काव्यधारा

घनराई

मन माझे घनराई
आले फुलून जाई-जाई

ही वेळ नव्हे फुलण्याची
ना दरवळण्याचा ऋतू
का मजला समजत नाही?
मन माझे घनराई...

किती किती, कसे समजाऊ
की, नकोस उजळत जाऊ
पर्ण-पाचुचे दीप तू ठाई ठाई
मन माझे घनराई...

रेलून कदंबा, उभा घेऊनी पावा

अहवाल

अहवाल

आजचा ताजा अहवाल तरी जरा वाचा,
काल दिवसाभरात चार जखमी आणि फक्त दोनच ठार.
परवा एकशेचोवीस आणि एकूणसत्तर होते.
परिस्थिती झपाट्याने निवळतीय,
असं नाही वाटत तुम्हाला?

आम्ही काही हातावर हात धरून नाही बसलेलो.

चौकट

चौकट

त्याचा रंधा अचूक फिरत होता
खिळे घट्ट लागले होते
एक चौकट भक्कम
अधांतरी लटकली....

"काय आहे हे? कुठल्या चित्राची चौकट?"

"ह्या चौकटीत बंदिस्त करतोय, काळ..
गोठवून ठेवायचंय त्याला."
माझ्याकडे ढुंकून न पहाता तो म्हणाला.

चातक

चातकान कशाला उगीचच
पावसाच्या आशेवर जगावं
बिनधास्त होवून कधी तरी
तळ्याकाठच्या पाण्यावरच भागवाव..

मुग्धा

आज तुझ्या शरीराला
वेदनेचा स्पर्श नाही
आज तुझ्या मनाला
जुनी कोणती खंत नाही

गुणगुणत्या गीताला
सूर एक आर्त नाही
खळाळत्या हास्यासवे
कधी पापणी सर्द नाही

झाकोळणारी नभाला
एक छाया गर्द नाही
कुणा खुळ्या जीवासाठी

चारोळी

डोळे तुझे आठवल्यावर...
शब्द सहज स्फुरतात...
ओठांची पाळी येताच मात्र..
दगा-फटका करतात...

तु सोबत असताना...
मी माझा उरत नाही...
आणि तु सोबत नसताना...
मीच उरत नाही......

चारोळी

पहिल्या पावसा-सारखी आयुष्यात आलीस...
मातीचा सुगन्ध देउन गेलीस.....
चिंब भिजलो मी असा..,मला कळलेच नाही..
आले वादळ हे असे.., पुर्वीचा मी उरलोच नाही...

नदी

मी नीतान्त सुन्दर मन्गल पात्र नदीचे
का मला लागले वेड सागराचे सागराचे

मी हीमनग कन्या जरी अनन्या
शिव शिरी शोभे अशि सुकन्या
शिवा सोडूनि भवा भजत का
अर्र्ध्य अम्रुताचे अम्रुताचे

मी चैतन्याचा ओघ सुपात्रि

शून्य

शून्य म्हणाला एकाला
मला सोडून जाशील कुठे?
तु़झी नि माझी जन्माची गाठ
दोन म्हणाला पाचाला
तुझे नि माझे गणितच आडवे
तीन म्हणाला सहाला
तू माझ्या विरोधातच का?
तुझी नि माझी दिशा निराळी
चार म्हणाला आठाला
तू माझ्या दुप्पट असता

एक संध्याकाळ ...

संध्याकाळी दारापुढे
सैलावलेला मेपल,
त्याच्या फांद्यांमधून रेंगाळणारं आळसावलेलं ऊन,
आणि सवयीनुसार पारावर विसावलेला मी.

नव्यानेच तिघांची ओळख झाली
'तुमचं कसं - आमचं कसं?'
नेहमीचेच नमस्कार-चमत्कार
घडीव शब्दाळ सोपस्कार