मर्ढेकर

बा. सी. मर्ढेकर - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 2 March, 2017 - 14:40

मराठी भाषेला आजवर अनेक गोड पहाटस्वप्ने पडून ती खरी झाली आहेत. मुकुंदराज, चक्रधरस्वामी ह्यांसारख्या धुरंधरांनी लावलेल्या ह्या वेलीवर सुरवातीला ज्ञानोबाचा मोगरा जो फुलला, तेव्हापासून ह्या भाषेचा फुलोरा कायम डवरलेलाच आहे. 'माझा मराठाचि बोलु कौतिकें | अमृतातेंहि पैजा जिंकें |' म्हणणार्‍या ज्ञानाची शरदाच्या चांदण्यासारखी शीतल प्रतिभागंगा आजवर अनेक वळणे आणि रूपे घेत वाहत आली आहे. पारिजात, बकुळ, गुलाब, जाई, कमळ, जास्वंद अशा अनेक फुलांबरोबरच ह्या वेलीवर गेल्या शतकामध्ये एक पिवळाधमक, सुवासिक, पण अजिबात नाजूक नसलेला विरक्त सोनचाफा फुलला, व आपल्या गंधाने आसमंत व्यापून दशांगुळे उरला.

Subscribe to RSS - मर्ढेकर