मायबोली गणेशोत्सव २०१६’

’संगीतक हे नवे’ - मी टिळकांशी बोलतो!

Submitted by कविन on 11 September, 2016 - 11:34

(डोंबिवलीतल्या टिळक पुतळ्यापाशी टिळक, कल्याणकर अशा मला भेटतात, तेव्हाचा हा आमचा संवाद)

टिळक : तुझ्या गावी आलो होतो, शतकापुर्वी मी जेव्हा
गणपती उत्सवाचा, रुजला कोंब तेव्हा

मी : पाहीलाय तुमचा "तो" फोटो मी व्हॉटस अ‍ॅपच्या द्वारी
प्राऊड फीलही केलेय मी ही केव्हढे तरी

(मित्रांनो आहे यालाही पार्श्वभुमी,
नंबर द्या पाठवतो,छबी व्हॉटस अ‍ॅप वरुनी)

टिळकः बाळा, ये तू माझ्या, समोरी तू ऐसा
गणेशोत्सव चाले, अता सांग कैसा?

मी: तेव्हा रुजला कोंब, त्याचा वटवृक्ष झालाय
गल्ली बोळात पारंब्यांनी ट्रॅफीक जॅम केलाय Sad

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१६’