वसंत

देअर ईज स्प्रींग इन माय स्टेप

पुढचे आईस एज (अकबरी घोटाळे टाळा) आले की काय असे वाटत असतांनाच वसंताचे आगमन झाले एकदाचे. पर्ण् विरहीत वृक्ष माझा फोटो - माझा फोटो म्हणत नवीन कपड्यांमागे धावते झाले. एका वर्कशॉप करत गळ्यात घातलेला दागीना तसाच राहिल्याने मात्र एका झाडाचे फावले. पण हे शेवटचे पान O Henry च्या कथेतल्या प्रमाणे रंगवलेले मात्र नाही.

cP3282500.JPG
जुने व नवे

cP3282506.JPG
नवेच नवे

रविंद्रनाथांच्या कविता - ३ - तुझे प्रेम ...

तू गेल्यावर
तुझे इथे
हे प्रेम कसे राहिले ?
रस्ते हरवून
तुझे परतणे
दूर कसे राहिले ?

हृदयामध्ये
तुला घेऊनी
फिरतो आता दुनिया ...
खळखळ पाणी
अवखळ पाने
वसंतवेडी माया !

सांडून गेलेले
प्रेमाचे तारे
वरती हसले ..
तिथेच कोठे
तुझ्या घराचे
दार मला का दिसले ?

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त मराठी अनुवाद मी चैत्र या नाटकासाठी केला.