नातीगोती

कळी आणि भुंगा

Submitted by अभिगंधशाली on 17 February, 2018 - 10:07

एक होती रमणीय बाग. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी भरलेल्या त्या बागेत एक सुंदर कोमल कळी वाऱ्यवर आनंदाने झुलत होती. काहीवेळाने तिथे एक भुंगा आला. रंगाने काळा पण सप्तरंगी पारदर्शक पंखांचा. त्याने साऱ्या बागेत फेरफटका मारला.

त्याची नजर त्या कोमल कळीवर गेली अन् त्याला सगळ्याचा विसर पडला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली. तो आपोआप त्या कळी भोवती गुंजरव करु लागला. ती कळी अल्लड कळीही त्याला न्याहाळू लागली. त्याचा पुरुषी रांगडेपणा तिला मोहिनी घालत होता. तिच्या तनामनातून काहीतरी उमलत होते .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

डेथ किस

Submitted by सेन्साय on 15 February, 2018 - 01:42

.

.

मी कोण.. तू कोण
कसले रे संबंध !

दोघे कोण.. दोघात काय
रुजला रे स्कंद !

तुझे ओठ.. माझे ओठ
सांड रे मकरंद !

― अंबज्ञ

खुंटी

Submitted by सेन्साय on 12 February, 2018 - 00:33

.

.
पागोटे छत्री दिसेना खुंटीवर
दाराबाहेरून नमस्कार
निरोप सांगे परस्पर
कर्ता पुरुष बाहेर

देवघरातल्या खुंटीवर
सोवळं मुकट्याचा वावर
भक्तिदर्शक विचार
श्रद्धावानाचे हे घर

माजघर मोरीतल्या खुंटीवर
नऊवारी गुंडाळी शंखाकार
नवपरिणितेस मनाधार
कुटुंबवत्सल मायाळू वावर

नातिगोती नि भावबंध
वाहून गेले परस्पर
आधुनिकेतेच्या वाऱ्यावर
खूंटी दिसेना भिंतीवर...
ना मनाच्या ओसरीवर !

― अंबज्ञ

री-युनियन -भाग ४ (अंतिम भाग)

Submitted by विद्या भुतकर on 6 February, 2018 - 20:27

रिक्षा तुळशीबागेजवळ थांबली आणि प्रज्ञाचा चेहरा लहान मुलांसारखा खुलला. दोघीही मग तिच्या खरेदीत गुंतल्या. सकाळची वेळ असल्याने गर्दी जास्त नव्हतीच. तिच्या क्लिप, साडीपीन, मुलीला केसांचे बेल्ट, रंगीत बेल्ट, आवडतील त्या सर्व प्रकारच्या चप्पल-सॅन्डल घेऊन झाल्या. गार्गी तिला एकेक गोष्ट आठवण करुन देत होती.

"ए तुला आठवतंय तू अशीच मला सोडून अजयबरोबर आली होतीस एकदा? हे असले झुमके घेतले होते दोघींसाठी?", प्रज्ञाने विचारलं.

"हो तुला किती राग आला होता. घेतलेच नाहीस ते. चल, घे आता एक. मी पैसे देते. ", गार्गी हसून म्हणाली.

री-युनियन- भाग २

Submitted by विद्या भुतकर on 5 February, 2018 - 00:09

भाग १- https://www.maayboli.com/node/65179

"बारीक झालीस किती?", प्रज्ञानं तिला विचारलं.

"हो नं? झुंबा लावलाय थोडे दिवस झाले. म्हटलं पूर्वीसारखं होऊन जायचं.", एकदम हसून गार्गी बोलली.

"बरं झालं आलीस, मला फार वाईट वाटलं असतं तुझी भेट झाली नसती तर.", प्रज्ञा.

"खरं तर तू इकडे येणार असं कळलं म्हणून आलें नाहीतर माझी यायची अजिबात इच्छा नव्हती. एकदा तू अमेरिकेत गेलीस की परत कधी भेटणार आम्हाला तू? ",गार्गी.

री-युनियन - भाग १

Submitted by विद्या भुतकर on 1 February, 2018 - 00:28

अजय दुपारी धावतच गाडीकडे गेला. ऑफिसमधून निघायला बराच वेळ झाला होता. पुण्याला पोहोचायला अजून तीनेक तास तरी लागणार होते. अजून घरी जाऊन एका दिवसाची बॅग तरी भरायची होती. त्याने गालाला हात लावून पाहिलं. "काय त्रास आहे?", काल केलेली दाढी परत वाढली होती. आता तेही करावं लागेल म्हणजे.

प्राणी नव्हे सदस्य

Submitted by pintee on 26 January, 2018 - 02:43

आपण काही वेळा उपयोगी पडतील म्हणून तर कधी लहानग्यांचा हट्ट म्हणून घरी एक नवा पाहुणा आणतो.अल्पावधीतच तो घरात इतका मिसळून जातो की घराचा अविभाज्य भाग बनतो.त्याच्या शिवाय घराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
त्याचे लाड एका बाळा सारखेच करतो आपण. आणि त्याच्या जाण्याने सैरभैर होतो आपण.अशा काही आठवणी येथे share करूयात.
फोटो टाकलेत तर दुधात साखरच

मेरी मॅगी

Submitted by विद्या भुतकर on 22 January, 2018 - 21:54

आज घरी एकटीने राहण्याचा पहिला दिवस. सकाळपासून नेटवर टाईमपास करुन झाला, थोडं लिहून झालं. हात पाय चालवून झाले. आता जेवायची वेळ झाली. मुलं-नवरा नसल्याने एकटीला जेवायला काय करायचं हा प्रश्न पडला होता. अर्थातच मग सर्वात सोप्पा उपाय होता तो म्हणजे 'मॅगी'. आता 'मॅगी' बद्दल हजारो लोकांनी लिहिलं असेल आजवर, खासकरून सध्याच्या त्यांच्यावरील आरोपांमुळे बातम्या तरी प्रत्येक ठिकाणी असतील. तरीही माझ्या आयुष्यात मॅगी वेगवेगळ्या काळात आली आणि त्या त्या दिवसांच्या आठवणींमध्ये तिने स्वतःचं वेगळं स्थानही बनवलं.

स्वार्थ की समाजभान ?

Submitted by झगड्या on 20 January, 2018 - 01:43

शीर्षकातला प्रश्न मनात का आला हे लिहिण्यापूर्वी थोडे पाल्हाळ लावावे लागणार..

Pages

Subscribe to RSS - नातीगोती