नातीगोती

आमचे बाबा

Submitted by nimita on 13 June, 2018 - 20:10

आज १२ जून. सतरा वर्षांपूर्वी याच दिवशी आमचे बाबा आम्हांला कायमचे सोडून गेले. आज इतक्या वर्षांनंतर अचानक बाबांबद्दल लिहावंसं वाटतंय!
मी कॉलेजमधे असताना कधी कधी बाबा उगीच आमची काळजी करायचे ना तेव्हा मी त्यांना सांगायची,” कशाला एवढं टेन्शन घेता बाबा? बी पी वाढेल तुमचं.” तेव्हा ते म्हणायचे ,” जब तुम बाप बनोगी तब पता चलेगा।” त्यावर मी चेष्टेत उत्तर द्यायची,” फिर तो मुझे कभी पता नहीं चलेगा, क्यूँकी मैं तो माँ बनूँगी।”

मायबोलीवरील माझा धागा वाचून मला भेटलेल्या "त्या अनामिक" व्यक्तीस...

Submitted by Parichit on 12 June, 2018 - 00:38

नमस्कार. हा माझा दुसरा आयडी आहे. आधीच्या आयडी वरून मी पूर्वी एक धागा पोष्ट केला होता. त्यात मी मला भेडसावणाऱ्या एका वैयक्तिक समस्येबाबत लिहिले होते. कोणाकडे त्यावर काही उपाय आहे का विचारले होते. तो धागा पोष्ट केल्यानंतर काही महिन्यांनी एका व्यक्तीचा मला इमेल आला (मायबोलीवरील संपर्क सुविधेच्या माध्यमातून). आपण सुद्धा त्या समस्येतून जात आहोत असे त्या व्यक्तीने त्यात लिहिले होते. आणि शेवटी मी काय उपाय केले व त्या समस्येतून बाहेर पडलो का अशी विचारणा सुद्धा केली होती. मी त्या व्यक्तीला उत्तर देऊन मला अजूनही ती समस्या ग्रासते आहे असे सांगितले.

अशीही एक श्रीदेवी !

Submitted by विद्या भुतकर on 11 June, 2018 - 21:46

आयुष्यात वेगवेगळ्या घडीला असे लोक भेटतात की त्यांना आपण भेटलो, त्यांच्याशी ओळख झाली, मैत्री झाली, याचा अतिशय आनंद होतो. त्यातलीच तीही एक. इतक्या वेळा तिच्याबद्दल लिहावंसं वाटलं होतं पण कदाचित खूप वैयक्तिक वाटेल म्हणून कधी लिहिलं नाही. पण परवा तिला फोन केला आणि लिहिण्याची तीव्र इच्छा झाली. शेवटी म्हटलं लिहावंच.

बाबा नव्हताच तिथे .....

Submitted by अनाहुत on 1 June, 2018 - 03:45

स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला .... कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .

असमान

Submitted by सेन्साय on 31 May, 2018 - 06:46

.

.

काहीतरी एक समान धागा जुळल्या शिवाय मैत्री होत नाही असे म्हणतात.
मग भलेही दोन वेगळ्या दिशेने जाणारे काटकोनातील प्रवाह ज्या एका बिंदुला एकमेकास छेदतात तो सामायिक असल्याने निव्वळ त्याच एका गोष्टीमुळे त्यांची नाळ एकमेकांना बांधून ठेवली जाते. मृदुला आणि मुकेशची मैत्री अश्याच एका बिंदुपासून सुरु झाली.

प्रवाहपतित

Submitted by सेन्साय on 29 May, 2018 - 10:38

प्रवाहपतित (भाग -१)
________________

.
'मन समुद्रासारखं ठेवा
नद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील.....!'
■ Good Morning ■

आमच्या ग्रुपमधल्या ईमरान हाश्मीचा अर्थात रोहनचा सकाळी सकाळी व्हाट्सअप आला, आणि मन एकदम पार भुतकाळात शिरून कॉलेज कट्टयावर जावून विसावले.

क्षणभर विश्रांती

Submitted by सेन्साय on 22 May, 2018 - 07:33


.

क्षणभर विश्रांती
~~~~~~~~~~
.

अनेक वेळा हमरस्त्यावर कुठेनाकुठे वाचायला मिळणारे हे हमखास दोन शब्द ! पण ह्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात खरंच करतो का ?
काही सेकंदाचा पॉझ म्हणजेच ही क्षणभर विश्रांती असली तरी नक्की त्या पॉझसाठी कायकाय निमित्त असावे किंबहुना असायला हवे हे महत्वाचे ठरते.

तुझी 'भेट'

Submitted by सेन्साय on 21 May, 2018 - 22:38

.

.

हे बघ....शोना !
मला अजिबात आवडणार नाही हां तुझं असं बाकीचे करतात तसं भर रस्त्यात, चार चौघांसमोर उगीच दिखावा करत मला मिठीत घेत भेटणं.
उगीच सर्वांसमोर तुझ्या आड़दांड बाहुपाशात मला घट्ट कवेत घेणं... !

Pages

Subscribe to RSS - नातीगोती