदिवस

Submitted by सेन्साय on 4 November, 2017 - 14:52

.

.

जसा उद्या तसाच आजचा दिवस
तरीही कारण ह्या दिवसाचे ख़ास 
आहे आज तुझा वाढदिवस 
सुंदर वर्षाचा जणु सुवर्णकळस

तुझ्या सर्वच आकांक्षापुढे
राहु दे कायम गगन ठेंगणे   
दृढ़ निश्चयाने छान सजू दे
आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवणे 

जगण्याचा असे एक दिलासा,
तुझ्या लास्य अमृत हसण्यात 
मृत्युसही जिथे संजीवनी देई
गुंततो जीव नव्याने जगण्यात       

आयुष्य

Submitted by सेन्साय on 29 October, 2017 - 15:06

.

.

.

अर्ध्यावरून तू गेलीस
अन् ...
आयुष्य घड्याळाच्या
काट्यासारखं
रोज त्याच जागेवरून
पुढे जातंय...
गोल-गोल फिरत राहणारं
हे वर्तुळ कधी संपणार....!
शुक्राची चांदणी दिसून
प्रहर संपावा तसं
नवीन प्रकाशाला
जन्म देवून
ही रात्र कधी संपणार ?

कमिटमेंट

Submitted by सेन्साय on 27 October, 2017 - 07:38

.

.

ह्या भौतिक विश्वात लाभेविण प्रिती निव्वळ अक्षरमात्र अस्तित्व राखून असते ज्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकदा फक्त ईश्वरी पातळीवर मिळत असतो, माणसामाणसात असलेली नात्याची वीण मात्र खुपदा प्रयोजनातच असते ...ते संपले का सर्वच संपते ...कागदोपत्री असलेली नाती बाकी गरजांमुळे जगतात...खरं तर अनेकदा नुसती रेटली जातात .. अतिनिर्भीड असेल तर एका शब्दावरही सगळं संपते ...सगळी परिस्थितीच तशी दोलायमान अन् अधिरतेची ...

Pages

Subscribe to RSS - नातीगोती